23 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

रतन टाटा
रतन टाटा

23 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2020)

पंतप्रधान मोदी यांना ‘लिजन ऑफ मेरिट’पुरस्कार प्रदान :

 • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिजन ऑफ द मेरिट पुरस्कार जाहीर केला होता, हा पुरस्कार मोदी यांच्या वतीने भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी स्वीकारला.
 • तर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
 • अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-अमेरिका भागीदारीत मोठी प्रगती करण्यात हातभार लावल्याने मोदी यांना हा पुरस्कार जाहीर केला होता. हा पुरस्कार कुठल्याही सरकारच्या प्रमुखालाच वैशिष्टय़पूर्ण कामगिरीसाठी दिला जातो.
 • ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अबे यांनाही हा पुरस्कार जाहीर केला होता, तो त्या देशांच्या राजदूतांनी स्वीकारला.
 • जपानचे माजी पंतप्रधान अ‍ॅबे यांना मुक्त हिंद-प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेतील प्रगतीसाठी हा पुरस्कार जाहीर केला होता.
 • सामूहिक सुरक्षेची आव्हाने पेलल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2020)

अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला भारतीय वंशाच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव :

 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे.
 • तर या नवीन कायद्यानुसार टेक्सास राज्यातील एका पोस्ट ऑफिसला दिवंगत शीख पोलीस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांचे नाव देण्यात आलं आहे.
 • एका वर्षापूर्वी ह्यूस्टन शहरामध्ये आपले कर्तव्य बजावत असतानाच धालीवाल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला होता. या हल्ल्यात जखमी झालेले धालीवाल हे उपचारादरम्यान मरण पावले. त्यांच्या सन्मानार्थ टेक्सासमधील पोस्ट ऑफिसचे नाव बदलण्यात आलं आहे.
 • तसेच टेक्सासमधील ह्यूस्टन येथील 315 एडिक्स होवेल रोडवरील पोस्ट ऑफिसचे नाव डेप्युटी संदीप सिंह धालीवाल पोस्ट ऑफिस बिल्डिंग असं करण्याबद्दलचा कायदा संमत करण्यात आला आहे.

रतन टाटा यांना एफआयआयसीसीने केले सन्मानित :

 • फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर ऑफ कॉमर्स (एफआय आयसीसी)ने ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस ॲण्ड पीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 • तर एकता, शांती आणि स्थिरता यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एका व्हर्च्युअल कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • एकता,शांतता आणि स्थैयर् यांचे प्रतीक असलेल्या टाटा यांचा भारत, इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिराती येथील उद्योग जगतामध्ये आदर केला जातो. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे.

फेडरर, नदाल, जोकोव्हिच एटीपी पुरस्काराचे मानकरी :

 • नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडरर, राफेल नदाल तसेच फ्रान्सेस टियाफोए हे यंदाच्या मोसमातील एटीपीच्या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
 • जोकोव्हिटने सलग सहाव्यांदा वर्षअखेर अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला.
 • तर त्याने यंदा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आठव्या जेतेपदासह चार विजेतेपदे पटकावली. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवणारे मेट पॅव्हिच आणि ब्रूनो सोरेस ही दुहेरीतील अव्वल जोडी ठरली.
 • फेडररने एकेरीतील चाहत्यांच्या पसंतीचा पुरस्कार सलग 18व्या वर्षी पटकावला. नदालला स्टीफन एडबर्ग खिलाडीवृत्ती पुरस्काराने सलग तिसऱ्या वर्षी सन्मानित करण्यात आले.
 • तसेच रशियाचा आंद्रेय रुबलेव्ह हा सर्वोत्तम प्रगतिकारक टेनिसपटू ठरला.

प्रौढ स्त्रीला इच्छेनुसार लग्नाचा आणि धर्मांतराचा हक्क :

 • प्रौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्विकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही, असा महत्वूपर्ण निर्णय कोलकाता हायकोर्टानं दिला आहे.
 • न्या. संजीब बॅनर्जी आणि न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे.
 • देशात सध्या लव्ह जिहाद या संकल्पनेची चर्चा असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भाजपाशासित राज्यांनी यासंदर्भात कायदे केले आहेत. लग्नासाठी जबरदस्तीनं धर्मांतर केल्यास कडक शिक्षेची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आली आहे.

दिनविशेष :

 • 23 डिसेंबरराष्ट्रीय शेतकरी दिवस
 • 23 डिसेंबर 1690 मध्ये मणिपूर साम्राज्याचे सम्राट ‘पामेबा’ यांचा जन्म झाला.
 • सन 1940 मध्ये 23 डिसेंबर रोजी वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून
 • भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
 • ‘बिजन कुमार मुखरेजा’ यांनी 23 डिसेंबर 1954 मध्ये भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • 23 डिसेंबर 2000 मध्ये केंद्र सरकारने कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास मंजुरी दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.