21 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

INS Mormugao
INS Mormugao

21 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2022)

भारतीय नौदलाच्या ताफ्यात शक्तिशाली ‘INS Mormugao’ :

  • भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी शक्तिशाली ‘आयएनएस मुरमुगाओ’ही युद्धनौका सामील झाली आहे. .
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 18 डिसेंबर रोजी स्वदेशी बनावटीची P15B स्टील्थ गाइडेड क्षेपणास्त्र विध्वंसक युद्धनौका ‘आयएनएस मुरमुगाओ’ही नौदलास समर्पित केली.
  • नौदलाच्या अनुसार ही युद्धनौका रिमोट डिवाइस, आधुनिक रडार आणि जमिनीवरून जमीनवर व जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे.
  • या युद्धनौकेची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7 हजार 400 टन आहे.
  • भारतीय बनावटीच्या सर्वात घातक युद्धनौकांमध्ये मुरमुगाओचा समावेश होऊ शकतो.
  • मोरमुगाओ हे गोव्याच्या पश्चिम तटावरील ऐतिहासिक शहराचं नाव आहे.
  • याच ऐतिहासिक बंदराच्या नावावर या क्षेपणास्त्र विध्वंसक युद्धनौकेचं नाव ठेण्यात आलं आहे.
  • या युद्धनौकेवर रॉकेट लाँचर, टॉर्पेडो लाँचर आणि एसएडब्ल्यू हॅलिकॉप्टरची यंत्रणा आहे.
  • मुरमुगाओ युद्धनौका आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धात बचाव करण्यास सक्षम आहे.

‘मून लायटिंग’ला कायद्याने प्रतिबंधच :

  • कर्मचारी आपल्या मूळ नोकरीव्यतिरिक्त आपल्या मालक-व्यवस्थापनाच्या हितसंबंधांना बाधा आणणारी इतर कोणतीही अतिरिक्त नोकरी किंवा काम कायदेशीर चौकटीनुसार करू शकत नाहीत.
  • मात्र सरकार या विषयावर कोणतेही वेगळे सर्वेक्षण किंवा अभ्यास करत नसल्याची माहिती सरकारकडून संसदेत सोमवारी देण्यात आली.
  • जेव्हा एखाद्या कंपनीचा पूर्णवेळ कर्मचारी त्याच्या मालकाच्या किंवा व्यवस्थापनाला माहिती न देता आणखी एक नोकरी पत्करतो, या प्रकारासाठी इंग्रजीत ‘मून लायटिंग’ हा शब्दप्रयोग केला जातो.
  • विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कर्मचाऱ्यांसंदर्भात असे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडले होते.
  • कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत यासंदर्भात दिलेल्या लिखित उत्तरात नमूद केले, की 1946 च्या औद्योगिक रोजगार कायद्याच्या स्थायी आदेशानुसार कर्मचाऱ्याने आपल्या मालकाच्या हितसंबंधांना बाधा आणणारे कोणत्याही प्रकारचे काम कोणत्याही वेळी करता येणार नाही.
  • त्यानुसार आपल्या मूळ नोकरीव्यतिरिक्त अतिरिक्त नोकरी संबंधितांना पत्करता येणार नाही.

मराठी वंशीय लिओ वराडकर आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान :

  • आयर्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांची पुन्हा निवड झाली आहे.
  • मूळचे कोकणातील असलेल्या वराडकर यांनी 2017मध्ये आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर 2020च्या निवडणुकीत त्यांना अपयश आले.
  • मात्र अडीच वर्षांनंतर वराडकर पुन्हा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आले आहेत.
  • आयर्लंडमध्ये ताओइसेच हे पद महत्त्वाचे मानले जाते.
  • ताओइसेच हा पंतप्रधानपदासाठीचा आयरिश शब्द आहे.
  • वराडकर यांचा ‘फाइन गाएल’ हा पक्ष आणि मायकल मार्टिन यांचा ‘फियाना फेल’ या पक्षांत परस्परसामंजस्याने सत्तेचे आवर्तन झाले आहे.

अखेरच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा विजय :

  • अ‍ॅशले गार्डनरची अष्टपैलू कामगिरी आणि हिदर ग्रॅहमच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने मालिकेतील अखेरच्या पाचव्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाचा 54 धावांनी पराभव केला.
  • या विजयाने ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका 4-1 अशी जिंकली.
  • अ‍ॅशले गार्डनर सामन्यासह मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

फुटबॉलचा ‘किंग’,अजूनही ब्राझील पहिल्या स्थानावर :

  • फिफा विश्वचषकाची 22वी स्पर्धा कतारमध्ये पार पडली.
  • रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला आणि तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला.
  • या स्पर्धेनंतर जागतिक फुटबॉल संघटनेने म्हणजेच फिफाने संघांची क्रमवारी जाहीर केली.
  • अर्जेंटिनाने कतार 2022 मध्ये 1986 नंतर पहिले फिफा विश्वचषक जिंकले आहे.
  • असे असतानाही या महिन्याच्या फिफा जागतिक क्रमवारीत ब्राझीलने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
  • फेब्रुवारी 2022 पासून ब्राझीलने बेल्जियमला ​​हरवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

दिनविशेष:

  • सन 1913 मध्ये ‘ऑर्थर वेन‘ यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
  • भारताचे 17वे सरन्यायाधीश ‘पी.एन. भगवती‘ यांचा जन्म 21 डिसेंबर 1921 रोजी झाला.
  • भारतीय लेखक, कवी तसेच समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 मध्ये झाला होता.
  • ‘रघुनंदन स्वरूप पाठक‘ यांनी सन 1986 मध्ये भारताचे 18वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.