21 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

झायकोव्ह डी
झायकोव्ह डी

21 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2021)

‘झायडस कॅडिला’च्या ‘झायकोव्ह डी’ला मान्यता :

 • ‘झायडस कॅडिला’च्या ‘झायकोव्ह डी’या तीन मात्रांच्या लशीला भारताच्या महाऔषधनियंत्रकांनी मान्यता दिली आहे.
 • तर जगातील ही पहिली डीएनए लस असून ती भारतात तयार करण्यात आली आहे.
 • तसेच ती 12 वर्षांपुढील व्यक्तींना देता येईल, अशी माहिती जैव तंत्रज्ञान विभागाने शुक्रवारी दिली.
 • ‘झायकोव्ह डी’ या लशीला केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
 • ‘सीरम’ची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या लशींना भारतात मंजुरी दिली गेली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2021)

केंद्रीय स्वायत्त महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट :

 • केंद्र सरकारने केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.
 • तर या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता म्हणजेच डीएमध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे.
 • केंद्रीय स्वायत्त महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोग आणि सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन दिले जाते.
 • तसेच खर्च विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्याचा सध्याचा दर मूळ वेतनाच्या 164 टक्क्यांवरून 189 टक्के करण्यात आला आहे.
 • तर या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित महागाई भत्ता 1 जुलै पासून लागू आहे. यासंदर्भात, अर्थ मंत्रालय, खर्च विभागाने कार्यालयीन मेमोरँडम (ओएम) देखील जारी केले आहे.

TOP 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर :

 • देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला.
 • तर या सर्व्हेत लोकांची मत जाणून घेतल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंडिया टुडे ‘मूड ऑफ द नेशन’नं हा सर्व्हे केला.
 • सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एमके स्टालिन यांचं नाव आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक दुसऱ्या स्थानावर आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन तिसऱ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाचव्या क्रमांकावर आहेत.
 • तसेच या यादीत भाजपाशासित राज्यातील दोन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
 • आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव आहे.
 • दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांचंही या यादीत नाव आहे.

चीननं तीन मुलांना जन्म देण्याची दिली परवानगी :

 • जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला आता वृद्ध लोकसंख्येची चिंता सतावत आहे. त्यामुळे चीननं आतापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
 • देशाच्या हितासाठी सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीनं तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली आहे.
 • तर या पॉलिसीला शुक्रवारी औपचारिकरित्या समर्थन देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर कमी होत असल्याने नवी पॉलिसी लागू केली आहे.
 • तसेच गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर घटला आहे. तसेच वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याचं एका अहवालातून समोर आलं.
 • वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील, या भीतीने चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 • नॅशनल पीपुल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने सुधारित लोकसंख्या आणि कुटुंब नियोजन कायदा पारित केला आहे.

भारतात फॉम्र्युला-4 शर्यतींचे आयोजन :

 • विभागीय भारतीय अजिंक्यपद आणि फॉम्र्युला-4 भारतीय अजिंक्यपद शर्यती देशात आयोजित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने हिरवा कंदील दिला आहे.
 • रेसिंग प्रमोशन्सतर्फे फेब्रुवारी 2022 मध्ये नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर आणि हैदराबाद या शहरांत विभागीय अजिंक्यपद शर्यतींच्या आयोजनाची योजना आहे.
 • आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने प्रमाणित केलेल्या एफ3 गाडय़ा या दोन्ही शर्यतींमध्ये सहभागी होऊ शकतील.
 • तर या अजिंक्यपद शर्यतींद्वारे देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाचे अव्वल परवाना गुण जागतिक अजिंक्यपदासाठी शर्यतपटूंना कमावता येतील.
 • तसेच अरमान इब्राहिम, आदित्य पटेल या शर्यतपटूंसह माजी फॉम्र्युला-1 शर्यतपटू नरेन कार्तिकेयन आणि माजी क्रिकेटपटू कपिलदेव यांचाही मार्गदर्शक आणि सल्लागार मंडळामध्ये समावेश आहे.

पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला नीरज चोप्राचं नाव :

 • पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवलेल्या नीरज चोप्राचं नाव दिले जाणार आहे.
 • तसेच यावेळी 16 ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार देखील केला जाणार आहे.
 • तर सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट देणार असून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
 • तर यावेळी या मैदानाला ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ असं नाव देण्याची शक्यता आहे.
 • दुसरीकडे, नीरजला बढती दिली जाणार असल्याचं लष्कराच्या सूत्रांनी म्हटलं आहे.
 • नीरजची ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहून नियमांनुसार त्याला प्रमोशन मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
 • नीरजला 15 मे 2016 पासून 4 राजपूताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

दिनविशेष:

 • भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य ‘गोपाळ कृष्ण देवधर‘ यांचा जन्म 21 ऑगस्ट 1871 मध्ये झाला होता.
 • जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1910 मध्ये झाला.
 • सन 1911 मध्ये पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
 • जमैकाचा प्रख्यात धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म 21 ऑगस्ट 1986 मध्ये झाला.
 • सन 1991 मध्ये लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.