22 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

राष्ट्रीय गणित दिन
राष्ट्रीय गणित दिन

22 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2020)

अनेक देशांकडून ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध :

  • ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली असून फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत.
  • जर्मनी, बल्गेरिया, आयरिश प्रजासत्ताक, तुर्कस्तान व कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताकडूनही विमानांवर बंदी लागू करण्यात आली आहे.
  • ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर ज्या देशांनी निर्बंध लादले त्यात हाँगकाँग, इस्रायल, इराण, क्रोएशिया, अर्जेटिना, चिली, मोरोक्को व कुवेत यांचा समावेश आहे.
  • करोना विषाणूचा हा नवीन प्रकार सत्तर टक्के संक्रमणशील व संसर्गजन्य असून आरोग्य तज्ज्ञांनी असे म्हटले आहे, की हा विषाणू घातक नाही, तो लशींना दाद देत नाही हेही खरे नाही.
  • UK अर्थात युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2020)

गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार लस :

  • युनिसेफने पुढाकार घेतला असून जगातील गरजू देशांना महिन्याला 850 टन करोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार आहे. या कामात कोणत्याही प्रकारचा अभाव ठेवला जाणार नाही, तसेच प्राधान्याने हे काम केले
    जाईल.
  • तर करोना प्रतिबंधक लस विविध देशांमध्ये पोहोचवण्यासाठी व्यावसायिक विमानांचाच वापर करण्यात येईल. जर गरज पडलीच तर चार्टर्ड विमानही वापरली जातील.
  • या जीवघेण्या आजारावर लस विकसित करणाऱ्या देशांकडून गरीब देशांमध्ये 70 हजार फ्रीजची खरेदी करुन ते पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत बसवले जातील.
  • तर या आधुनिक फ्रीजच्या माध्यमातून करोना महामारीच्या लसीच्या उपलब्धतेचा परीघ वाढवण्यात येईल. ‘कोवैक्स’ लसीला सुरक्षित ठेवण्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानाची गरज असते. या कामात हे फ्रीज महत्वाची भूमिका बजावतील.
  • तसेच या फ्रीजची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे हे फ्रीज सौर ऊर्जेवर चालतील.

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेत ललिता, कविताचा समावेश :

  • ऑलिम्पियन धावपटू ललिता बाबर आणि कविता राऊत यांचा महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या दोन समित्यांवर समावेश करण्यात आला आहे.
  • ललिता ही शिस्तपालन समितीची अध्यक्ष असेल तर कविताकडे अ‍ॅथलेटिक्स आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सतीश उचिल यांनी दिली.
  • तर रविवारी झालेल्या निवडणुकीत माजी ऑलिम्पियन आदिल सुमारीवाला हे पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले.
  • कविताने 2010च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 हजार मीटर आणि 5 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावले होते. 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने कांस्यपदकाची कमाई केली होती.
  • तर ललिताने 2014च्या आशियाई स्पर्धेत स्टिपलचेस प्रकाराचे कांस्यपदक पटकावले होते.

विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धात सिम्रनजीत, मनीषाचे सुवर्णयश :

  • भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली.
  • तर अमित पंघालच्या सुवर्णपदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिम्रनजीत कौर आणि मनीषा मौन यांनी शनिवारी रात्री सुवर्णयश संपादन केले.
  • तसेच मनीषाने भारताच्याच साक्षी चौधरी हिचा 3-2 असा पराभव केला. साक्षीने पहिल्या फेरीत जोरदार ठोसे लगावत मनीषासमोर कडवे आव्हान उभे केले होते.
  • भारताने नऊ पदके मिळवत या स्पर्धेत सर्वसाधारण दुसरे स्थान प्राप्त केले.

दिनविशेष:

  • 22 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय गणित दिन‘ आहे.
  • सन 1851 मध्ये भारतातील पहिली मालगाडी रूरकी येथे सुरू करण्यात आली.
  • भारतीय तत्त्वज्ञ ‘सरदादेवी‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1853 मध्ये झाला होता.
  • थोर भारतीय गणिती ‘श्रीनिवास रामानुजन‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.
  • भारतातील विश्वभारती विद्यापीठ सन 1921 मध्ये सुरू झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2020)

You might also like
2 Comments
  1. umesh says

    Hi dhansri rhanx for information gm

  2. Vikram says

    full satisfaction

Leave A Reply

Your email address will not be published.