21 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
21 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 जुलै 2018)
पंतप्रधान मोदींनी 4 वर्षात केला 84 देशांचा दौरा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षात 84 देशांचा दौरा केला असून यावेळी चार्टर्ड विमाने, विमानांची देखभाल आणि हॉटलाइन सुविधांसाठी एकूण 1484 कोटींचा खर्च केला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
- परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी तीन भागांत विभागणी करत एकूण किती खर्च आला याची माहिती दिली.
- आकडेवारीनुसार, 15 जून 2014 ते 10 जून 2018 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमान देखभालीसाठी एकूण 1088.42 कोटी रुपये आणि चार्टर्ड विमानांवर 387.26 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हॉटलाइनसाठी एकूण 9.12 कोटी रुपये खर्च आला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2014 मध्ये पंतप्रधानपद हाती घेतल्यापासून एकूण 84 देशांचा दौरा आतापर्यंत केला आहे.
Must Read (नक्की वाचा):
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नामंतरण होणार :
- जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या विधेयकाला विधानसभेत यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.
- विधेयकाला मंजुरी मिळण्यापूर्वी उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर सांगितले की, मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. नोव्हेंबर 2013 मध्ये सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला असून त्यात असलेले निकष पूर्ण केले जात आहेत. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे हा प्रस्ताव विचाराधीन आहे.
- राज्य सरकारकडून याचा वेळोवेळी पाठपुरावा केला जात असल्याची माहिती वायकर यांनी दिली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचे विधेयक मंजूर करताना वायकर यांनी ही माहिती दिली.
- मराठी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्यावे अशी मागणी काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केली होती. त्यावर वायकर यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही दिली.
व्हॉट्स मेसेज अॅप फॉरवर्डला लगाम लागणार :
- यापुढे व्हॉट्स अॅप युजर्सना पाचपेक्षा जास्त वेळा एखादा मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपने ‘फॉरवर्ड मेसेज‘ हे फीचर आणले होते. या फीचरमुळे ‘मुळ मेसेज‘ आणि ‘फॉरवर्ड मेसेज‘ यामधील फरक ओळखणे सहज शक्य झाले.
- गेल्या काही महिन्यंपासून व्हॉट्स अॅपवर अफवा पसरवणाऱ्या मेसेजेसचे पेव फुटले त्यामुळे असा प्रकराच्या अफवा व्हॉट्स अॅपवर वाऱ्याच्या वेगाने पसरू नये आणि त्यातून अप्रिय घटना घडू नयेत म्हणून मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा कमी करण्याचा विचार व्हॉट्स अॅप करत आहे.
- आतापर्यंत एखादा व्हिडिओ, फोटो किंवा संदेश मोठ्या प्रमाणात व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड करता यायचे. याचा फायदा होता तसाच तोटाही होता. आता मात्र व्हॉट्स अॅपवर तुफान वेगाने फॉरवर्ड होणाऱ्या याच मेसेजमुळे कित्येक अप्रिय घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपचा गैरवापर रोखण्यासाठी व्हॉट्स अॅपने हा निर्णय घेतला आहे.
- तसेच व्हॉट्स अॅप ‘फॉरवर्ड मेसेज‘या फीचरची नव्याने चाचणी करत आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यावर युजर्स व्हॉट्स अॅपवर आलेले मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाचपेक्षा जास्त व्यक्तींना फॉरवर्ड करू शकत नाही. पाच व्यक्तींना मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर फॉरवर्ड करण्याची मर्यादा संपेल आणि चॅटवरून forward button हा पर्याय नाहीसा होईल.
नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहणार :
- दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिक्स परिषदेला हजर राहण्यासाठी जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवडय़ात रवांडा आणि युगांडाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
- ब्रिक्स परिषदेत मोदी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यासह महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.
- मोदी 23 ते 27 जुलै या कालावधीत तीन देशांना भेटी देणार आहेत, सर्वप्रथम ते रवांडाला दोन दिवस भेट देणार आहेत, भारतीय पंतप्रधान प्रथमच रवांडाला जाणार असल्याने ही भेट ऐतिहासिक आहे.
- त्यानंतर ते 24 जुलै रोजी युगांडाला रवाना होणार असून तेथून दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सचिव (आर्थिक संबंध) टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले.
- जोहान्सबर्गमध्ये मोदी 10व्या ब्रिक्स परिषदेला हजर राहणार असून त्या वेळी या गटाचे नेते आंतरराष्ट्रीय शांतता-सुरक्षा, व्यापार आदी विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. या शिखर परिषदेच्या पाश्र्वभूमीवर मोदी काही नेत्यांशी परस्पर संबंधांबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
इस्त्रायल ‘ज्यू राष्ट्र’ असल्याचे जाहीर :
- इस्त्रालयच्या संसदेने एका कायद्याद्वारे इस्त्रालय हे ज्यू राष्ट्र असल्याचे जाहीर केले. ‘ज्यूइश नेशन स्टेट लॉ‘ असे या वादग्रस्त कायद्याचे नाव असून, या कायद्यामुळे आखाती देशांच्या रोषात भर पडली आहे.
- इस्त्रालयच्या नव्या कायद्यानुसार हिब्रु भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याआधी अरेबिक ही अधिकृत भाषा होती. कायदा मंजूर झाल्याची घोषणा झाल्यावर अरब लोकप्रतिनिधींनी संसदेत तीव्र संताप व्यक्त केला. एका खासदाराने काळा झेंडा फडकावला, तर अन्य लोकप्रतिनिधींनी विधेयक फाडून टाकले.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला :
- माहिती आणि तंत्रज्ञान सेवा आणि सॉफ्टवेअर पुरवठादार ‘मायक्रोसॉफ्ट’ने तब्बल 100 अब्ज डॉलरचा महसूल कमवला आहे. कंपनीने जूनअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने पहिल्यांदाच महसुलाचा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला असून, याचे शिल्पकार मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय वंशाचे सत्या नाडेला ठरले आहेत.
- इंटेलिजंट क्लाउडमध्ये गेलेल्या भरीव गुंतवणुकीची मधुर फळे कंपनीला चाखण्यास मिळाली आहेत. नाडेला यांनी 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या समभागाचे मूल्य तीन पटीने वाढले आहे.
- मायक्रोसॉफ्टने इंटेलिजंट क्लाउड बाजारपेठेत आघाडी घेतली आहे. इंटेलिजंट क्लाउड, पर्सनल कॉम्प्युटिंग, सरफेस नोटबुक, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि सर्व्हर प्रॉडक्ट्सचा कंपनीची विक्री वाढण्यात महत्त्वाचा वाटा आहे. जूनअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ‘मायक्रोसॉफ्ट’ला 100 अब्ज डॉलरचा महसूल मिळाला आहे.
दिनविशेष :
- इ.स. पूर्व 356 मध्ये जगातील सात आश्चर्याँपैकी एक ‘एफिसस आर्टेमिसचे मंदिर’ नष्ट झाले.
- सन 2002 मध्ये जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
- स्वातंत्र्यसैनिक तसेच रोजगार हमी योजनेचे जनक वि.स. पागे यांचा जन्म 21 जुलै 1910 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा