23 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs
23 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 जुलै 2022)
13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा :
- केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
- तर या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे.
- तसेच या वर्षी आपण ‘आझादी का अमृत’ उत्सव साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ चळवळीला बळ देऊया.
- 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल.
- भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीमेची योजना आखली आहे.
- तर या अंतर्गत सुमारे 20 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवला जाईल, असा दावा भाजपाने केला आहे.
Must Read (नक्की वाचा):
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धात नीरज प्रथमच अंतिम फेरीत :
- ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भालाफेक करून प्रथमच जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
- नीरजसह रोहित यादवनेही पदकाच्या फेरीत स्थान मिळवल्याने भारतासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.
- स्पर्धेच्या अ-गटात समावेश असलेला भारताचा तारांकित खेळाडू नीरजने कारकीर्दीतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी साकारली.
- तर याच गटातून 89.91 मीटर अंतरावर भाला फेकत एकंदर अग्रस्थान मिळवणाऱ्या ग्रेनाडाच्या गतविश्वविजेत्या अँडरसन पीटर्सनंतर नीरजला दुसरा क्रमांक मिळवता आला.
- नीरजने पहिल्याच प्रयत्नात थेट पात्रतेचे अंतर गाठल्यामुळे उर्वरित दोन प्रयत्न करण्याची आवश्यकताच भासली नाही.
पंचांच्या गुणवत्ता सुधारणेवर बीसीसीआय देणार भर :
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट पंचांना आर्थिक लाभ मिळण्यासोबतच्या त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, असा उपक्रम सुरू केला आहे.
- बीसीसीआयने खेळाडूंप्रमाणे पंचांसाठी ‘ए प्लस’ श्रेणी सुरू केली आहे.
- ए प्लस आणि ए श्रेणीतील पंचाना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सामन्यातील प्रत्येक दिवसासाठी 40 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एलिट पॅनेलचे सदस्य नितीन मेनन यांच्यासह इतर 10 पंचांचा ए प्लस गटामध्ये सहभाग करण्यात आला आहे.
- याशिवाय, अ गटात 20, ब गटात 60, क गटात 46 आणि ड गटामध्ये 11 पंच आहेत.
दिनविशेष :
- 23 जुलै 1840 मध्ये कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
- हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास 23 जुलै 1986 मध्ये सुरुवात झाली.
- 23 जुलै 1998 मध्ये केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
- 23 जुलै 1856 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला.
- थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा 23 जुलै 1906 मध्ये जन्म झाला.