20 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

जागतिक चिमणी दिन
जागतिक चिमणी दिन

20 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 मार्च 2022)

‘बीसीसीआय’च्या सभांसाठी वेंगसरकर यांची नियुक्ती :

  • विरोधी गटाने माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) प्रतिनिधित्व म्हणून नियुक्ती केली आहे.
  • रवी सावंत व रवी मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गटाने आयोजित केलेल्या बैठकीला 109 अधिकृत स्वाक्षरीकर्ते सदस्य उपस्थित होते.
  • तर या सभेत सत्ताधारी गटाने घेतलेले निर्णय विरोधी गटाने बदलले.
  • तसेच या बैठकीला कोषाध्यक्ष जगदीश आचरेकर उपस्थित होते. पण, त्यांनी स्वाक्षरी केली नाही.
  • क्रिकेट सुधार समिती बरखास्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
  • तसेच या त्रिसदस्यीय समितीत विनोद कांबळी, जतीन परांजपे आणि निलेश कुलकर्णी यांचा समावेश आहे.
  • पण, सलील अंकोला यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या वरिष्ठ निवड समितीला कायम ठेवण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मार्च 2022)

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धात अंतिम फेरी गाठणारा भारताचा पाचवा बॅडमिंटनपटू :

  • भारताच्या लक्ष्य सेनने चुरशीच्या लढतीत मलेशियाच्या ली झी जिआवर 21-13, 12-21, 21-19 असा विजय मिळवत ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला.
  • प्रकाश नाथ, प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद आणि सायना नेहवालनंतर या प्रतिष्ठेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा लक्ष्य हा पाचवा भारतीय खेळाडू आहे.
  • तर गेल्या सहा महिन्यांपासून 20 वर्षीय लक्ष्यचा खेळ उंचावत आहे. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे कांस्यपदक मिळवले होते.
  • जानेवारीत त्याने ‘सुपर 500’ इंडिया खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले, तर गेल्या आठवडय़ात जर्मन खुल्या स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
  • जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली झी जिआविरुद्ध लक्ष्यने चांगली सुरुवात केली.

योगी आदित्यनाथांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला :

  • योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
  • तर या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
  • लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये 25 मार्च, शुक्रवारी दुपारी 4 वाजता हा सोहळा होणार आहे.
  • स्टेडियममध्ये 50 हजार जण बसू शकतील एवढी क्षमता असून, याशिवाय सुमारे 200 व्हीव्हीआयपींसाठी स्टेडियममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय :

  • पंजाबमधील सत्तेची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेतला.
  • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली.
  • पहिल्या कॅबिनेट बैठकीत भगवंत मान यांनी सरकारी नोकऱ्यांबाबत काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत.
  • पंजाब मंत्रिमंडळाने शनिवारी पंजाब पोलीस विभागात 10,000 आणि इतर सरकारी विभागांमधील 15,000 रिक्त पदांसह एकूण 25,000 सरकारी नोकऱ्या प्रदान करण्याचा ठराव मंजूर केला.
  • मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एका महिलेसह आम आदमी पक्षाच्या (आप) दहा आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.

जपानची भारतात 4200 कोटी डॉलर गुंतवणूक :

  • जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शनिवारी दिल्लीत भारत-जपान चौदाव्या शिखर परिषदेत उभय बाजूंचे आर्थिक- सांस्कृतिक संबंध दृढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
  • त्यानंतर जपानकडून भारतात पुढील पाच वर्षांत 4200 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली.
  • उभय देशांदरम्यान सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांसाठीच्या करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • जपान आणि भारत हे विशेष नीतीत्मक आणि जागतिक भागीदार आहेत.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत :

  • ऑस्ट्रेलियाकडून शनिवारी सहा गडी राखून पराभूत झाल्यानंतर ‘आयसीसी’ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताची उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे.
  • विश्वचषकातील विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करणारा मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ हा उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे.
  • कर्णधार मिताली राज, यास्तिका भाटिया आणि हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकी खेळींमुळे भारताने 7 बाद 277 धावसंख्या उभारली.
  • भारताच्या डावात मिताली राज आणि यास्तिका भाटियाने तिसऱ्या गडय़ासाठी 130 धावांची भागीदारी रचली.

दिनविशेष:

  • 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिन, आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन, आंतरराष्ट्रीय आनंदाचा दिन तसेच जागतिक कथाकथन दिन आहे.
  • 1602 यावर्षी डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
  • सन 1916 मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
  • महाडचा चवदार तळे सत्याग्रह सन 1917 मध्ये सुरु झाला.
  • पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मार्च 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.