23 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

 व्हीआर चौधरी
व्हीआर चौधरी

23 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2021)

एअर मार्शल व्हीआर चौधरी हवाई दलाचे नवे प्रमुख :

 • एअर मार्शल विवेक राम चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असतील.
 • तर व्ही आर चौधरी या महिन्याच्या अखेरीस पदभार स्वीकारतील. भारतीय हवाई दलाचे ते आता उपप्रमुख आहेत.
 • तसेच सध्याचे हवाईदल प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानंतर चौधरी त्यांची जागा घेतील.
 • हवाई दलाचे उपप्रमुख चौधरी यांनी राफेल विमानांच्या खरेदी संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 • फ्रान्समधील लढाऊ राफेल विमान प्रकल्पाच्या खरेदी प्रकल्पात लक्ष ठेवणाऱ्या द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे ते प्रमुख होते.
 • चौधरी यांना 29 डिसेंबर 1982 रोजी भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले.

आता फलंदाजाला बॅट्समनऐवजी ‘बॅटर’ म्हटलं जाणार :

 • मेरिलेबॉन क्रिकेट क्लबने (एमसीसीने) एक मोठी घोषणा केली आहे.
 • क्रिकेट नियमात बदल करत बॅट्समन ऐवजी जेंडर न्यूट्रल टर्मनुसार बॅटर किंवा बॅटर्स संबोधलं जाणार आहे.
 • तर या बदलला एमसीसीने मान्यता दिली आहे. यापूर्वी क्लबच्या विशेष लॉ सब कमिटीने यावर निर्णय घेतला होता.
 • बॅटर हा शब्द सर्वसमावेशक असल्याने क्रिकेटची स्थिती बदलेल, असं एमसीसीकडून सांगण्यात आलं आहे.
 • तर फिल्डर आणि बॉलर या शब्दावर कोणतीच आपत्ती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 • मान्यतेनंतर lords.org/laws यावर हा बदल प्रकाशित करण्यात आला आहे.

रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींची अभिनव योजना :

 • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले असून त्यानुसार ट्रक चालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक चालवताना डुलकी लागल्यामुळे होणाऱ्या अपघातांना यामुळे आवर घालण्यास मोठी मदत होणार आहे.
 • राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी हे आदेश दिले आहेत.
 • रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरींनीच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा गटाची स्थापना केली आहे.
 • मालवाहू ट्रकचालक लांब पल्ल्याचे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेत असतात.
 • त्यामुळे या प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागण्याची देखील शक्यता असते. अशाच काही प्रकरणात मोठे अपघात झाल्याचं देखील दिसून आलं आहे.
 • त्यामुळेच ट्रकचालकांना डुलकी लागू नये, यासाठी देशातील सर्व व्यावसायिक वापराच्या ट्रकमध्ये On-Board Sleep Detection Sensors अर्थात चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार आहेत.

FSSAIने विगन पदार्थांसाठी आणला नवीन लोगो :

 • भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणने विगन खाद्यपदार्थांसाठी काही नवीन नियम आणले असून विगन पदार्थांसाठी एक नवा लोगो लाँच केला आहे.
 • ज्याप्रमाणे हिरव्या ठिपक्यात शाकाहारी पदार्थ आणि लाल ठिपक्यात मांसाहारी पदार्थ दर्शवण्यात येतात.
 • त्याप्रमाणे विगन पदार्थ आता नवीन हिरव्या रंगाच्या लोगोने दाखवले जातील.
 • तर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा भारत सरकारने विगन उत्पादनांना वेगळी ओळख दिली आहेत.
 • याशिवाय काही नियम आणले असून विगन पदार्थ तयार करताना त्याचं पालन करणं आवश्यक असेल.

बंद झालेल्या 21 सहकारी बँकांच्या ठेवीदारांना मिळणार 5 लाखांपर्यंतचं इन्शूरन्स :

 • पीएमसी बँकेसह 21 अयशस्वी सहकारी बँकांच्या ठेवीदारांना आता डिपॉझिट इन्शूरन्स आणि पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) 5 लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट इन्शूरन्स कव्हर दिले जाईल.
 • कपोल सहकारी बँक, रुपया सहकारी बँक आणि इतर अनेक सहकारी बँकांना 45 दिवसांच्या ठेवीदारांचे दावे जमा करण्यास सांगितले आहे.
 • DICGC संशोधन अधिनियम, 2021 DICGC अधिनियम 1961 अंतर्गत विमाधारक बँकांसाठी 1 सप्टेंबर 2021 पासून लागू झाला.
 • त्यानुसार, डीआयसीजीसी विमाधारक बँकांच्या ठेवीदारांना 90 दिवसांच्या आत 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत देईल.

दिनविशेष :

 • 23 सप्टेंबर 1803 मध्ये दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
 • अर्बेन ली व्हेरिअर यांनी 23 सप्टेंबर 1846 मध्ये नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
 • महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना 23 सप्टेंबर 1884 मध्ये स्थापन केली.
 • कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना 23 सप्टेंबर 1908 मध्ये झाली.
 • 23 सप्टेंबर 1932 मध्ये हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
 • सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा 23 सप्टेंबर 1983 मध्ये संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.