21 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

21 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2020)

भारतात एका दिवसात नऊ लाखांहून अधिक करोना चाचण्या:

 • भारतात कोविड-19 या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
 • त्याचाच भाग म्हणून प्रतिदिन करोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात येत असून गुरुवारी भारतात करोना चाचण्यांनी नवा उच्चांक गाठला.
 • चोवीस तासात 9 लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
 • सातत्याने करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत असल्याने पॉझिटिव्हीटीचा दर कमी झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2020)

भारतातील तीन विमानतळं अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली:

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे.
 • सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.
 • मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
 • या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

जी-मेलच्या सेवांमध्ये जगभरात अडथळे जाणवले:

 • जी-मेलच्या सेवांमध्ये गुरुवारी जगभरात अडथळे जाणवले. मात्र आता हे अडथळे दूर झाले असल्याचे गूगलने म्हटले आहे.
 • लॉग-इन न करता येणे, अटॅचमेंट जोडता न येणे आणि संदेश न मिळणे अशासारख्या समस्या गुरुवार सकाळपासून वापरकर्त्यांना जाणवत होत्या.
 • गूगलच्या विविध सेवांबाबत ‘परफॉर्मन्स इन्फर्मेशन’ पुरवणाऱ्या जी-सूट डॅशबोर्डवर कंपनी जी-मेलबद्दलच्या अडथळ्यांचा तपास करत असल्याचे म्हटले होते.
 • गूगलच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, आता ही समस्या दूर झाल्याचे त्याने सांगितले.
 • गूगल ड्राइव्ह, गूगल डॉक्स आणि गूगल मीट यांसारख्या इतर गूगल सेवाही पुन्हा सुरळीत करण्यात आल्याचे डॅशबोर्डवर सांगण्यात आले.

हिंदी महासागरात युद्धनौका सज्ज:

 • पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना भारताच्या टॉप नौदल कमांडर्सची कालपासून दिल्लीमध्ये तीन दिवसीय परिषद सुरु झाली आहे.
 • दिल्लीत नौदल कमांडर्सची परिषद होत असताना तिथे लडाखमध्ये दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने आहे.
 • या सीमावादाच्या पार्श्वभूमीवरच हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल अलर्ट मोडवर असून कुठलीही कामगिरी पार पाडण्यासाठी भारतीय युद्धनौका सज्ज आहेत.

क्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचे संकेत:

 • राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ करण्याचे संकेत क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
 • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्याला 25 लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला 15 लाख रुपयांचे बक्षीस यापुढे देण्याचा विचार क्रीडा मंत्रालय करत आहे. अर्थातच याबाबत अधिकृत घोषणा क्रीडा मंत्रालयाने केलेली नाही.
 • सध्या खेलरत्न पुरस्कार विजेत्याला साडेसात लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला पाच लाखांचे बक्षीस क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येते.
 • जर हा प्रस्ताव मान्य झाला तर या वर्षीपासूनच वाढीव बक्षीस रक्कम पुरस्कारप्राप्त खेळाडूंना देण्यात येणार असल्याचे समजते.
 • असे क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दिनविशेष:

 • भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य ‘गोपाळ कृष्ण देवधर‘ यांचा जन्म 21 ऑगस्ट 1871 मध्ये झाला होता.
 • जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1910 मध्ये झाला.
 • सन 1911 मध्ये पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
 • जमैकाचा प्रख्यात धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म 21 ऑगस्ट 1986 मध्ये झाला.
 • सन 1991 मध्ये लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.