23 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
23 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 डिसेंबर 2019)
सरकार कायद्यात करणार सुधारणा :
- सुधारित नागरिकत्व कायद्याला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या मंत्रिमंडळाने अनेक दिलासादायक निर्णय घेतले. यामध्ये इथल्या आदिवासींना जमीन हक्काची हमी देखील सरकारने दिली आहे. यासाठी राज्यातील जुन्या जमीन हक्क कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.
- राज्य सरकार इथल्या मूळ लोकांसाठी कायद्यात बदल करणार आहे. या बदलानुसार, अशा मूळ स्थानिक आसामी लोकांसाठी जमिनीचे हक्क राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासाठी जमीन हक्कांबाबतचे नवे सुधारित विधेयक पुढील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
- तसेच या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊन त्याची एकदा अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर केवळ या मूळ आसामी लोकांनाच इथल्या जमिनी विकता येतील तसेच विकत घेता येतील.
Must Read (नक्की वाचा):
हेटमायर TOP 3 मध्ये मध्ये दाखल :
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्यात धडाकेबाज फलंदाज शेमरॉन हेटमायरने आणखी एक विक्रमी कामगिरी केली आहे.
- तर आपल्या संघाला वन-डे मालिकेत पहिला सामना जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हेटमायरने इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गनला मागे टाकलं आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2018 पासून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हेटमायर आता तिसऱ्या स्थानी आला आहे.
- भारताविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात हेटमायरने 37 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. भारताकडून आपला पहिला वन-डे सामना खेळणाऱ्या नवदीप सैनीने हेटमायरला माघारी धाडलं.
नैसर्गिक मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता अर्थसाहाय्य मिळणार :
- ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय,’ या बिरुदावलीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाखांहून अधिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
- तर पोलीस महासंचालक विशेष साहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाईल.
- पोलीस शिपाई ते सहायक फौजदार या दर्जापर्यंतच्या अंमलदारांच्या वारसांना ही मदत मिळेल. दिवंगतांच्या वारसांना शासनातर्फे मिळणारा निधी, मदतीव्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाईल. याची अंमलबजावणी तातडीने करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना नुकतेच दिले आहेत.
- विविध घटनांमध्ये ‘ऑनड्युटी’ मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शासनाकडून वेगवेगळे अनुदान, विम्याची रक्कम, तसेच पोलीस कल्याण निधीतून विविध स्वरूपात मृतांच्या वारसांना मदत दिली जाते. मात्र, अंमलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास यापूर्वी त्यांच्या वारसांना पोलीस कल्याण निधीतून अत्यल्प मदत दिली जात होती. त्यामुळे या रकमेच्या स्वरूपात वाढ करावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून अंमलदार वर्गातून केली जात होती.
रोहित शर्माने मोडला 22 वर्षांपूर्वीचा विक्रम :
- भारताचा सलामीवीर आणि उप कर्णधार रोहित शर्माने 22 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम मोडीत काढताना रोहितने भल्या भल्या फलंदाजांना मागे सारले आहे.
- रोहितने या एका वर्षात 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 25 सामन्यांमध्ये रोहितने 2400 धावांचा पल्ला पार केला आहे.
- तर यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा माजी धडाकेबाद सलामीवीर सनथ जयसूर्याच्या नावावर होता. जयसूर्याने एका वर्षात सलामीवीर म्हणून 2387 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीतने तब्बल 22 वर्षांनी मोडीत काढला आहे.
दिनविशेष :
- 23 डिसेंबर – राष्ट्रीय शेतकरी दिवस
- 23 डिसेंबर 1690 मध्ये मणिपूर साम्राज्याचे सम्राट ‘पामेबा’ यांचा जन्म झाला.
- सन 1940 मध्ये 23 डिसेंबर रोजी वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
- ‘बिजन कुमार मुखरेजा’ यांनी 23 डिसेंबर 1954 मध्ये भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- 23 डिसेंबर 2000 मध्ये केंद्र सरकारने कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास मंजुरी दिली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा