21 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी चरणजितसिंग चन्नी
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी चरणजितसिंग चन्नी

21 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 सप्टेंबर 2021)

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी चरणजितसिंग चन्नी :

  • चरणजितसिंग चन्नी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले.
  • राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ. पी. सैनी या दोन उपमुख्यमंत्र्यांनाही शपथ दिली.
  • तर नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत विविध घोषणा करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकानुनयी राजकारणाचे संकेत दिले.
  • तसेच लहान घरांसाठी मोफत पाणीपुरवठा, वीजदरात कपात अशा घोषणा चन्नी यांनी केल्या. तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.

फेसबुकच्या सार्वजनिक धोरण संचालकपदी माजी सनदी अधिकारी राजीव अगरवाल :

  • आपले सार्वजनिक धोरण संचालक म्हणून माजी सनदी अधिकारी व उबरचे माजी कार्यकारी प्रमुख राजीव अगरवाल यांची नेमणूक केली असल्याचे फेसबुक इंडियाने जाहीर केले.
  • तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हे पद सोडलेल्या अंखी दास यांची ते जागा घेतील.
  • तसेच अगरवाल हे धोरण विकास उपक्रमांची व्याख्या निश्चित करतील. व त्यांची अंमलबजावणी करतील.
  • तर यात वापरकत्र्याची सुरक्षितता, डेटा संरक्षण व गोपनीयता यांचा समावेश असेल, असे फेसबुकने एका निवेदनात म्हटले आहे.
  • या भूमिकेत अगरवाल हे फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांच्या अखत्यारित काम करतील आणि भारतीय नेतृत्व चमूचा भाग असतील.
  • यापूर्वी त्यांनी उबरसाठी भारत व दक्षिण आशियाचे सार्वजनिक धोरण प्रमुख म्हणून काम पाहिले आहे, याचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञांनी बनवला जगातला सर्वात पांढरा रंग :

  • अमेरिकेच्या एका विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या चमूने जगातील सर्वात पांढरा रंग तयार केला आहे, जो ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धच्या लढ्याला मदत करू शकतो.
  • तसेच आतापर्यंतचा सर्वाधिक पांढरा रंग म्हणून या रंगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये प्रवेश केला आहे.
  • पर्ड्यू विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक झ्युलीन रुआन आणि त्यांच्या टीमने हा रंग विकसित केला आहे.
  • तर या रंगामुळे 98.1 टक्के सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि इन्फ्रारेड उष्णता परावर्तित होते, ज्यामुळे इमारतींच्या सभोवतालच्या हवेचे तापमान थंड होऊ शकते.
  • याचा अर्थ ते एअर कंडिशनरचा वापर कमी करू शकते. नवीन पेंट सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेपेक्षा कमी उष्णता शोषून घेतो.
  • तसेच व्यावसायिक पांढरा रंग साधारणपणे केवळ 80 ते 90 टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करतो.

दिनविशेष:

  • भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म 21 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
  • 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन तसेच आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून पाळला जातो.
  • सन 1965 मध्ये गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
  • रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना सन 1968 मध्ये झाली.
  • सन 1971 मध्ये बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.