Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

21 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

मँचेस्टर युनायटेडला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला:
मँचेस्टर युनायटेडला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला:

21 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 सप्टेंबर 2020)

4 पीबीए या औषधाने कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते:

 • करोना संसर्गावर उपयोगी ठरू शकेल असे एक नवीन औषध शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
 • लॉस एंजल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, 4 फेनिलब्युटिरिक अ‍ॅसिड (4 पीबीए) हे औषध प्राण्यांमध्ये कोविडवर गुणकारी ठरले आहे.
 • हे संशोधन ‘सायटोकिन व ग्रोथ फॅक्टर्स रिव्ह्य़ू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून कोविड रुग्णात सायटोकिन रेणू जास्त सुटत असतात.
 • 4 पीबीए या औषधाने कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते.
 • कोविड रुग्णांमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रेसिडेंट प्रोटिन हे पेशींवरचा ताण दाखवणारे रसायन रक्तातील एक निदर्शक खूण म्हणून काम करते.

52.3 टक्के युजर्स हे एकट्या जिओ नेटवर्कचे आहेत:

 • देशात इंटरनेट वापरकर्त्यांच्यां संख्येत मार्च 2020 च्या संपलेल्या तिमाहीत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 • त्यामुळे एकूण इंटरनेट युजर्सची संख्या 74.3कोटींवर पोहोचली आहे.
 • या एकूण इंटरनेट युजर्सपैकी सर्वाधिक 52.3 टक्के युजर्स हे एकट्या जिओ नेटवर्कचे आहेत.
 • 23.6 टक्क्यांसह भारती एअरटेल दुसऱ्यास्थानी तर व्होडाफोन-आयडियाची 18.7टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे.

फेलुदा कोविड टेस्टिंग बाजारात आणण्यास केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने परवानगी दिली:

 • टाटा समूहानं सीएसआयआरच्या सहकार्यानं विकसित केलेली फेलुदा कोविड टेस्टिंग किटच्या बाजारात आणण्यास केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने परवानगी दिली आहे.
 • फेलुदा ही कमी किंमतीतील कोविड टेस्टिंग किट आहे.
 • टाटा समूह आणि सीएसआयआर-आयजीआयबीनं विकसित केलेली फेलुदा ही पहिली व्यावसायिक कोविड टेस्टिंग किट आहे.
 • टाटा समूहानं सीएसआयआर-आयजीआयबी व आयसीएमसोबत या कोविड किटसंदर्भात काम केलं. जेणेकरून एक चांगल्या दर्जाची किट तयार करता येईल, ज्याचा जलद चाचण्या करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल.
 • हे मेड इन इंडिया उत्पादन असून, जे सुरक्षित आहे. विश्वासार्ह असण्याबरोबर आर्थिकदृ्ष्ट्या परवडणारे आहे,” असं आयएसआयआरनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

मँचेस्टर युनायटेडला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला:

 • मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
 • क्रिस्टल पॅलेसने युनायटेडला 3-1 असे पराभूत केले. एडी नके तिया याने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे आर्सेनलने वेस्ट हॅम युनायटेडला 2-1 असे हरवत दुसऱ्या विजयाची नोंद केली.
 • क्रिस्टल पॅलेसकडून विल्फ्रेड झाहाने दोन तर आंद्रोस टाऊनसेंड याने एक गोल करत विजयात योगदान दिले.

दिनविशेष:

 • भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म 21 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
 • 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन तसेच आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून पाळला जातो.
 • सन 1965 मध्ये गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
 • रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना सन 1968 मध्ये झाली.
 • सन 1971 मध्ये बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World