23 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 March 2019 Current Affairs In Marathi

23 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 मार्च 2019)

142 वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये बदल:

 • कसोटी क्रिकेट हा अजुनही अनेक चाहत्यांसाठी आस्थेचा विषय आहे. वन-डे आणि टी-20 क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेट तग धरेल का असा सवाल आपण अनेक वर्ष ऐकत आहोत. मात्र आता कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 142 वर्षांनी एक बदल होण्याची शक्यता आहे. लवकरच कसोटी क्रिकेटच्या पांढऱ्या पोशाखावर आता खेळाडूंचे क्रमांक आणि नावं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 • 1877 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि क्रमांक टाकले होते. मात्र यानंतर आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकच पद्धत चालत आलेली आहे.
 • 2019 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या Ashes कसोटी मालिकेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होते आहे. कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढावा यासाठी या बदलाची शिफारस आयसीसीकडे करण्यात आलेली आहे.
 • कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पोशाखावर त्याचं नाव लिहीलेलं नसल्यामुळे अनेकदा सामन्यादरम्यान, त्यांना ओळखण कठीण होऊन बसतं. त्यातच कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांची रोडावलेली संख्या हा मुद्दा चर्चेत असताना, प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानात खेचून आणण्यासाठी आयसीसी या प्रस्तावाला मान्यता देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. मात्र या शिफारसीवर आयसीसीसीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.
 • आयसीसीने नवीन प्रस्तावाला मान्यता दिल्यास, Ashes मालिकेत खेळाडूंच्या पोशाखामागे त्यांची नाव व क्रमांक लिहीले जाऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात चाहते या बदलाकडे कसं पाहतात हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 मार्च 2019)

आयपीएल 2019 ‘महासंग्राम’ला आजपासून सुरुवात:

 • आयपीएलच्या बाराव्या हंगामाला 23 मार्च, शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे. IPL-2019
 • चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे या सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील, अशी आशा आहे. दरम्यान, या सामन्यासाठी विराट कोहली आणि धोनी यांनीही कसून सराव केला.
 • कोहली अ‍ॅन्ड कंपनीने धोनीच्या धुरंधरांना त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली तर बेंगळुरुसाठी हा सर्वांत मोठा श्रीगणेशा ठरणार आहे.
 • चेन्नई संघात 30 वर्षांवरील खेळाडू आहेत. धोनी आणि शेन वॉटसन हे दोघे 37, तर ड्वेन ब्राव्हो 35, फाफ डुप्लेसिस 34 तसेच अंबाती रायुडू आणि केदार जाधव 33, सुरेश रैना 32, फिरकीपटू इम्रान ताहिर 39 आणि हरभजनसिंग 38 वर्षांचा आहे.
 • राष्ट्रीय संघाबाहेर असलेला कर्ण शर्मा 31 आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा 30 वर्षांचा आहे. या संघाने वयावर मात करीत आयपीएलचे सामने गाजविले हे विशेष. नेहमी अव्वल चार संघात राहून चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधीही दिली.
 • चेन्नई संघ तीनवेळेचा विजेता असला तरी बेंगळुरू संघात अनेक दिग्गज आहेत पण एकदाही त्यांना जेतेपद पटकविता आले नाही. पहिल्या सामन्याचा निकाल गोलंदाजांच्या कामगिरीवर तसेच दडपण झेलण्याच्या खेळाडूंच्या क्षमतेवर विसंबून असेल.
 • चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा हे तसेच बेंगळुरु संघातून वेगवान उमेश यादव चांगल्या कामगिरीच्या बळावर विश्वचषकासाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यास इच्छुक आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणात रहिमतपूर देशात 38वे:

 • स्वच्छ सर्वेक्षण 2019या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगर परिषदेचा देशात 38, राज्यात 34जिल्ह्यात पाचवा क्रमांक आला आहे.
 • केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2019या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगरपरिषदेने एकूण पाच हजार गुणांपैकी तीन हजार 440 गुण प्राप्त केले.
 • संपूर्ण देशामध्ये पश्‍चिम विभागातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पहिल्या शंभर मानांकन शहरांमधून रहिमतपूर नगरपरिषदेने 38वा, तर सातारा जिल्ह्यातून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
 • सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, उपनगराध्यक्ष चाँदगणी आतार, पदाधिकारी, सर्व सदस्य, आरोग्य अभियंता, सर्व नगरपालिका कर्मचारी, आराध्या इन्फ्रास्ट्रक्‍चरचे संचालक दत्तात्रय राणे व त्यांची सर्व टीम, विविध सेवाभावी संस्था, पंचक्रोशी शिक्षण मंडळ, पद्मभूषण वसंतदादा पाटील शिक्षण संस्था, आदर्श शिक्षण संस्था, श्री चौंडेशवरी शिक्षण संस्था, हिंद वाचनालय रहिमतपूर, (कै.) उमाताई कानेटकर वाचनालय, रहिमतपूर विभाग पत्रकार संघ, विविध बचत गटांतील महिला, व्यापारी संघटना रहिमतपूर व दुर्गोत्सव मंडळे, गणेशोत्सव मंडळे, शिवजयंती उत्सव मंडळे, नागरिकांच्या सांघिक प्रयत्नामुळे देशपातळीवर स्वच्छतेची गगनभरारी घेतल्यामुळे रहिमतपूरकरांची मान देशात गर्वाने उंचावली आहे.

