20 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक चिमणी दिन
जागतिक चिमणी दिन

20 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 मार्च 2020)

रविवारी ‘जनता संचारबंदी’:

 • रविवारी 22 मार्चला लोकांनी स्वत:च घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
 • करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री आठ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. या साथरोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने या विषाणूपासून स्वत:चे रक्षण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
 • करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविवारी, 22 मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनतेने स्वत:हून संचारबंदी पाळावी, असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासीयांना केले.
 • ‘जनता संचारबंदी’ म्हणजे संकटाच्या काळात आत्मसंयम दाखवण्यासाठीची परीक्षा असेल. देशहितासाठी हे कर्तव्य पार पाडा. या संदर्भात विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या संघटनांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांनी ‘जनता संचारबंदी’चा प्रसार केला तरी त्याचा मोठा फायदा होईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मार्च 2020)

रंजन गोगोईंनी घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ :

 • माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
 • 3 ऑक्टोबर 2018 ते 17 नोव्हेंबर 2019 या कालावधीत देशाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलेले रंजन गोगोई यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केले होते.
 • राज्यसभेतल्या 12 खासदारांची शिफारस राष्ट्रपती करतात. त्यामुळे आपल्या या अधिकाराचे वापर करत राष्ट्रपतींनी गोगोई यांची निवड केली आहे.
 • रंजन गोगोई 17 नोव्हेंबर 2019 रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले.

ZP शाळेतील डिसले गुरुजींना 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार :

 • शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे ग्लोबल टीचर प्राईझ जाहीर झाले असून जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरिता निवड करण्यात आली आहे.
 • लंडन येथील वाकी फौंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील.
 • रणजितसिंह डिसले, विनिता गर्ग व शुवजीत पायने यांना याकरिता नामांकन मिळाले आहे. असा बहुमान मिळवणारे डिसले गुरुजी एकमेव जिल्हा परिषद शिक्षक ठरले आहेत.
 • सोलापूर जिल्ह्यातील रणजीतसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद शाळा आणि याच शाळेतील शिक्षक वर्गाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे.
 • सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुलांना जगाशी जोडण्याचं काम या टेक्नोसेव्ही गुरुजींनी केलं आहे. त्यामुळेच, जगभरात यांच्या कामाचं कौतुक होत आहे. देशाला जसे तुकाराम मुंढेंसारख्या सनदी अधिकाऱ्याची गरज आहे, तशीच देशातील प्रत्येक शाळेला रणजीतसिंह डिसलेंसारख्या टेक्नोसेव्ही आणि मॉडर्न विचारांच्या गुरुजींची आवश्यकता आहे. भविष्यातील भारत घडविण्यासाठी हाच शिक्षकवर्ग मोठं योगदान देत असतो.
 • लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका व उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील 50000 मुलांची पीस आर्मी तयार करून परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे.
 • तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत असणारे डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात.
 • डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हुन अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील 7 वे शिक्षक ठरले आहेत.
 • मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफीक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

दिनविशेष:

 • 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिन, आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन, आंतरराष्ट्रीय आनंदाचा दिन तसेच जागतिक कथाकथन दिन आहे.
 • 1602 यावर्षी डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
 • सन 1916 मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
 • महाडचा चवदार तळे सत्याग्रह सन 1917 मध्ये सुरु झाला.
 • पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.