21 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

आंतरराष्ट्रीय शांतता दिन
आंतरराष्ट्रीय शांतता दिन

21 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 सप्टेंबर 2022)

सनदी अधिकाऱ्याची अनुच्छेद 370 रद्द करण्याविरोधातील याचिका मागे :

 • काही महिन्यांपूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) पुनर्नियुक्ती झालेल्या शाह फैजल यांनी अनुच्छेद 370 रद्द करण्यात आल्याविरोधातील आपली सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली आहे.
 • सनदी सेवेबाहेर पडलेल्या शाह यांना या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा या सेवेत घेण्यात आले आहे.
 • त्यांची नियुक्ती सांस्कृतिक खात्यात उपसचिवपदी करण्यात आली आहे.
 • जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा राज्यघटनेतील अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर त्याविरोधात 23 याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

ऑस्करसाठी भारताकडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ची निवड :

 • चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
 • भारतीय चित्रपट महामंडळाने (एफएफआय) मंगळवारी याबाबत घोषणा केली.
 • सौराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मुलाचे चित्रपटांवरील प्रेम ‘छेल्लो शो’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
 • ‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून 14 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता.
 • ऑस्कर पुरस्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.

एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमात होणार मोठे बदल :

 • ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकापूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले जाणार अशी घोषणा केली आहे.
 • यामध्ये स्ट्राईक घेण्यापासून ते डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी धावांपर्यंत अनेक मुद्यांवर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
 • यासोबतच कोविड-19 च्या काळापासून सुरू झालेली लाळ बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • सर्व नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. या बदलांसाठीच्या सूचना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) मांडल्या आहेत.
 • साधारणपणे, आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचविलेले प्रत्येक नियम जसेच्या तसे लागू करते.

सर्वोच्च न्यायालयाची ‘बीसीसीआय’च्या घटनादुरुस्तीला मान्यता :

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)2019मध्ये घटनादुरुस्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली होती.
 • 2018मध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारताना तीन-तीन वर्षांच्या कालावधीनंतर विरामकाळ (कूलिंग-ऑफ पिरेड) ही अट मान्य केली होती.
 • मात्र, त्यानंतर एका वर्षातच ‘बीसीसीआय’ने घटनादुरुस्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
 • अखेर तीन वर्षांनी ही याचिका निकालात निघाली.
 • 14 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने ‘बीसीसीआय’मधील पदाधिकाऱ्यांच्या अनिवार्य विरामकाळाच्या घटनादुरुस्तीला परवानगी दिली.
 • तसेच काही अन्य मुद्द्यांवरही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.

दिनविशेष:

 • भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म 21 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
 • 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन तसेच आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून पाळला जातो.
 • सन 1965 मध्ये गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
 • रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना सन 1968 मध्ये झाली.
 • सन 1971 मध्ये बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.