अमरावतीत दुर्मीळ ऑस्ट्रेलियन पक्ष्याची नोंद:

 • शेकाटय़ा (ब्लँक विंग स्टील्ट) या पक्ष्याशी साधर्म्य साधणाऱ्या ऑस्ट्रेलियन शेकाटय़ा या दुर्मीळ पक्ष्याची नोंद अमरावती येथे घेण्यात आली. अमरावती येथील वन्यजीव व पर्यावरण संस्था ‘वेक्स’चे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांना हा पक्षी अमरावती येथे आढळून आला.
 • पक्ष्यांच्या उपप्रजाती, त्यांच्यातील रंगांचे बदल आणि वेगळेपणाचा गेल्या अनेक वर्षांपासून निनाद अभंग अभ्यास करत आहेत. 30 मार्च 2014ला शेकाटय़ा प्रजातीचे मानेवर काळ्या रंगाचा पट्टा असलेले पक्षी त्यांना दिसून आले. सुरुवातीला त्यांना हा पिसांच्या रंगातील बदल असावा, असे वाटले.
 • संदर्भ आणि घेतलेल्या माहितीनंतर ऑस्ट्रेलियात शेकाटय़ाची एक उपप्रजाती अशाप्रकारे दिसत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर दरवर्षी केलेल्या पाठपुराव्यानंतर 2015ला डॉ. जयंत वडतकर यांना तर 2016 मध्ये शिशिर शेंडोकर यांना अकोल्यात या प्रजातीचे पक्षी दिसून आले.
 • बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहाय्यक संचालक डॉ. राजू कसंबे यांना ही प्रजाती ठाणे जिल्ह्यात 2016 व 2017च्या हिवाळ्यात दिसून आली.
 • मानेवर काळा रंग असलेले काही पक्षी शेकाटय़ांच्या थव्यात दिसतात. मात्र, त्यातील बहुतेक हे रंगातील बदल असतात. पूर्वी ही प्रजाती ‘ब्लँक विंग स्टील्ट’ची उपप्रजाती म्हणून गणली जात होती. आता या उपप्रजातीस स्वतंत्र प्रजाती समजले जाते.
 • श्रीलंकेत या प्रजातीच्या नियमित नोंदी असून भारतात गुजरातच्या किनाऱ्यावर या प्रजातीचे पक्षी नोंदवले गेले आहेत.
 • ऑस्ट्रेलियन शेकाटय़ा अशी या प्रजातीची नवीन ओळख आहे. या पक्ष्याची छायाचित्रे संबंधित अभ्यासकांना पाठवल्यानंतर गुजरात येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे दिशांत पाराशर्या, श्रीलंकेतील रेक्स डिसिल्व्हा यांनी ही प्रजाती ऑस्ट्रेलियन शेकाटय़ा असल्याचे कळवले.

काश्मीरमधील फुटीर विचारसरणी पोसणाऱ्या ‘जेकेएलएफ’वर बंदी:

 • जम्मू आणि काश्मीरमधील फुटीर विचारसरणी पोसणारी सर्वात जुनी संघटना असलेल्या ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट‘ (जेकेएलएफ) या यासिन मलिकच्या नेतृत्वाखालील संघटनेवर 22 मार्च रोजी बंदी घालण्यात आली.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतर्गत सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1988 पासून फुटीर चळवळीव्दारे काश्मीर खोऱ्यात घातपाती कारवायांना बळ दिल्यावरून ही कारवाई झाल्याचे केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 • दहशतवादाविरोधातील केंद्राच्या कठोर धोरणानुसार हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. ‘जेकेएलएफ’नेच 1989मध्ये काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या सामूहिक हत्या घडविल्या होत्या. त्यामागे यासिन मलिकच होता, असे गौबा म्हणाले.
 • जेकेएलएफने अनेक गुन्हे केले आहेत. त्यात हवाई दलाच्या चार जवानांची हत्या आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महम्मद सईद यांची कन्या रुबिया यांचे अपहरण, यांचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
 • काश्मीरमधील घातपाती कारवायांसाठी अन्य गटांना तसेच दगडफेक करणाऱ्या तरुणांना ही संघटना आर्थिक रसदही पुरवत असल्याचे उघड झाले आहे, असे ते म्हणाले.
 • तर यासिन मलिक हा जम्मूच्या कोट बालावर तुरुंगात आहे. तीन दशकांपूर्वीच्या रुबिया सईद अपहरण प्रकरणातील तसेच चार जवानांच्या हत्या प्रकरणातील खटल्याला तो सामोरा जाणार आहे.

दिनविशेष:

 • 23 मार्च हा दिवस ‘शहीद स्मृती दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • सन 1931 मध्ये सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचे पुण्यस्मरण.
 • 1956 यावर्षी पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
 • सन 1999 मध्ये पं. भीमसेन जोशी लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषणसन्मानाने गौरविेण्यात आले.
 • क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना सन 1999 मध्ये ‘पद्मश्रीसन्मान प्रदान करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 मार्च 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.