23 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 August 2018 Current Affairs In Marathi

23 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2018)

अॅपल कंपनीतर्फे देशात मेगा भरती:

  • तंत्रज्ञानातील दिग्गज कंपनी अॅपलने भारतात तरुणांसाठी मेगा भरती काढली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील अॅपलच्या कार्यालयात देशातील प्रतिभावंत तरुणांना नोकरी मिळण्याची संधी आहे.
  • कंपनीने येथील आपल्या कार्यालयात नुकतीच 3 हजार 500 जणांची नियुक्ती केली असून ही संख्या 5 हजारापर्यंत नेण्याचा कंपनीचा विचार आहे.
  • तेलंगणा सरकारमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. अॅपलने तेलंगणामधील कार्यालयात 3 हजार 500 जणांची नियुक्ती केली आहे, लवकरच ही संख्या 5 हजार करण्याचा कंपनीचा विचार आहे, त्यामुळे अजून दीडहजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती येथे होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. पण, ही भरती केव्हापर्यंत होणार याबाबत कंपनीकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
  • गेल्या वर्षी मे महिन्यात अॅपल कंपनीने तेलंगणामध्ये विकास केंद्राची स्थापना केली होती. त्यावेळी या विकास केंद्रामुळे 4 हजार जणांना रोजगार मिळू शकतो, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. या केंद्रामध्ये कंपनीकडून आयफोन, आयपॅड, मॅक आणि अॅपल वॉच या उत्पादनांवर काम केले जाते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2018)

आशियाई स्पर्धेत महाराष्ट्रीयन राहीला सुवर्णपदक:

  • आशियाई खेळांच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राच्या राही सरनौबतने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. 25 मीटर पिस्तुल प्रकारात राहीने सुवर्णपदक पटकावले. असा पराक्रम करणारी राही ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.
  • पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपले अव्वल स्थान कायम राहिले होते. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. Rahi
  • अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे 4-4 गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने 3-2 ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
  • राहीने भारतासाठी सुर्वण पदक जिंकताच नेटकऱ्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. हे पदक जिंकल्यानंतर काही वेळातच ट्विटवर #RahiSarnobat हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होत होता.

भारतीय संघाचा हॉकीतील 86 वर्षांचा विक्रम मोडीत:

  • भारताने पुरुष हॉकीतील धडाका कायम राखताना हॉंगकॉंग चीनचा 26-0 असा धुव्वा उडवला. भारताने आपला सर्वाधिक मोठ्या विजयाचा 86 वर्षांचा विक्रम मोडण्यात यश मिळवले, त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठा विजयही संपादन केला.
  • दोन दिवसांपूर्वी भारताने यजमान थायलंडला 17-0 असे हरवले होते, त्या वेळी स्पर्धा इतिहासातील पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या विजयाची बरोबरीच झाली होती. मात्र या वेळी भारतीय हॉकी संघाने जास्तच आक्रमक खेळ केला. भारताने अमेरिकेतील ऑलिंपिकमध्ये यजमानांना 24-1 हरवले होते. तो विक्रम आज मागे पडला.
  • भारताने हॉंगकॉंगविरुद्ध मिळवलेला विजय हा हॉकीतील सर्वाधिक मोठ्या विजयात अकराव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने पापुआ न्यू गिनीविरुद्ध 39-0 असा विजय संपादला होता, असे हॉकी सांख्यिकी तज्ज्ञ बी.जी. जोशी यांनी सांगितले. मात्र हॉकीत सर्वात मोठा विजय मिळवलेल्या आशियाई क्रमवारीत भारत अव्वल आहे, असेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन:

  • ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे 22 ऑगस्ट रोजी दिल्लीत निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते.
  • कुलदीप नय्यर यांना 2015 मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देशातील विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता व राजकीय क्षेत्रात दुख: व्यक्त होत आहे.
  • कुलदीप नय्यर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1923 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला होता. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे संपादकपद भूषविलेले नय्यर पत्रकारितेच्या आणीबाणीविरोधातील लढाईचे प्रतीक बनले होते. त्यावेळच्या सरकारी हस्तक्षेपाविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नय्यर यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले होते. Kuldip Nayar
  • पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात कुलदीप नय्यर हे उर्दू वर्तमानपत्रासाठी काम करायचे. दिल्लीतील ‘द स्टेट्समन‘ या वृत्तपत्राचे ते संपादक होते. मानवाधिकार कार्यकर्ते आणि शांततेसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जायचे.
  • 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. ऑगस्ट 1997 ते राज्यसभेत खासदार म्हणून गेले होते. 1990 मध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • इंडियन एक्स्प्रेससह डेक्कन हेराल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यू, ट्रिब्यून पाकिस्तान, डॉन पाकिस्तान अशा 80 हून अधिक वृत्तपत्रांसाठी 14 भाषांमध्ये त्यांनी स्तंभलेखन केले होते. इंडिया आफ्टर नेहरु, इमर्जन्सी रिटोल्ड अशी 15 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ‘पार्क अॅम्बेसिडर’पदी अभिनेत्री रविना टंडन:

  • अभिनेत्री रविना टंडनने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचीउद्यान राजदूत आणि पार्क अॅम्बेसिडर‘ म्हणून काम स्वीकारले आहे.
  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 ऑगस्ट 2018 ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची राजदूत होण्याची रविना टंडन यांना पत्रान्वये विनंती केली होती. 22 ऑगस्ट रोजी मुनगंटीवार यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 274 पेक्षा अधिक पक्षांच्या प्रजाती आढळतात. प्राण्यांच्या 35 आणि वृक्षांच्या 1100 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. उद्यानात सिंह आणि व्याघ्र सफारीमुळे पर्यटकांचे हे विशेष आकर्षण आहे.
  • वनमंत्री मुनगंटीवार यांनी लिहीलेल्या पत्रात त्यांनी 13 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पुर्ण झाल्याचे सांगून संकल्प काळात राज्यात लोकसहभागातून 15 कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड झाल्याचे नमूद केले होते.

दिनविशेष:

  • 23 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन‘ आहे.
  • सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध- जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा 23 ऑगस्ट 1918 रोजी धालगल सिंधुदुर्ग येथे जन्म झाला.
  • सन 1991 मध्ये 23 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
  • कविवर्य विंदा करंदीकर यांना सन 2005 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.