22 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर यशस्वी अवतरण केले:
ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर यशस्वी अवतरण केले

22 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2020)

ब्राझीलमध्ये मानवी लस चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू:

  • ब्राझीलमध्ये मानवी लस चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे.
  • अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचणी दरम्यान या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने बुधवारी सांगितले.
  • स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असला तरी, लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे.
  • ज्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, तो कंट्रोल ग्रुपचा भाग होता. त्याला मेनिनजायटिसची लस देण्यात आली होती.
  • स्वयंसेवकाला ट्रायल व्हॅक्सीन न देता प्लेसीबो देण्यात आले होते, असे ओ ग्लोबो या ब्राझीलियन वर्तमानपत्राने म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2020)

ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर यशस्वी अवतरण केले:

  • नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत.
  • हे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले आहे.
  • दी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले.
  • तेथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने 2023 पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत.
  • बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून 321 दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.

बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेडचे विजय- चॅम्पियन्स लीग फुटबॉल :

  • लिओनेस मेसीने पेनल्टीवर पहिला गोल केल्यानंतर बार्सिलोनाने जोरदार ‘गोलधडाका’ सुरू केला. त्यामुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये बार्सिलोनाने बुधवारी हंगेरीच्या फेरेन्कवारोस संघाचा 5-1 असा धुव्वा उडवला.
  • मँचेस्टर युनायटेड आणि युव्हेंटस या संघांनी आपापले सामने जिंकले.
  • मेसीने 27व्या मिनिटाला पेनल्टीवर बार्सिलोनाचे खाते खोलले, त्यानंतर अन्सू फाटी, फिलिपे कुटिन्हो, प्रेडी आणि औसमाने डेम्बेले यांनी गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला.
  • मेसीने चॅम्पियन्स लीगमधील 116व्या गोलची नोंद केली. सलग १६ मोसमांत किमान एक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.

दिनविशेष :

  • 22 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन
  • 22 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
  • 22 ऑक्टोबर 4004 मध्ये ई. पू. उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
  • निकोला टेस्ला यांनी 22 ऑक्टोबर 1927 मध्ये सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
  • पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर 1963 मध्ये भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
  • 22 ऑक्टोबर 2008 मध्ये भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.