23 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 October 2018 Current Affairs In Marathi

23 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 ऑक्टोबर 2018)

विदेशात अवैध संपती असलेल्या भारतीयांवर कठोर काइवाई होणार:

  • विदेशात अवैध संपत्ती असलेल्या भारतीयांवर आयकर विभाग टाच आणण्याच्या तयारीत आहे. अवैधरित्या जमा केलेले पैसे आणि मालमत्ता गोळा केलेल्या भारतीयांविरोधात आयकर विभागाने मोहीमच उघडली आहे. अशा भारतीयांविरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. CBDT
  • आयकर विभागाने त्यांच्या विदेशी समकक्ष विभागासोबत मिळून हजारो भारतीयांच्या संपत्ती आणि मालमत्तेची चौकशी सुरु केली आहे. कोणाकडे किती पैसा आला? कोणत्या मार्गाने आला? कोणी कोणती मालमत्ता खरेदी केली याची कसून चौकशी करण्यात येते आहे अशीही माहिती समोर आली आहे.
  • सीबीडीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस विभागाचे संचालक सुशील चंद्रा यांनीही ही मोहीम सुरु असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
  • काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने 2015 मध्येच कायदा आणला आहे. नव्या कायद्यानुसार अवैध संपत्तीच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 नुसार होणार आहे असेही समजते आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2018)

भारतात कोट्यधीशांचे प्रमाण वाढले:

  • मंदी आणि महागाईने सामान्यांना बेजार केले असले, तरी देशातील कोट्यधीश करदात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांविषयीची माहिती जाहीर केली. यात 81 हजार 344 करदाते वर्षाकाठी एक कोटीहून अधिक कमाई करत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन वर्षांत कोट्यधीश करदात्यांची संख्या दोनतृतीयांशने वाढल्याचेही कर मंडळाने म्हटले आहे.
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या माहितीनुसार 88 हजार 649 करदात्यांनी 2014-15 या वर्षात एक कोटीहून अधिक उत्पन्न घोषित केले होते. त्यात कॉर्पोरेट्‌स, कंपन्या, एचयूएफ आणि इतर श्रेणीतील करदात्यांचा समावेश आहे. 2017-18 या वर्षात ही संख्या एक लाख 40 हजार 139 पर्यंत वाढली आहे. यामध्ये 60 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे “सीबीडीटी’ने म्हटले आहे.
  • अशाच प्रकारे वैयक्‍तिक करदात्यांची संख्याही 68 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. 2014-15 या वर्षात देशात 48 हजार 416 जणांनी एक कोटीहून अधिक उत्पन्नाची नोंद केली होती. 2017 -18 मध्ये वैयक्‍तिक कोट्यधीशांची संख्या 81 हजार 344 पर्यंत वाढली आहे.
  • करचोरी रोखण्यासंदर्भातील विविध उपाययोजनांमुळे गेल्या चार वर्षांत विवरणपत्र (रिटर्न) सादर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. 2017-18 या वर्षात सहा कोटी 85 लाख करदात्यांनी आयटी रिटर्न भरले. 2013-14 या वर्षात तीन कोटी 79 लाख करदात्यांनी रिटर्न भरले होते.

जागतिक टेनिस क्रमवारीत युकीची घसरण:

  • जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल 100 खेळाडूंमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव टेनिसपटू युकी भांब्रीच्या स्थानाला धक्का बसला.
  • गुडघ्याच्या दुखापतीतून नुकताच सावरणाऱ्या युकीला गेल्या काही स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे अव्वल 100 खेळाडूंमधील स्थान गमवावे लागले असून त्याची 107व्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र निंग्बो चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या प्रज्ञेश गुणेश्वरनने कारकीर्दीतील सर्वोच्च अशा 146व्या स्थानी झेप घेतली आहे.
  • मागील आठवडय़ात झालेल्या युरोपियन खुल्या टेनिस स्पर्धेत युकीला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा एप्रिल महिन्यात युकीने अव्वल 100 खेळाडूंत स्थान मिळवले होते.
  • तर प्रज्ञेशने 25 स्थानांनी मोठी झेप घेत थेट 146वा क्रमांक गाठला. तसेच थॉमस फॅबिआनोविरुद्ध प्रज्ञेशला पराभव पत्करावा लागला.

