22 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

22 July 2018 Current Affairs In Marathi

22 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 जुलै 2018)

हिमा दासने घडवला इतिहास :

  • हिमा दासने 20 वर्षांखालील गटाच्या जागतिक स्पर्धेत 400 मीटर धावण्याची शर्यत जिंकून इतिहास घडवला आहे.
  • अ‍ॅथलेटिक्स हा खेळांचा राजा मानला जातो व जागतिक स्तरावर पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडा प्रकार म्हणून त्याची ओळख आहे.
  • यापूर्वी नीरज चोप्राने 2016 मध्ये वरिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेतील थाळीफेक या क्रीडा प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती.
  • सीमा पुनियाने 2002 मध्ये तर नवजित कौरने 2014च्या जागतिक स्पर्धेतील थाळीफेकमध्येच कांस्यपदक मिळवले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जुलै 2018)

वस्तू आणि सेवाकरातून 17 उत्पादनांसाठी करकपात :

  • विविध स्त्रीसंघटनांकडून सातत्याने सुरू असलेली मागणी मान्य करीत वस्तू आणि सेवाकर मंडळाने सॅनिटरी पॅड पूर्ण
    GST
    GST

    करमुक्त केले आहेत.

  • त्याचबरोबर बहिणीकडून बांधल्या जात असलेल्या राख्यांनाही पूर्ण करमाफी देण्यात आली आहे.
  • तसेच रंग, 68 इंचापर्यंतचे छोटे दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशिन, पाणी तापवणारे हीटर, इस्त्री, फ्रिज, हेअर ड्रायर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स तसेच मिक्सर, ज्यूसर आदी 17 उपकरणांवरील जीएसटी 28 टक्क्य़ांवरून 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
  • तर मोबाइल, लॅपटॉप, विद्युत मोटारगाडय़ा, विद्युत दुचाकी आदींमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीवरील जीएसटीही कमी करण्यात आला आहे.

जर्मनीमधील स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजांना रौप्यपदक :

  • त्रिशा देब, ज्योती सुरेखा आणि मुस्कान किरार यांच्या महिला भारतीय तिरंदाजी संघाने जर्मनीच्या बर्लिन शहरात सुरु असलेल्या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
  • अंतिम फेरीत भारतीय महिलांना फ्रान्सच्या संघाकडून 229-228 असा एका गुणाच्या फरकामुळे पराभव स्विकारावा लागला.
  • तर उपांत्या फेरीत भारतीय महिलांनी अव्वल मानांकित तुर्कीच्या संघावर 231-228 अशी मात केली होती.
  • दरम्यान, मिश्र गटात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा यांनी मिश्र गटात भारताला कांस्यपदक जिंकून दिले. त्यांनी टर्कीवर 156-153 असा विजय मिळवला होता.

नीट’मध्ये अतिरिक्त गुण देण्याच्या निर्णयाला स्थगिती :

  • “नीट” परीक्षेवेळी प्रश्‍नपत्रिकेतील चुकीच्या भाषांतरामुळे नुकसान झाल्याचे मान्य करत तमिळ भाषेत परीक्षा देणाऱ्या NEETविद्यार्थ्यांना 196 अतिरिक्त गुण देण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
  • उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आव्हान दिले होते.
  • तसेच आपण अशा पद्धतीने गुण वाटू शकत नाही,’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावत यातून मार्ग काढण्याबाबत पर्याय सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
  • यंदा झालेल्या “नीट” परीक्षेच्या तमिळ भाषेतील प्रश्‍नपत्रिकेमध्ये 49 प्रश्‍नांमध्ये भाषांतराच्या चुका आढळून आल्या होत्या.
  • तर या प्रत्येक प्रश्‍नासाठी चार गुण देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

दिनविशेष :

  • 22 जुलै 1908 मध्ये देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 6वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती.
  • पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची 22 जुलै 1944 मध्ये सुरुवात झाली.
  • 22 जुलै 1898 मध्ये शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जुलै 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.