21 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

21 October 2018 Current Affairs In Marathi

21 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2018)

स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर ध्वजारोहन :

 • स्वातंत्र लढ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेला आज 75 वर्षे पूर्ण झाली आहे.
 • यानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच ध्वजारोहन केले.
 • यावेळी बोलताना मोदी म्हणाले, नेताजींचा एकच हेतू होता एकच मिशन होते ते म्हणजे देशाचे स्वांतत्र्य. हीच त्यांची विचारधारा होती आणि हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते.
 • भारताने आजवर अनेक क्षेत्रात प्रगती केली असली तरी अद्याप नव्या उंचीवर पोहोचणे बाकी आहे. हेच लक्ष गाठण्यासाठी भारताचे आज 130 कोटी लोक नव्या भारताचा संकल्प घेऊन पुढे जात आहेत.

राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन :

 • राष्ट्रीय पोलीस दिवसानिमित्त राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते झाले.
 • यावेळी निमलष्करी दलाच्या जवानांच्या शौर्याची आठवण काढताना ते काही क्षण भावूक झाले.
 • दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) जवानांसाठी आता प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
 • तर 21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत लडाख येथील हॉट स्प्रिंगमध्ये शहीद झालेल्या आपल्या निमलष्करी दलाच्या 10 जवानांच्या आठवणीसाठी पोलीस स्मारक दिवस पाळला जातो.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑक्टोबर 2018)

रेल्वेत बुक करता येणार ‘टू बीएचके फ्लॅट’ :

 • तुम्हाला रेल्वेतून प्रवास करायचा असेल तर आजवर तुम्ही सेकंड एसी, थर्ड एसी किंवा अगदी फर्स्ट क्लासमधून प्रवास केला असेल.
 • मात्र आता तुम्हाला त्याहीपेक्षा आरामदायक प्रवास करायचा असेल तर तुम्ही सलून बुक करू शकता. सलुन म्हणजे एक टू बीएचके फ्लॅटच असणार आहे. ज्यामध्ये ड्रॉईंग रुम, टॉयलेट, बाथरुम आणि दोन बेडरुम असणार आहेत.
 • रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आत्तापर्यंत फक्त प्रथम श्रेणी अधिकारी आणि त्यावरील अधिकारी, मंत्री यांच्यासाठी असणारी ही सुविधा सर्वांसाठी खुली करण्याचे आदेश दिले आहेत.
 • ज्या प्रवाशांना हे लक्झरी सलून्स हवे आहेत त्यांना त्याचे शुल्क अदा करावे लागणार आहे.
 • सध्या रेल्वेकडे 336 सलून कार्स आहे. ज्यापैकी 62 एअर कंडिशन आहेत.

भारतीय खेळाडूंची प्रथमच सुवर्णपदकाची कमाई :

 • अर्जेटिनातील ब्यूनस आयर्समध्ये पार पडलेल्या तिसऱ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे.
 • भारतीय वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालनिरुंगाने भारताला युवा ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले, तर थबाबीदेवीने ज्युडो या खेळात भारताला प्रथमच आणि तेदेखील थेट सुवर्णपदक मिळवून देण्याचा सन्मान पटकावला आहे.
 • याचप्रमाणे ध्वजवाहकाचा मान देण्यात आलेल्या मनू भाकरनेदेखील विश्वास सार्थ ठरवत भारताला नेमबाजीत अजून एका सुवर्णपदकाची कमाई करून दिली आहे.
 • त्याशिवाय नऊ रौप्यपदके आणि एक कांस्यपदक अशा जबरदस्त कामगिरीमुळे युवा ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रथमच पदकसंख्या दुहेरी करण्यात यश मिळाले आहे.
 • तब्बल 13 पदकांची कमाई करीत भारताने यंदाच्या युवा ऑलिम्पिकमध्ये थेट 17व्या स्थानावर उडी घेतली आहे.

