23 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

‘प्रलय’
‘प्रलय’

23 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2021)

‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • कमी पल्ल्याच्या आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ या दिग्दर्शित आंतरखंडीय क्षेपणास्त्राची (गायडेड बॅलिस्टिक मिसाईल) भारताने बुधवारी ओडिशातील बालासोर किनाऱ्यावरून यशस्वी चाचणी केल्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) सांगितले.
  • ‘प्रलय’हे 350 ते 500 किलोमीटर इतका कमी पल्ला असलेले जमिनीवरून जमिनीवर डागले जाणारे क्षेपणास्त्र असून, 500 ते 1 हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
  • डीआरडीओने विकसित केलेले घन इंधनावर चालणारे हे क्षेपणास्त्र भारताच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रमातील पृथ्वी संरक्षण वाहनावर स्थित आहे.
  • तर सकाळी साडेदहा वाजता एपीजे अब्दुल कलाम बेटावरून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने मिशनची सर्व उद्दिष्टेपूर्ण केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2021)

आता आणखी एका शहराचं नामांतरण :

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा हैदराबादच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केलाय.
  • नामांतरणाचा मुद्दा लक्षात घेत संघाने जानेवारी महिन्यामध्ये तीन दिवसीय बैठक हैदराबादमध्ये आयोजित केलीय.
  • जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात होणाऱ्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून संघाशी संबंधित संस्थाना आमंत्रित करण्यात आलं आहे.
  • पुढील वर्षी म्हणजेच 2022 रोजी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भातील चर्चा या बैठकीत केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
  • विशेष म्हणजे या बैठकीची माहिती देताना आयोजन हैदराबादऐवजी भाग्यानगरमध्ये करण्यात आल्याचं संघानं म्हटलंय.

श्रीकांत क्रमवारीत 10व्या स्थानी :

  • जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत चार स्थानांनी आगेकूच करीत अव्वल 10 स्थानांमध्ये मुसंडी मारली आहे.
  • ह्युएल्व्हा (स्पेन) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे श्रीकांतला क्रमवारीत 10वे स्थान मिळवता आले आहे.
  • जागतिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या युवा लक्ष्य सेनने दोन स्थानांनी सुधारणा करीत 17वे स्थान मिळवले आहे.
  • तर बी. साईप्रणीतची दोन स्थानांनी घसरण झाली असून, तो 18व्या क्रमांकावर आहे. तसेच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या एचएस प्रणॉयने सहा स्थानांनी आगेकूच करीत 26वा क्रमांक मिळवला आहे.
  • महिला एकेरीत दोन ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू सातव्या क्रमांकावर कायम आहे, तर दुखापतीमुळे जागतिक स्पर्धेतून माघार घेणारी सायना नेहवाल 25व्या क्रमांकावर आहे.

चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धात भारतीय संघाला कांस्यपदक :

  • जपानकडून उपांत्य लढतीत पराभवामुळे जेतेपद टिकवण्यात अपयशी ठरलेल्या भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक निसटू दिले नाही.
  • बुधवारी झालेल्या तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाच्या लढतीत भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक लढतीत 4-3 असा विजय मिळवला.
  • राऊंड-रॉबिन पद्धतीने झालेल्या साखळी सामन्यांत अग्रेसर ठरलेल्या भारताने मंगळवारी जपानकडून 3-5 अशा फरकाने पराभव पत्करल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध अपेक्षा उंचावल्या होत्या.
  • मस्कतला झालेल्या मागील चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या साथीने संयुक्त विजेतेपद मिळवले होते. यंदा या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पहिल्याच सामन्यात यू मुंबाचा बंगळुरू बुल्सवर दणदणीत विजय :

  • प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामास बुधवार पासून धडाक्यात सुरूवात झाली.
  • तर या हंगामासाठी एकूण 12 संघ सज्ज झाले आहेत.
  • तर, हंगामातील पहिल्याच सामना आज गतविजेता संघ यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बूल्स यांच्यात झाला.
  • तसेच या उद् घाटनाच्या सामान्यात यू मुंबाने बंगळुरू बुल्सवर 16 गुणांनी दणदणीत विजय मिळवला.
  • मुंबईच्या विजयात अभिषेक सिंग हा हिरो ठरला.

दिनविशेष :

  • 23 डिसेंबरराष्ट्रीय शेतकरी दिवस
  • 23 डिसेंबर 1690 मध्ये मणिपूर साम्राज्याचे सम्राट ‘पामेबा’ यांचा जन्म झाला.
  • सन 1940 मध्ये 23 डिसेंबर रोजी वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
  • ‘बिजन कुमार मुखरेजा’ यांनी 23 डिसेंबर 1954 मध्ये भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • 23 डिसेंबर 2000 मध्ये केंद्र सरकारने कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास मंजुरी दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 डिसेंबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.