22 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
22 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 डिसेंबर 2021)
भारतविरोधी यूट्यूब वाहिन्या, संकेतस्थळांवर बंदी :
- राष्ट्रविरोधी माहिती आणि खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने 20 यूट्यूब वाहिन्या आणि दोन संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
- तर माहिती प्रसारण खात्याने सोमवारी याबाबत दोन आदेश काढले.
- तसेच यूट्यूबला आदेश देऊन 20 वाहिन्या बंद करण्यास सांगितले, तर दोन संकेतस्थळांवरही बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत.
- यूट्यूबवरील 20 वाहिन्या पाकिस्तानातून चालवल्या जात असून त्यांद्वारे भारतासंबंधी संवेदनशील विषयांबाबत चुकीची आणि तथ्यहीन माहिती आणि बातम्या प्रसारित केल्या जातात.
Must Read (नक्की वाचा):
विवाह वयाचे विधेयक स्थायी समितीकडे :
- महिलांचे विवाहाचे कायदेसंमत वय 18 ऐवजी 21 करणारे बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्ती विधेयक केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी लोकसभेत सादर केले.
- पण विरोधकांनी घेतलेल्या अनेक आक्षेपांनंतर हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आले. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने या दुरुस्ती विधेयकाला मान्यता दिली होती.
- तर वेगवेगळ्या धर्मांमध्ये मुलींच्या लग्नाचे किमान वय वेगवेगळे असून या दुरुस्तीद्वारे सहा व्यक्तिगत कायद्यांमध्ये बदल केले जातील आणि मुलींच्या लग्नाचे कायदेसंमत वय मुलांप्रमाणे 21 वर्षे केले जाईल.
- भारतीय ख्रिश्चन, पारशी, मुस्लीम, हिंदू या धर्मांतील लग्न व घटस्फोट कायदे, तसेच विशेष विवाह कायदा आणि परदेशी विवाह कायदा आदी कायद्यांमध्ये या विधेयकाद्वारे दुरुस्ती केली जाणार आहे.
प्रो कबड्डीचा आठवा हंगाम आजपासून :
- प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम आजपासून बेंगळूरुच्या हॉटेलमध्ये रंगणार असून, याकरिता 12 संघ सज्ज झाले आहेत.
- तर हे सामने जैव-सुरक्षा परिघात होणार असून, प्रेक्षकांना ते टेलिव्हिजनवरच पाहता येणार आहेत.
- माजी विजेते यू मुंबा आणि बेंगळूरु बुल्स यांच्यातील सामन्यात आठव्या हंगामाला प्रारंभ होईल.
- त्यानंतर तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायव्हाज या दाक्षिणात्य संघांमधील झुंज रंगेल, तर तिसरा सामना गतविजेते बंगाल वॉरियर्स आणि यूपी योद्धा यांच्यात होईल.
- हंगामाच्या प्रारंभीचे चार दिवस व त्यानंतर प्रत्येक शनिवारी तीन सामने होणार आहेत.
दिनविशेष:
- 22 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय गणित दिन‘ आहे.
- सन 1851 मध्ये भारतातील पहिली मालगाडी रूरकी येथे सुरू करण्यात आली.
- भारतीय तत्त्वज्ञ ‘सरदादेवी‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1853 मध्ये झाला होता.
- थोर भारतीय गणिती ‘श्रीनिवास रामानुजन‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.
- भारतातील विश्वभारती विद्यापीठ सन 1921 मध्ये सुरू झाले.