22 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

न्या. मृदुला भाटकर
न्या. मृदुला भाटकर

22 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 एप्रिल 2020)

‘मॅट’च्या चेअरमनपदी न्या. मृदुला भाटकर यांची निवड :

 • महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण अर्थात ‘मॅट’च्या चेअरमनपदी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 7 एप्रिल रोजी त्यांनी आपल्या या पदाचा कार्यभार स्वीकारला.
 • ‘मॅट’च्या स्थापनेपासून आतापर्यंत गेल्या 28 वर्षात पहिल्यांदाच एका महिलेला चेअरमन पदाचा बहुमान मिळाला आहे.
 • तसेच 8 जुलै 1991 ला मुंबई ‘मॅट’ची स्थापना करण्यात आली. औरंगाबाद व नागपूर येथे ‘मॅट’चे खंडपीठ आहेत.
 • न्या.मृदुला भाटकर आठ महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्या. आता त्या ‘मॅट’च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 एप्रिल 2020)

दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये मिलाग्रोचे ‘रोबोट’, डॉक्टरांची करणार मदत :

 • भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. प्रत्येक देश विविध उपाययोजनांद्वारे या संकटातून बाहेर पडण्यासाठी झगडत आहे.
 • तर अशा परिस्थितीत डॉक्टरांना मदत करण्याच्या उद्देशाने रोबोटिक्स ब्रँड मिलाग्रोने आपले रोबोट दिल्ली एम्समध्ये तैनात (कार्यरत) करण्याची घोषणा केली आहे.
 • तसेच या प्रयत्नांतर्गत कंपनीच्या एआय पॉवर्ड रोबोट ‘मिलाग्रो आयमॅप 9’ आणि ‘ह्यूमनॉइड इएलएफ’च्या प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणाला आजपासून दिल्लीतील एम्सच्या अत्याधुनिक कोव्हिड-19 वॉर्डमध्ये सुरुवात झाली आहे.
 • भारतात निर्मित मिलाग्रो आयमॅप 9 हा फरशीला निर्जंतूक करणारा रोबोट असून तो ऑटोमॅटिकरित्या फरशी स्वच्छ करतो.
 • तर सोडियम हायपोक्लोराइडच्या मिश्रणाचा वापर करून हा फरशीच्या पृष्ठभागावरील कोव्हिडचे बीजाणू नष्ट करु शकतो. आयसीएमआरनेही याची प्रशंसा केली आहे.
 • एलआयडीएआरने मार्गदर्शन केलेला आणि अॅडव्हान्स एसएलएएम टेक्नोलॉजीयुक्त असा हा रोबोट न पडता स्वत:च चालतो. याव्यतिरिक्त या रोबोटमध्ये मिलाग्रोची पेटेंटे़ड रिअल टाइम टॅरेन रिकग्निशन टेक्नोलॉजी आहे जी रिअल टाइममध्ये फ्लोअर मॅपिंग करते.
 • मिलाग्रो ह्युमनॉइड ईएलएफ हा रोबोट डॉक्टरांना एखाद्या व्यक्तीशी संपर्क न करता संक्रामक कोव्हिड-19 च्या रुग्णांवर देखरेख आणि चर्चा करण्यास मदत करतो. यामुळे संसर्गाची जोखीम खूप कमी होते. तसेच आयसोलेशन वॉर्डांमध्ये कंटाळा आलेले रुग्ण रोबोटच्या मदतीने वेळोवेळी आपल्या नातेवाईकांशी बोलू शकतात. यात हाय डेफिनेशन व्हिडिओ आणि ऑडिओमध्ये सर्व घटना रेकॉर्ड करू शकतो.
 • 8 तासांची बॅटरी लाइफ असलेला हा सुमारे 2.9 किमी प्रति तास या वेगाने प्रवास करू शकतो. हा 92 सेंटीमीटर उंच असून यात 60 पेक्षा जास्त सेंसर्स आहेत. एक थ्री डी आणि एक एचडी कॅमेरा तसेच 10.1 डिस्प्ले स्क्रीन आहे. तसेच अॅडव्हान्स ह्युमनॉइडमध्ये भावना दर्शवणारे डोळेदेखील आहेत.

केरळमध्ये करोना चाचणीचा वेगवान, अचूक संच विकसित :

 • केरळमधील श्री चित्रा तिरूनाल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने करोनाचा किफायतशीर, वेगवान निदान चाचणी संच शोधून काढला असून त्यात दोन तासात चाचणीचा निकाल हाती येतो.
 • तर ‘चित्रा जीन लॅम्प एन’ असे या संचाचे नाव असून त्याच्या मदतीने केलेल्या चाचण्या जास्त विश्वासार्ह आहेत.
 • ‘रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्ट लुप मेडिएटेड अ‍ॅम्प्लिफिकेशन ऑफ व्हायल न्युक्लीइक अ‍ॅसिड’ (आरटी लॅम्प) पद्धतीने त्यात सार्स सीओव्ही 2 म्हणजे करोना विषाणूचा एन जनुक शोधून त्याच्या अस्तित्वाची खातरजमा केली जाते.
 • तसेच संस्थेच्या संचालक डॉ. आशा किशोर यांनी सांगितले, जगात कुणी या विषाणूच्या ‘एन’ जनुकावर लक्ष केंद्रित करीत आहे की नाही हे माहिती नाही. आमचे तंत्रज्ञान स्वस्त, वेगवान असून पीसीआर (पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन) पद्धतीच्या तोडीस तोड चाचण्यांचे शंभर टक्के निकाल अचूक येत आहेत. देशभरात ही चाचणी वापरता येईल, कारण ती कमी खर्चिक व अचूक आहे.
 • करोना विषाणूतील ‘एन’ जनुकाच्या संदर्भातील ही चाचणी जगातील पहिलीच असू शकते. यात ‘आरटी लॅम्प’ हे तंत्र वापरले जाते.
 • तसेच यातील चाचणी संच हा सार्स सीओव्ही 2 या विषाणूचे शरीरातील अस्तित्व शोधण्यासाठीच केलेला असून यात एन जनुकाचे दोन भाग तपासले जातात. त्यातील एका भागात उत्परिवर्तन झाले असेल तरी ही चाचणी चुकत नाही.

करोना विषाणूवर औषध बनवण्याच्या स्पर्धेत सहा भारतीय कंपन्या :

 • करोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असून, सगळेच देश सध्या करोनावर मात करण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करताना दिसत आहेत.
 • चीननंतर जगातील अनेक राष्ट्रांमध्ये पोहोचलेल्या करोना विषाणूचा झपाट्यानं प्रसार होत असून, त्यावर अद्यापही औषध न सापडल्यानं दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे. करोनावर औषध बनवण्याचे प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. औषध बनवण्याच्या स्पर्धेत सहा भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.
 • नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे. सं कांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गोव्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांचे निधन :

 • काँग्रेसचे नेते व माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांचे मंगळवारी सायंकाळी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात निधन झाले.
 • तर ते 1999 साली निवडून पहिल्यांदा निवडून येऊन दोनवेळा गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते.
 • देशप्रभू यांची कारकीर्द काँग्रेस पक्षात सुरू झाली होती. पेडणे मतदारसंघातून ते दोनवेळा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. विधानसभेतील मुलूख मैदानी तोफ अशी आपली प्रतिमा त्यांनी अल्पावधीत तयार केली होती.

दिनविशेष :

 • 22 एप्रिलजागतिक पृथ्वी दिन
 • 22 एप्रिल 1970 मध्ये पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
 • साहित्य समीक्षक ‘डॉ. अशोक रामचंद्र केळकर’ यांचा जन्म 22 एप्रिल 1929 मध्ये झाला.
 • 22 एप्रिल 1972 हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा करतात.
 • आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण होगत्या बंदीच्या मागणीसाठी 22 एप्रिल 1979 रोजी उपोषण सुरु केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 एप्रिल 2020)

You might also like
1 Comment
 1. Aj says

  🙏🙏🙏

Leave A Reply

Your email address will not be published.