हॅमिल्टनची जगज्जेतेपदाची प्रतीक्षा कायम:

  • लुईस हॅमिल्टनला फॉम्र्युला वनमधील जगज्जेतेपदासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अमेरिकन ग्रां.प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत रंगलेल्या फेरारीच्या किमी रायकोनेन याने विजेतेपद पटकावले. जवळपास 113 शर्यती आणि पाच वर्षांनंतर रायकोनेनचे हे पहिले विजेतेपद ठरले. याआधी रायकोनेन याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन शर्यतीचे जेतेपद पटकावले होते.
  • जगज्जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या फेरारीच्या सेबॅस्टियन वेट्टेलने अमेरिकन शर्यतीत चौथ्या क्रमांकावर मजल मारली. त्यामुळेच जगज्जेतेपदाचा फैसला आता पुढील आठवडय़ात रंगणाऱ्या मेक्सिकन शर्यतीत लागण्याची दाट शक्यता आला.
  • हॅमिल्टनने 346 गुणांसह वेट्टेलला 70 गुणांनी पिछाडीवर टाकून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. आता या मोसमातील तीन शर्यती शिल्लक असून हॅमिल्टनला पाचव्यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरण्यासाठी मेक्सिको शर्यतीत किमान सातव्या स्थानी (वेट्टेलजिंकला तरीही) मजल मारावी लागेल. जर या शर्यतीत विजेतेपद पटकावण्यात वेट्टेलला अपयश आले तर हॅमिल्टनचे जगज्जेतेपद निश्चित होईल.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी भेट:

  • एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कर्मचाऱ्यांना 2500 रुपये, तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळणार आहे.
  • याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना दहा टक्के इतकी अंतरिम वेतनवाढ देण्याचा तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही झाला आहे. ST Mahamandal
  • रावते म्हणाले, एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या दहा टक्के इतकी अंतरिम वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ऑक्‍टोबर 2018 पासून ही वेतनवाढ लागू होईल.
  • एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच अशी वेतनवाढ दिली आहे. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही वेतनवाढ देण्यात येणार आहे. याबाबत अभ्यास करून महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोनसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याबाबत या समितीस सूचित केले असून, त्यानंतर अधिकाऱ्यांना अंतिम वेतनवाढ दिली जाईल. तत्पूर्वी, या समितीचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या दहा टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात येत असल्याचे रावते यांनी जाहीर केले.
  • तसेच ऑक्‍टोबर 2018 पासून ही अंतरिम वेतनवाढ लागू होत असून, समितीच्या अहवालानंतर अंतिम वेतनवाढ लागू केली जाईल, असे मंत्री रावते यांनी सांगितले.

शैक्षणिक भूखंडासाठी अट शिथिल:

  • पिंपरी चिंचवड शहरामध्ये नामांकित शैक्षणिक संस्था येण्यासाठी त्यांना भूखंड देण्यात येणार असून, त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची अट पन्नास वर्षांवरून दहा वर्षांपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने बैठकीत घेतला. या आरक्षित भूखंडासाठी दोनदा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
  • प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके या वेळी उपस्थित होते. प्राधिकरणाकडे शैक्षणिक संस्थांसाठीच्या आरक्षणाचे भूखंड शिल्लक आहेत.
  • नामांकित शैक्षणिक संस्थांनी तेथे शाळा किंवा महाविद्यालये सुरू करावीत, या उद्देशाने प्राधिकरणाने यंदा दोन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या. मात्र, निविदेतील जाचक अटींमुळे संस्थांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
  • तसेच शैक्षणिक भूखंड देण्यासाठी लवकरच पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात येतील. पात्र संस्थांना भूखंड देण्यात येतील. चांगल्या दर्जेदार संस्था याव्यात, त्यांच्यात स्पर्धा व्हावी, या उद्देशाने अटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिनविशेष:

  • कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 मध्ये झाला.
  • सन 1890 मध्ये हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1923 मध्ये झाला.
  • सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना सन 1997 मध्ये प्रदान झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2018)

You might also like
1 Comment
  1. vivek says

    Awesome

Leave A Reply

Your email address will not be published.