20 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

20 July 2018 Current Affairs In Marathi

20 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 जुलै 2018)

भारत आशियातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था :

  • आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान भारत 2018 मध्येही कायम राखील, असे आशियाई विकास बँकेने (एडीबी) म्हटले आहे. Economy
  • तसेच भारताच्या बळावर दक्षिण आशिया सर्वाधिक वेगाने वाढणारा उपविभाग ठरेल, असेही ‘एडीबी’ने म्हटले आहे.
  • एडीबीने ‘आशियाई विकास दृष्टीकोन’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिका आणि तिच्या व्यापारी भागीदारांत तणाव निर्माण झाला असला तरी आशिया आणि प्रशांत विभागातील विकसनशील अर्थव्यवस्थांची वृद्धी 2018 आणि 2019 मध्ये मजबूत राहील. दक्षिण आशिया सर्वाधिक वेगाने वाढणारा उपविभाग ठरेल. यात भारत नेतृत्वस्थानी राहील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जुलै 2018)

मुंबईतील सात स्थानके नामांतराच्या प्रतीक्षेत :

  • तब्बल 27 वर्षांच्या प्रक्रियेनंतर 18 जुलै रोजी रात्री 12 वाजता ‘एल्फिन्स्टन रोड’ स्थानकाचे नामकरण ‘प्रभादेवी’ असे करण्यात आले. एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या नावानंतर प्रस्तावित असलेल्या अन्य सात स्थानकांच्या नामांतराची मागणीही आता जोर धरू लागली आहे. प्रस्तावित स्थानकांत दादरसह मुंबई सेंट्रल स्थानकाचाही समावेश आहे.
  • एल्फिन्स्टन रोड स्थानकानंतर दादर, मुंबई सेंट्रल, सँडहर्स्ट रोड, चर्नी रोड, करी रोड, कॉटनग्रीन आणि किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे ब्रिटिश काळातील असल्याने नागरिकांसह राजकीय नेत्यांनी या स्थानकांच्या नावांना तीव्र विरोध केला आहे.
  • तसेच यामुळे ‘दादर’ स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’, ‘मुंबई सेंट्रल’ स्थानकाचे नाव ‘नाना शंकर शेठ’, ‘सँडहर्स्ट रोड’ स्थानकाचे नाव ‘डोंगरी’, ‘चर्नी रोड’ स्थानकाचे नाव ‘गिरगाव’, ‘करी रोड’ स्थानकाचे नाव ‘लालबाग’, ‘किंग्ज सर्कल’ स्थानकाचे नाव ‘पार्श्वनाथ’ तर कॉटनग्रीनचे नाव ‘घोडपेदव’ करण्याची मागणी जोर धरत आहे. Mumbai Station
  • ब्रिटिश काळात लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून एल्फिन्स्टन रोड हे नाव स्थानकाला देण्यात आले होते. मुंबई महापालिकेत सध्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 1991 साली एल्फिन्स्टनचे नाव बदलण्याची मागणी केली होती.
  • डिसेंबर 2016 मध्ये विधानसभेत सीएसएमटी आणि एल्फिन्स्टनच्या नामकरणाला मंजुरी मिळाली. यानंतर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर जुलै 2017 मध्ये नामांतराचे परिपत्रक काढण्यात आले. त्यानंतर आता या स्थानकाचे नाव प्रभादेवी असे करण्यात आले आहे.

‘ट्राय’ व्दारे कॉल मेसेजचे नवे नियम जारी :

  • टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) मोबाइल धारकांना नको असलेल्या म्हणजेच त्रासदायक ठरणाऱ्या कॉल आणि एसएमएसच्या कटकटीपासून सूटका करण्याची तयारी केली आहे. यासंबंधी नवे नियम ट्रायने 19 जुलै रोजी जारी केले. यामध्ये ग्राहकांच्या परवानगीशिवाय अशाप्रकारच्या कॉल आणि एसएमएसवर बंदी घालण्यात आली आहे. TRAI
  • तसेच मार्केटिंगशी निगडीत कॉल आणि एसएमएस केवळ नोंदणीकृत संस्थेकडूनच पाठवले जातील याची दक्षता घेण्याचे आदेश टेलीकॉम कंपन्यांना ट्रायने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाचीही तरतूद करण्यात आली असून 1 हजार रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
  • नियम बदलणे गरजेचे झाले होते, असे ट्रायने सांगितले. नवे नियम बनवण्याचा हेतू स्पॅम कॉल्समुळे होणाऱ्या त्रासापासून ग्राहकांची सूटका करणे हा आहे. नव्या नियमांतर्गत मेसेज सेंडर्स (मेसेज पाठवणारे) आणि हेडर्स (वेगवेगळ्या पद्धतीच्या मेसेजेसचे वर्गीकरण करणारे) यांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच हे मेसेज पाठवण्याआधी ग्राहकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रसिद्ध गीतकार गोपालदास नीरज यांचे निधन :

  • हिंदी जगतातील प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचे 19 जुलै रोजी संध्याकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. Neeraj Gopaldas
  • प्रकृती खालावल्याने गोपालदास नीरज यांना आग्रा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • 4 जानेवारी 1925 रोजी जन्मलेल्या निरज यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहीट गाणी दिली. 1991 मध्ये पद्मश्री आणि 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना तीन वेळेस फिल्म फेअर अवार्डनेही सन्मानित करण्यात आले होते.

रिलायन्स जियो कडून मान्सून ऑफर जाहीर :

  • रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओफोनसाठी एका धमाकेदार ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत कोणत्याही जुन्या फिचर फोनच्या बदल्यात नवा जिओफोन अवघ्या 501 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
  • जिओच्या जुन्या ग्राहकांचे फोनही नव्या Jio phone-2 च्या फिचर्ससह अपडेट होतील. jio Monsoon Offer 20 जुलै रोजी लॉन्च होत आहे. Jio
  • 20 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजून 1 मिनिटांनी ही ऑफर सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचा जुना फिचर फोन घेऊन जिओचा नवा Jio phone-2 खरेदी करु शकतात. बदलण्यासाठी आणलेला फोन कार्यरत असावा एवढीच अट आहे. अशाप्रकारे 1500 रुपयांच्या फोनसाठी तुम्हाला केवळ 501 रुपये द्यावे लागतील. या ऑफरद्वारे आपली ग्राहकसंख्या 100 मिलियनपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा विचार आहे.
  • 5 जुलै रोजी रिलायन्सच्या 41व्या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी आपला दुसरा फिचर फोन Jio Phone 2 हा लॉन्च केला होता. या फोनमध्ये व्हॉट्स अॅप, फेसबुक आणि युट्यूबचाही सपोर्ट असणार आहे. मात्र, कंपनीने घोषणा केल्यानुसार 15 ऑगस्टनंतरच हे तिन्ही अॅप्स फोनवर कार्यरत होतील.

प्रशांत आपटे महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी :

  • शरीरसौष्ठवपटूंचे आश्रयदाते असलेल्या प्रशांत आपटे यांची महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
  • महाराष्ट्र राज्याच्या शरीरसौष्ठव संघटनेने गेल्या चार वर्षात तीन राष्ट्रीय स्पर्धा, जागतिक स्पर्धा तसेच अनेक देशपातळीवरच्या स्पर्धांचे भव्यदिव्य आयोजन करून राज्याने आपली ताकद अवघ्या देशाला दाखवून दिली आहे. एवढेच नव्हे तर येत्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यात आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारीही राज्यावरच आहे.
  • राज्य संघटनेचे अन्य पदाधिकारी कायम असून अॅड. विक्रम रोठे यांच्याकडे सरचिटणीसपदाची सुत्रे आहेत. विद्यमान संघटनेत हेमचंद्र पाटील कार्यकारी उपाध्यक्ष असून खंदे कार्यकर्ते मदन कडू कार्यकारी संचालकपदी कायम आहेत.

दिनविशेष :

  • 20 जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन‘ आहे.
  • सन 1828 या वर्षी मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
  • बडोद्याचे महाराज सर सायाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने सन 1908 मध्ये बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
  • सन 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जुलै 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.