24 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

‘प्रलय’
‘प्रलय’

24 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 डिसेंबर 2021)

‘प्रलय’ क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी यशस्वी :

  • स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी (फ्लाइट टेस्ट) भारताने गुरुवारी यशस्वीरित्या केली.
  • संरक्षण संशोदन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या एखाद्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचण्या सलग दोन दिवस यशस्वीरित्या करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • ओडिशा किनाऱ्यानजिकच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने ठरवून दिलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण केल्याचीही माहिती संस्थेने दिली.
  • यापूर्वी बुधवारी या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली होती.
  • ‘प्रलय’च्या दुसऱ्या प्रक्षेपणावर सर्व रेंज सेंसर्स आणि टेलिमेट्री, रडार व इलेक्ट्रो- ऑप्टीक ट्रॅकिंग सिस्टिमसह पूर्व किनाऱ्यावर तैनात करण्यात आलेल्या उपकरणांच्या, तसेच ‘इम्पॅक्ट पॉइंट’ नजिक उभ्या करण्यात आलेल्या जहाजांच्या सहाय्याने देखरेख ठेवण्यात आली होती, असे डीआरडीओने सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2021)

ओन्लीफॅन्सच्या सीईओपदी भारतीय वंशाची आम्रपाली गान :

  • अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएशन प्लॅटफॉर्म ओन्ली फॅन्सने (OnlyFans) भारतीय वंशाच्या आम्रपाली ‘एमी’ गानची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे.
  • ओन्लीफॅन्सचे संस्थापक 38 वर्षीय टिम स्टोकली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • तर 2016 मध्ये टिमने ओन्लीफॅन्सची स्थापना केली. तेव्हापासून ते पाच वर्षे या पदावर कार्यरत होते.

करोनावर उपचारासाठी फायझरने आणली गोळी :

  • एफडीएने करोनापासून संरक्षण करण्यासाठी 12 वर्षे वयोगटातील आणि त्याहून अधिक वयाच्या जोखीम असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी फायझरच्या गोळीला मान्यता दिली आहे.
  • तर फायझरच्या या औषधाला Paxlovid म्हणतात.
  • तसेच या औषधाची 2200 लोकांवर चाचणी करण्यात आली.
  • असलेल्या लोकांमध्ये या औषधाने हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका 88 टक्क्यांनी कमी केल्याचे दिसून आले.
  • फायझरच्या या उपचारांना यापूर्वी युरोपियन युनियनमध्ये मान्यता दिली गेली आहे. अ

देशात पहिल्यांदाच CRPF महिला कमांडोचं पथक होतंय तयार :

  • पहिल्यांदाच सीआरपीएफ महिला कमांडोंचे पथक तयार होत आहे.
  • तर हे पथक देशातील व्हीआयपी लोकांना संरक्षण देईल.
  • तसेच महिला कमांडोच्या पहिल्या तुकडीमध्ये 32 महिला लढाऊ जवान आहेत, त्यांनी व्हीआयपी सुरक्षेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
  • तर ते 15 जानेवारीपर्यंत तैनातीसाठी तयार होतील. त्यांना आमच्या झेड प्लस संरक्षकांसोबत तपशीलवार माहिती देण्याचे ठरवले आहे, असे सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
  • पहिल्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिला कमांडो देखील तैनात केल्या जातील.
  • पहिल्यांदाच या सर्व व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी महिला कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.

भारतीय पुरुष हॉकी संघाची तिसऱ्या क्रमांकावर मुसंडी :

  • ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्षाची सांगता जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकावरील मुसंडीने केली आहे, तर महिला संघाची नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने गुरुवारी प्रकाशित केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.
  • मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचा 41 वर्षांचा पदकदुष्काळ संपुष्टात आणला.
  • तसेच नुकत्याच ढाका येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतही भारताने कांस्यपदक पटकावले.
  • त्यामुळे 2296.038 गुणांसह भारताला ऑस्ट्रेलिया आणि ऑलिम्पिक विजेते बेल्जियम यांच्यापाठोपाठ तिसरे स्थान मिळाले आहे.

धर्मांतर प्रतिबंधक विधेयक कर्नाटक विधानसभेत मंजूर :

  • ‘धर्मांतर प्रतिबंधक विधेयक’ या नावाने ओळखले जाणारे वादग्रस्त ‘कर्नाटक धर्मस्वातंत्र्य संरक्षण विधेयक 2021’ कर्नाटक विधानसभेने गुरुवारी मंजूर केले.
  • तर हे विधेयक ‘लोकविरोधी’, ‘अमानवी’, ‘घटनाविरोधी’, ‘गरीबविरोधी’ आणि ‘कठोर’ असल्याचे सांगून काँग्रेसने त्याला जोरदार विरोध केला.
  • मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आलेल्या या विधेयकाला जनता दल (एस)नेही त्याला विरोध केला.

दिनविशेष:

  • सन 1777 मध्ये कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
  • स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म 24 डिसेंबर 1880 मध्ये झाला होता.
  • बालसाहित्यक, समाजवादी नेते, समाजसुधारक तसेच स्वातंत्र्यसैनिक ‘पाडुरंग सदाशिव साने‘ उर्फ साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर सन 1899 रोजी झाला होता.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 24 डिसेंबर सन 1910 रोजी जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.