20 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

आंतरराष्ट्रीय बाल दिन
आंतरराष्ट्रीय बाल दिन

20 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 नोव्हेंबर 2020)

राज्य सरकारची संमती अनिवार्यच :

  • एखाद्या राज्याच्या अखत्यारीत केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) तपासाकरता संबंधित राज्य सरकारची संमती अनिवार्य असून, त्यांच्या संमतीशिवाय ही केंद्रीय यंत्रणा तपास करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
  • तर संघराज्यात्मक स्वरूप हे घटनेच्या मूलभूत रचनेपैकी एक मानले गेले असून, यासंबंधीच्या तरतुदी संघराज्यात्मक स्वरूपाला अनुसरून आहेत, असे न्या. अजय खानविलकर व बी.आर. गवई यांच्या खंडपीठाने सांगितले.
  • पोलीस आस्थापनांचे अधिकार आणि कार्यकक्षा यांचा इतर क्षेत्रांपर्यंत विस्तार, तसेच अधिकार व कार्यकक्षा यांच्या वापरासाठी राज्य सरकारची संमती याबाबतची तरतूद असलेल्या दिल्ली विशेष पोलीस आस्थापना (डीएसपीई) कायद्यातील कलम 5 व 6 चा न्यायालयाने हवाला दिला.
  • तसेच यापैकी कलम 5 हे डीएसपीईच्या सदस्यांचे अधिकार व कार्यकक्षा यांचा केंद्रशासित प्रदेशांपलीकडे विस्तार करण्याची केंद्र सरकारला परवानगी देत असले तरी; अशा प्रकारे अधिकारांच्या विस्तारासाठी राज्याने याच कायद्याच्या कलम 6 अन्वये संमती दिल्याशिवाय ही परवानगी मिळू शकत नाही, असे खंडपीठाने सांगितले.

व्यापारासाठी लाचखोरीमध्ये भारत 77 व्या स्थानावर :

  • व्यापारासाठी लाचखोरी करण्याबाबत भारत 45 गुण मिळवून जगात 77 व्या स्थानावर आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
  • ‘ट्रेस’ या लाचखोरीविरोधी संघटनेने 194 देश, प्रांत त्याचप्रमाणे स्वायत्त आणि निमस्वायत्त प्रदेशांमध्ये पाहणी केली.
  • तर या वर्षीच्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, व्हनेझुएला व एरिट्रिया हे देश लाचखोरीत आघाडीवर असल्याचे, तर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलण्ड, स्वीडन आणि न्यूझीलंड सर्वात तळाशी आहेत.

2030 पासून ब्रिटनमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्स मिळणार नाही :

  • पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ब्रिटनने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून पुढील दहा वर्षांमध्ये पेट्रोल तसेच डिझेलचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे उद्देश समोर ठेवलं आहे.
  • 2030 पासून देशामध्ये पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कार्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा ब्रिटनने केली आहे.
  • तर अशाप्रकारे वाहनविक्रीवर बंदी घालण्याची घोषणा करुन दहा वर्षांमध्ये पूर्णपणे इलेक्ट्रीक्स कार्स असणारा ब्रिटन हा पहिला देश ठरणार आहे.
  • ब्रिटन सरकारने बुधवारी 10 मुद्दांच्या समावेश असणारी ‘ग्रीन इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन’ योजना लागू करत असल्याची घोषणा केली.

महिला पोलिसाचा विशेष बढती देऊन सन्मान :

  • दिल्लीच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने केवळ अडीच महिन्यांत 76 बेपत्ता लहान मुलांचा शोध घेतल्याबद्दल त्यांचा ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देऊन गौरव करण्यात आला आहे.
  • तर या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तीन महिन्यांत विशेष बढती मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत.
  • सीमा ढाका यांना आपल्या कामाच्याप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी या विशेष बढतीनं गौरविण्यात आलं आहे.
  • दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी बुधवारी ही घोषणा केली. पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांसाठी एक प्रोत्साहन योजना जाहीर केली होती.

UAE ने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं केलं बंद :

  • संयुक्त अरब अमिरातीने पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तान आणि अन्य अकरा देशातील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा जारी करणं बंद केलं आहे.
  • UAE ने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजिट व्हिसा बंद केल्याच्या वृत्तावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं आहे.
  • तर करोना व्हायरसच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असावा, असे एक्स्प्रेस ट्रिब्युन वर्तमानपत्राने म्हटले आहे.
  • तसेच मागच्या आठवडयाभरात पाकिस्तानात नव्याने दोन हजार करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जून महिन्यात पाकिस्तानात करोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळी यूएईने प्रवासी सेवा बंद केली होती.

दिनविशेष:

  • 20 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बाल दिन‘ आहे.
  • म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1750 मध्ये झाला होता.
  • थॉमस अल्वा एडिसन यांनी सन 1877 मध्ये ग्रामोफोन चा शोध लावला.
  • सन 1994 मध्ये भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.