22 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

22 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 मार्च 2020)

पृथ्वीकडे सरकतायत चार नवीन लघुग्रह :

 • नासानं नव्या चार लघुग्रहांसंबंधी इशारा दिला आहे. अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह वेगानं पृथ्वीच्या दिशेनं सरकत आहेत. त्यामुळे काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पण हे लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून, पृथ्वीला कोणतंही नुकसान होणार नसल्याचा दावाही या शास्त्रज्ञांनी केला आहे.
 • 21 आणि 22 मार्चदरम्यान दोन लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. सर्वाधिक जवळून जाणारा लघुग्रह 7,13,000 किलोमीटर दूर असेल. अवकाश विज्ञानाच्या जगतात हे अंतर जास्त समजले जात नाही. या व्यतिरिक्त आणखी एक लघुग्रह 3.05 दशलक्ष किलोमीटरच्या अंतरावरून जाणार आहे.
 • तर या लघुग्रहांना 020 FK, 2020 FS, 2020 DP4 आणि 2020 FF1 अशी नावे देण्यात आली आहेत.
 • 2020 FK हा सर्वात लहान लघुग्रह आहे, ज्याचा व्यास फक्त 43 फूट आहे. तो ताशी 37 हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. 2020 FS हा लघुग्रह 56 फूट व्यासाचा आहे, तर तो ताशी 15 हजार किलोमीटर वेगाने पुढे
  जात आहे. भारतीय वेळेनुसार ते लघुग्रह रात्री 8.57 वाजता पृथ्वीच्या जवळून जातील.
 • तसेच आज सर्वात मोठा लघुग्रह 2020 DP4 पृथ्वीच्या जवळून जाईल. हा लघुग्रह चारपैकी सर्वात मोठा आहे. त्याचा व्यास 180 फूट आहे, तर तो ताशी 47 हजार किलोमीटर वेगाने पुढे सरकतो आहे.
 • याशिवाय 2020 एफएफ 1 व्यासाच्या लघुग्रहाचा आकार 48 फूट आहे. 23 मार्च 2020 रोजी भारतीय वेळेनुसार DP4 दुपारी 12.04 वाजता जवळून जाईल. तर 2020 FF1 सकाळी 3.39 वाजता निघणार असून, या लघुग्रहानं कोणतेही नुकसान होणार नसल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. नासाची या सर्व घटनाक्रमावर नजर आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मार्च 2020)

PAN नंबर न दिल्यास भरावा लागणार दुप्पट टॅक्स :

 • केंद्रानं पॅन कार्डाचं महत्त्व वाढवण्यासाठी आर्थिक वर्षं 2020-21 मध्ये एक प्रस्तावही ठेवला आहे. या प्रस्तावानुसार पॅन कार्ड नसल्यास परदेश प्रवासादरम्यान जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
 • 206C कलमानुसार परदेश प्रवासावर TCS लावण्यात आला आहे. जर पॅन नंबर नसेल तर दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे.
 • वित्त विधेयकाच्या नव्या नियमांनुसार, परदेश प्रवासात खर्च होणाऱ्या एकूण पॅकेजवर 5 टक्के टॅक्स कलेक्शन एट सोर्स (टीसीएस) स्वतंत्रपणे द्यावा लागणार आहे.
 • तसेच टूर पॅकेज घेणाऱ्यांकडे पॅन नंबर नसल्यास त्यांना एकूण पॅकेजच्या 10 टक्के टीसीएस भरावा लागणार आहे. म्हणजे पॅन नंबर नसल्यास दुप्पट टॅक्स चुकवावा लागणार आहे. सरकारी आकड्यांनुसार, देशभरात 1.5 कोटी लोक टॅक्स देतात, तर तीन कोटी लोक वर्षभरात परदेश दौरे करतात.
 • जर कोणत्याही टूर पॅकेजचा खर्च 1 लाख रुपये असल्यास त्याला स्वतंत्रपणे 5000 रुपये TCS द्यावा लागणार आहे.
 • टूर्स आणि ट्रॅव्हल कंपनी पॅकेजनुसार TCS वसूल करणार आहे. टीसीएसची रक्कम सरकारच्या तिजोरीत जाणार आहे.
  आयटीआर फाइल करताना टीडीएसची रक्कम परत मिळवण्यासाठी अर्जही करता येणार आहे. पण त्यात परदेश दौऱ्याचा उल्लेख करावा लागणार आहे.

मास्क, सॅनिटायजरच्या किंमती केल्या निश्चित :

 • करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात सध्या चिंतेचं वातावरण आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी करोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारचा आरोग्य विभाग आणि राज्य सरकारी यंत्रणा झटत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत.
 • तर करोनाच्या प्रादुर्भावानंतर नागरिकांनीही मास्क आणि हँड सॅनिटायजर विकत घेण्यासाठी मेडीकल दुकानांवर गर्दी केली आहे.
 • राज्यात अनेक ठिकाणी दुकानदार मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजर करत असल्याचं समोर आलं होतं. हा प्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचं पाऊल टाकलं आहे.
 • केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी, ट्विटर अकाऊंटवरुन, मास्क आणि सॅनिटायजरच्या किमती केंद्र सरकारने निश्चित केल्याचं सांगितलं आहे. ज्यामध्ये मास्कसाठी 8 ते 10 रुपये आणि सॅनिटायजरच्या 200 मि.ली बाटलीची किंमत ही 100 रुपये असेल असं पासवान यांनी जाहीर केलं.

दिनविशेष:

 • 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन‘ आहे.
 • यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म 22 मार्च 1924 मध्ये झाला होता.
 • सन 1945 मध्ये अरब लीगची स्थापना झाली.
 • हमीद दलवाई यांनी 1970 यावर्षी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
 • सन 1999 मध्ये लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.