21 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

21 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2020)

16 हजार कोटींच्या अर्थउभारणीस केंद्राची परवानगी :

  • तमिळनाडू व तेलंगणसह पाच राज्यांना उद्योगस्नेही सुधारणा पूर्ण केल्यानंतर 16,728 कोटी रुपये उसने घेण्यास केंद्रीय अर्थमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आंध्र प्रद्रेश, कर्नाटक, मध्य प्रद्रेश ही यातील इतर तीन राज्ये आहेत.
  • तर सरकारने मे महिन्यात असे ठरवले होते, की त्या राज्यांनी उद्योगस्नेही सुधारणा केल्यास अतिरिक्त उसनवारीला परवानगी देण्यात येईल. यात जिल्हा पातळीवरील उद्योग सुधारणा आराखडय़ाची पूर्तता ही प्रमुख अट होती.
  • तसेच केंद्राच्या विशिष्ट कायद्यांनुसार या संबंधित उद्योगांना परवाने देणे हा या सुधारणांचा एक भाग होता.
  • पाच राज्यांनी उद्योगांना अनुकूल स्थिती निर्माण करण्यात बरीच प्रगती केली असून त्यांना खुल्या बाजारातून 16,728 कोटी रुपयांची उसनवारी करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2020)

पश्चिम बंगालमधील पहिले तेल, वायू क्षेत्र देशाला समर्पित :

  • पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्य़ातील तेल व वायू क्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे तेल व वायू उत्पादन क्षेत्रात पश्चिम बंगालला प्रथमच स्थान मिळाले आहे.
  • तर कोलकात्यापासून 47 कि.मी अंतरावरील पेट्रोलियम साठय़ातून तेल निर्मिती सुरू करण्यात आली असून हे तेल हल्दीया येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडे शुध्दीकरणासाठी पाठवले जात आहे.
  • अशोकनगर तेल व वायू साठा क्षेत्रात प्रथमच तेल उत्पादन सुरू झाले असून हा तेल व वायू साठा 2018 मध्ये सापडला होता. अशोकनगर क्षेत्र हे महानदी-बंगाल-अंदमान खोऱ्यात असून ते व्यावसायिक पातळीवर योग्य आहे.

ला-लीगा फुटबॉलत पेले यांच्या गोलच्या विक्रमाशी मेसीची बरोबरी :

  • एका क्लबसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या पेले यांच्या 643 गोलच्या विक्रमाशी लिओनेल मेसीने बरोबरी साधली.
  • तर मेसीच्या गोलमुळे बार्सिलोनाने शनिवारी मध्यरात्री ला-लीगा फुटबॉलमध्ये व्हॅलेंसिया संघाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी पत्करली.
  • 2004 मध्ये बार्सिलोनाकडून पदार्पण करणाऱ्या मेसीने 643वा गोल साजरा केला.
  • पेले यांनी 1957 ते 1974 दरम्यान सांतोस संघासाठी 643 गोल लगावले होते. मेसी हा बार्सिलोना आणि ला-लीगा फुटबॉलमधील सर्वाधिक गोल करणारा एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे.

विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धात सिम्रनजीत, मनीषाचे सुवर्णयश :

  • भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली.
  • तर अमित पंघालच्या सुवर्णपदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिम्रनजीत कौर आणि मनीषा मौन यांनी शनिवारी रात्री सुवर्णयश संपादन केले.
  • मनीषाने भारताच्याच साक्षी चौधरी हिचा 3-2 असा पराभव केला. साक्षीने पहिल्या फेरीत जोरदार ठोसे लगावत मनीषासमोर कडवे आव्हान उभे केले होते.

मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता :

  • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खेळांचा समावेश आहे.
  • तर हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही आता समावेश असेल.
  • तसेच कलरीपायूट्टू हा खेळ प्रामुख्याने केरळमध्ये खेळला जात असून मल्लखांब हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसहित संपूर्ण भारतात खेळला जातो. गटका पंजाबमध्ये खेळला जात असून थांग-ता हा मणिपूर मार्शल-आर्टवर आधारित आहे.

दिनविशेष:

  • सन 1913 मध्ये ‘ऑर्थर वेन‘ यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
  • भारताचे 17वे सरन्यायाधीश ‘पी.एन. भगवती‘ यांचा जन्म 21 डिसेंबर 1921 रोजी झाला.
  • भारतीय लेखक, कवी तसेच समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 मध्ये झाला होता.
  • ‘रघुनंदन स्वरूप पाठक‘ यांनी सन 1986 मध्ये भारताचे 18वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2020)

You might also like
1 Comment
  1. Khushabu Dhanraj Meshram says

    best one

Leave A Reply

Your email address will not be published.