23 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 July 2018 Current Affairs In Marathi

23 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 जुलै 2018)

जीएसटीच्या 28 टक्के कर श्रेणीत आता केवळ 35 वस्तूंचा समावेश :

  • वस्तू व सेवा कराच्या सर्वाधिक म्हणजे 28 टक्के दराच्या प्रवर्गात आता केवळ 35 वस्तू राहिल्या आहेत, यात सध्या191 वस्तू होत्या.
  • तसेच त्यात अनेक वस्तूंवरील कर कपात केल्याने केवळ वातानुकूलन यंत्रे, डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डर, डिशवॉशर मशीन, वाहने यांसारख्या 35 वस्तूच त्यात राहिल्या आहेत.
  • 1 जुलै 2017 रोजी वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी करप्रणाली सुरू झाली, तेव्हा 28 टक्के कराच्या गटात 226 वस्तू होत्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जुलै 2018)

धावपटू मोहम्मद अनासला सुवर्णपदक :

  • भारताचा धावपटू मोहम्मद अनास याहीयाने झेक रिपब्लीक येथील 400 मी. शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • 45.24 सेकंदात ही शर्यत पूर्ण करत मोहम्मदने नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला आहे.
  • काही महिन्यांपूर्वी गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मोहम्मदने 45.31 अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.
  • याव्यतिरीक्त एम. आर. पुवम्मानं देखील महिलांच्या 400 मीटरची शर्यत 53.01 सेकंदात पार करत भारतासाठी सन्मान मिळवला.
  • तसेच धावपटू राजीव अरोकिया यानेही 200 मीटरचे अंतर 20.77 सेकंदात पार केले.

भारताच्या लक्ष्य सेनची अंतिम फेरीत बाजी :

  • भारताचा तरुण बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे.
  • जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कुनलावत वितीदसरनचा 21-19, 21-18 अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.
  • तब्बल 6 वर्षांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणार लक्ष्य सेन हा पहिला भारतीय बॅडमिंटपटू ठरला आहे.
  • या विजयासह लक्ष्य सेनला गौतम ठक्कर आणि पी. व्ही. सिंधू या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे.
  • तर ठक्कर आणि सिंधू यांच्यानंतर मानाची आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणारा लक्ष्य तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • गौतम ठक्कर यांनी 1965 साली तर पी. व्ही. सिंधूने 2012 साली ही स्पर्धा जिंकली होती.

दिनविशेष :

  • 23 जुलै 1840 मध्ये कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
  • हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास 23 जुलै 1986 मध्ये सुरुवात झाली.
  • 23 जुलै 1998 मध्ये केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
  • 23 जुलै 1856 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला.
  • थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा 23 जुलै 1906 मध्ये जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जुलै 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.