प्रविण कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :

 • भारताचा माजी गोलंदाज प्रविण कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारत असल्याचं जाहीर केलं आहे.
 • 2005-06 साली रणजी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून पदार्पण करणाऱ्या उमेश यादवने, पहिल्या दोन हंगामांमध्ये तब्बल 90 बळी घेत निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधलं होते.
 • 2007 साली जयपूर येथे पाकिस्तानविरुद्ध वन-डे सामन्यात प्रविण कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
 • तसेच चेंडू स्विंग करण्यामध्ये माहिर असलेल्या प्रविण कुमारने अल्पावधीतच टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज म्हणून नाव कमावलं.

विम्बल्डनमध्ये आता टाय-ब्रेकचा अवलंब :

 • दोन ते तीन दिवस रंगणारे सामने निकाली काढण्यासाठी आता ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने विम्बल्डनमध्ये पाचव्या सेटनंतर टाय-ब्रेकचा अवलंब करण्याचे ठरवले आहे.
 • पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये 12-12 अशी स्थिती झाल्यानंतर टाय-ब्रेकचा वापर करण्यात येईल. पुढच्या वर्षीपासून या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
 • तर निर्णायक सेट 6-6 अशा स्थितीत असताना टाय-ब्रेकचा अवलंब केला जातो. पण दोन्ही खेळाडूंनाजिंकण्याची समान संधी मिळावी, यासाठी विम्बल्डनमध्ये 12-12 अशा गुणांनंतर ही पद्धत लागू केली जाणार आहे.

जगातील सर्वात लांब सागरी सेतू चीनमध्ये :

 • चीनची मुख्य भूमी आणि हाँगकाँग यांना जोडणारा हाँगकाँग-झुहाई-मकाऊ हा जगातील सर्वात लांब सागरी पूल तयार झाला असून, तो 24 ऑक्टोबर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
 • तर पर्ल नदीच्या मुखापाशी लिंगडिंगयांग उपसागरात बांधलेला हा पूल 55 कि.मी. लांबीचा असून, त्याचे काम डिसेंबर 2009 मध्ये सुरू झाले होते.
 • अब्जावधी डॉलर खर्च करून बांधलेल्या या पुलामुळे हाँगकाँग व झुहाई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांऐवजी अवघ्या 30 मिनिटांत करता येईल जेणेकरून पर्ल खोऱ्यातील ही दोन प्रमुख शहरे अधिक जवळ येतील.

आरडीसीसी बँकेला सहकारमहर्षी पुरस्कार :

 • महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘सहकारमहर्षी’ हा सर्वोच्च पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (आरडीसीसी)ला जाहीर झाला आहे.
 • विशेष म्हणजे, 2012-13 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे पुरस्कार सुरू करण्यात आले असून, 2012-13 मध्ये आरडीसीसी बँकेला ‘सहकारनिष्ठ’, 2013-14 मध्ये ‘सहकारभूषण’ हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 • ‘सहकारमहर्षी’ हा सहकार क्षेत्रातील राज्यातील सर्वोच्च पुरस्कार असून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांमधून या पुरस्काराकरिता निवड केली जाते.
 • तसेच यामध्ये राज्यातील गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या, डेअरी, मल्टीस्टेट सहकारी बँका, हातमाग, यंत्रमाग, पणन अशा विविध एकूण 2 लाख 38 हजार सहकारी संस्था असून, त्यात शिखर संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, बिगर कृषी पतसंस्था, पणन संस्था, शेतीमाल प्रक्रि या उपक्रम संस्था, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, नागरी पतसंस्था, नोकरदारांच्या संस्था, सहकारी दुग्ध संस्था या सर्वांमधून ‘सहकारमहर्षी’ हा पुरस्कार निवडला जात असून, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या सर्वच सहकारी संस्थांमधून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

दिनविशेष :

 • 21 ऑक्टोबर 1879 मध्ये थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
 • सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना 21 ऑक्टोबर 1943 मध्ये झाली.
 • 21 ऑक्टोबर 11943 मध्ये सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
 • फ्रान्समधे स्त्रियांना 21 ऑक्टोबर 1945 मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला.
 • 21 ऑक्टोबर 1833 मध्ये स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.