22 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

22 May 2019 Current Affairs In Marathi

22 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 मे 2019)

इस्रोकडून ‘रीसॅट-2बी’ उपग्रहाचे प्रक्षेपण:

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘पीएसएलव्हीसी 46’ चे यशस्वी प्रक्षेपण केले.
 • तसेच, ‘पीएसएलव्हीसी 46’ ने भारतीय रडार पृथ्वीची पाहणी करणारा ‘रीसॅट-2बी’ या उपग्रहास देखील 555 किलोमीटर उंच असलेल्या पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या नेऊन ठेवले.
 • ‘पीएसएलव्हीसी’ ची ही 48 वी भरारी आहे. तर रीसॅट-बी हा उपग्रह मालिकेतील चैाथा उपग्रह आहे.
 • तसेच या उपग्रहाची गुप्त पाहणी, कृषि, वन व आपत्ती व्यवस्थापनात मदत होणार आहे. या उपग्रहाचे वजन 615 किलो असून प्रक्षेपणानंतर केवळ 15 मिनीटातच त्याने पृथ्वीची पहिली कक्षा ओलांडली आहे.
 • तर रीसॅट-बी बरोबर सिंथेटिक अपर्चर रडार (सार) इमेजर देखील पाठवले आहे. यामुळे संचार सेवा कायम राहिल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मे 2019)

किलोग्रॅमसह चार एककांच्या व्याख्यात बदल :

 • जगभरात किलोग्रॅम, केल्विन, मोल, अ‍ॅम्पियर यांच्या व्याख्या बदलण्यात आल्या असून त्याबाबत करण्यात आलेला जागतिक ठराव भारताने मान्य केल्याने आता देशातील क्रमिक पुस्तकात त्यांच्या व्याख्या बदलण्यात येणार आहेत.
 • तसेच प्रत्यक्ष व्यवहारात त्याचे कुठलेही फार मोठे परिणाम जाणवणार नाहीत पण जिथे अगदी सूक्ष्म पातळीवरचे मापन महत्त्वाचे ठरते, अशा संशोधनात त्यामुळे मोठा फरक पडणार आहे.
 • तर एकूण 100 देशांनी मापनाची मेट्रिक पद्धती मान्य केली असून ती 1889 पासून अमलात आहे, याचा अर्थ 130 वर्षांनी या मापनांमध्ये बदल करण्यात आला आहे.
 • सेकंद, मीटर व कँडेला ही वेळ, लांबी, प्रकाशाची तीव्रता यांची मापन एकके आहेत. त्यांच्या व्याख्या आधीच बदलण्यात आल्या आहेत.तर हे स्वीकारण्यात आलेले बदल आता ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, इंडियन
  इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी , नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व इतर शैक्षणिक संस्थांना कळवण्यात आले आहेत.
 • जागतिक मापन मानके ही इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स या संस्थेकडून ठरवली जातात.
 • तसेच भारत 1957 पासून या संस्थेचा सदस्य आहे. ही संस्था पॅरिस येथे असून तिथे एका बरणीत प्लॅटिनम इरिडियमचे एक सिलिंडर ठेवलेले आहे, या सिलिंडरचे वस्तुमान म्हणजे 1 किलोग्रॅम इतके वजन आहे असे 1889 पासून मानले जाते. ते किलोग्रॅमचे आंतरराष्ट्रीय रूप मानले जाते.
 • भारतात नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीत असेच वजन एनपीके 57 ठेवलेले असून ते या आंतरराष्ट्रीय सिलिंडरसारखेच आहे, ते एक किलो मानले जाते.तर पूर्वी एक किलो वजन म्हणजे 1 किलो अधिक उणे 15-20 मायक्रोग्रॅम असा फरक मान्य करण्यात आला होता. पण आता नवीन व्याख्येनुसार 1 किलो वजन अधिक उणे 1 किंवा 1 नॅनोग्रॅम कमी जास्त असा बदल केला आहे.

हुआवैवरील बंदीच्या अमलास तीन महिन्यांची मुदतवाढ :

 • चीनच्या हुआवै कंपनीवरील बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी तीन महिने लांबणीवर टाकण्याचे अमेरिकेने ठरवले आहे.
 • हुआवै ही चीनची दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून लगेच बंदी लागू केली तर त्याचे वेगळे परिणाम होऊ शकतात हे लक्षात आल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.
 • अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी हुआवै कंपनीवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता. अमेरिकी व परदेशी दूरसंचार कंपन्या हुआवैच्या उपकरणांवर अवलंबून आहेत त्यामुळे या कंपनीवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर त्यांना आता पर्यायी
  उपाययोजना कराव्या लागणार असून त्यासाठी वेळ मिळावा याकरिता बंदीच्या अंमलबजावणीला तीन महिने मुदतवाढ देण्यात आल्याचे व्यापार मंत्री विल्बर रॉस यांनी सांगितले.
 • हुआवै ही जगातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून फाइव्ह जी मोबाइल तंत्रज्ञानातही अग्रेसर आहे.
 • या कंपनीशी अमेरिकेची दुश्मनी ही तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्वातून सुरू झालेली आहे. हुआवै कंपनीने चीनच्या लष्कराला टेहळणी करण्यास उपयुक्त ठरतील अशी काही उपकरणे त्यांच्या यंत्रणांमध्ये बसवली आहेत असा आरोप अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी केला आहे.

दिनविशेष :

 • 22 मे : जागतिक जैवाविविधता दिन
 • समाजसुधारक, धर्मसुधारकब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा 22 मे 1772 रोजी जन्म झाला.
 • 22 मे 1762 मध्ये स्वीडन आणि प्रशियामध्ये हॅम्ब्बुर्गचा तह झाला.
 • राइट बंधूंनी उडणार्‍या यंत्राचे (Flying Machine) पेटंट 22 मे 1906 मध्ये घेतले.
 • विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म सन 1783 मध्ये 22 मे रोजी झाला.
 • 22 मे 1972 रोजी सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
 • भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 रोजी सूत्रे हाती घेतली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मे 2019)

You might also like
1 Comment
 1. dhiraj says

  nice

Leave A Reply

Your email address will not be published.