20 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

निखत झरीन
निखत झरीन

20 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 मे 2022)

भारत, चीनमध्ये प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यूंची नोंद :

  • जागतिक स्तरावर दरवर्षी नऊ दशलक्ष लोक सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात.
  • 2000 सालापासून कार, ट्रक आणि उद्योगातील दूषित हवेमुळे मृत्यूची संख्या 55 टक्क्यांनी वाढली आहे.
  • प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत आणि चीन जगात आघाडीवर आहेत आणि या दोन्ही देशात वर्षांला अनुक्रमे 2.4 दशलक्ष आणि 2.2 दशलक्ष मृत्यू होतात.
  • विशेष म्हणजे, या दोन देशांमध्ये जगातील सर्वात मोठी लोकसंख्यादेखील आहे.
  • ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मधील नवीन अभ्यासानुसार, युनायटेड स्टेट्स अव्वल दहा राष्ट्रांमध्ये एकमेव परिपूर्ण औद्योगिक देश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मे 2022)

जागतिक बँकेच्या ‘शासन’ क्रमवारीत भारताची घसरण :

  • जागतिक बँकेच्या ‘वल्र्ड गव्हर्नन्स इंडिकेटर्स’च्या (डब्ल्यूजीआय) विश्लेषणात, शासन कारभार चालवण्याच्या बाबतीत भारताची क्रमघसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
  • भारताचा शासनांक अन्य समकक्ष देशांच्या तुलनेत सर्वच बाबतीत खूप खाली गेल्याचे वित्त मंत्रालयाच्या आर्थिक विभागाने तयार केलेल्या सादरीकरणातून स्पष्ट झाले आहे.
  • ‘फ्रीडम हाऊस’च्या अहवालात नमूद केलेल्या घटकांमुळे 2020 मध्ये जगातील सर्वात मोठय़ा 25 लोकशाही देशांमध्ये भारताचा शासनांक सर्वाधिक घसरल्याचेही त्यात म्हटले आहे.
  • अभिव्यक्ती आणि जबाबदारी; राजकीय स्थैर्य आणि हिंसाचारमुक्तता, शासकीय परिणामकारकता, नियामक गुणवत्ता, कायद्याचे राज्य आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण या सहा घटकांवर आधारित जागतिक बँकेचे ‘डब्ल्यूजीआय’ 215 देश आणि प्रदेशांच्या शासकीय कारभाराबाबतची क्रमवारी निश्चित करतात.
  • भारताच्या एकूण शासन राबवण्याच्या क्रमांकावर परिणाम करणाऱ्या सर्व 15 माहिती स्रोतांचे सरकारतर्फे विश्लेषण करण्यात आले.

महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक :

  • भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
  • तर यासह जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पाचवी भारतीय महिला आहे.
  • तिने इस्तांबुलमध्ये झालेल्या सामन्यात थायलंडची जुतामास जितपाँगला 5-0 ने पराभूत केलं.
  • निखत झरीनने 52 किलो गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचवली आहे.
  • तर आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत.

दिनविशेष :

  • 20 मे जागतिक हवामान विज्ञान दिन
  • 1891 मध्ये थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले
  • क्यूबा देश 1902 मध्ये अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.
  • चिआंग काई शेक चीन गणराज्यचे 1948 मध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
  • 1850 मध्ये केसरी चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला.
  • 1932 मध्ये लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मे 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.