21 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
21 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2020)
ऑस्ट्रेलिया मलबार कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याचे सोमवारी भारताने जाहीर केले:
- अमेरिका आणि जपान यांच्यासह ऑस्ट्रेलियाही मलबार नौदल कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा भारताने केली असून त्याची आम्ही दखल घेतली आहे
- असे चीनने मंगळवारी स्पष्ट केले आणि लष्करी सहकार्य प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी पोषक असावे असे अधोरेखित केले.
- ऑस्ट्रेलिया मलबार कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याचे सोमवारी भारताने जाहीर केले, त्याचा अर्थ ‘क्वाड’मधील सर्व सदस्य देश कवायतींमध्ये सहभागी होणार आहेत.
- बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील महिन्यात या कवायती होणार आहेत.या नव्या घडामोडीची आम्ही दखल घेतली आहे’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही:
- करोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज महत्त्वाची माहिती दिली.
- करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही.
- मृत्यू दर रोखण्यात ही उपचार पद्धती यशस्वी ठरलेली नाही, त्यामुळे ती उपचाराच्या यादीतून वगळण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी आज दिली.
- प्लाझ्मा थेरपीविषयी बोलताना भार्गवा म्हणाले,’अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात असं दिसून आलं आहे की, करोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझा थेरपी फारशी परिणामकारक ठरली नसल्याचं दिसून आलं आहे.
- त्यामुळे करोना रुग्णांसाठी ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ती वगळ्याचा विचार सुरू आहे,” असं भार्गवा यांनी सांगितलं.
दिनविशेष :
- 21 ऑक्टोबर 1879 मध्ये थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
- सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना 21 ऑक्टोबर 1943 मध्ये झाली.
- 21 ऑक्टोबर 11943 मध्ये सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
- फ्रान्समधे स्त्रियांना 21 ऑक्टोबर 1945 मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला.
- 21 ऑक्टोबर 1833 मध्ये स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला.