21 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

BSNL
BSNL

21 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 मार्च 2020)

बीएसएनएलची महिनाभरासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा :

 • कोरोनाशी लढण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने घरी बसून काम करावे आणि विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या सगळ्या लँडलाइन ग्राहकांना एक महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे.
 • तर यासाठी एक अट अशी की, त्या ग्राहकाकडे आधीपासून इतर कोणत्याही कंपनीची ब्रॉडबँड जोडणी असायला नको.
 • बीएसएनएलचे सीएफए विवेक बंजाल म्हणाले की, या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना टोल फ्री नंबर 18003451504 वर कॉल करावा लागेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 मार्च 2020)

चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना पाच हजार रुपये आकारण्याची मुभा :

 • केंद्र सरकारने करोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी सरकारी मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांना परवानगी दिल्यानंतर आता या चाचण्यांसाठी प्रत्येकी 4500 ते 5000 रुपये आकारण्यास त्यांना अनुमती देणार असल्याचे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने म्हटले आहे.
 • तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत मंगळवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून करोना विषाणूची चाचणी करण्याची मुभा खासगी प्रयोगशाळांना देण्यात येईल, पण कुणीही ही चाचणी मोफत करण्याची तयारी दर्शवलेली नसल्याने त्यासाठी आता 4500 ते 5000 रुपये इतके शुल्क आकारण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
 • तसेच एकूण 51 खासगी प्रयोगशाळांना ही चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली असून देशात आतापर्यंत 223 जणांना संसर्ग झाला आहे.

महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन :

 • भारताचे महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
 • भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ अनुभवताना आघाडीवीर म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
 • तर 1962च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
 • 1962च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. भारतीय फुटबॉलमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) बॅनर्जी यांचा 20व्या शतकातील भारताचे महान खेळाडू म्हणून गौरव केला होता. तसेच त्यांना विशेष सन्माननीय पदकही फिफाकडून देण्यात आले होते.

दिनविशेष :

 • देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक ‘मानवेंद्रनाथ रॉय’ यांचा जन्म 21 मार्च 1887 मध्ये झाला.
 • 21 मार्च 1916 मध्ये भारतरत्न शहनाईवादक ‘बिस्मिल्ला खान’ यांचा जन्म झाला.
 • सन 1977 मध्ये भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
 • 21 मार्च 2003 मध्ये जळगाव महानगरपालीकेची स्थापना झाली.
 • सोशल मीडिया साइट ‘ट्विटर’ची स्थापना 21 मार्च 2006 रोजी झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.