20 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

20 January 2019 Current Affairs In Marathi

20 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 जानेवारी 2019)

पायरसीला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणार :

 • चित्रपटसृष्टीला भेडसावणाऱ्या पायरसीच्या समस्येला आळा घालण्यासाठी 1952च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
 • चित्रपटसृष्टीच्या श्रम आणि सामर्थ्यांचा अपमान करणाऱ्या पायरसीसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
 • भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते मुंबईत बोलत होते.
 • तसेच भारतीय चित्रपटांच्या इतिहासाचे दर्शन घडविण्याबरोबरच देशाचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून या संग्रहालयात उलगडला आहे. दृश्य, ग्राफिक्स, चित्रपटविषयक कात्रणे, प्रसिद्धीपर साहित्य यासह इतर माध्यमातून कथाकथनाद्वारे चित्रपटांचा हा प्रवास अनुभवता येणार आहे.
 • तर दक्षिण मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनमधल्या ऐतिहासिक गुलशन महल आणि नवी संग्रहालय इमारत या दोन इमारतीत हे संग्रहालय आहे.
 • नव्या संग्रहालय इमारतीत चार विभाग असून एकात गांधी आणि चित्रपट, दुसऱ्यात बालचित्रपट स्टुडिओ, तिसऱ्यात तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि भारतीय चित्रपट, तर भारतातले चित्रपट हा चौथा विभाग आहे. नव्या संग्रहालय इमारतीत डिजिटल सिनेमा प्रोजेक्टर आणि ध्वनी यंत्रणेने सुसज्ज दोन प्रेक्षागृहदेखील आहेत.

वीजबिलावरील मीटर रीडिंगचा फोटो आता होणार गायब:

 • महावितरणकडून वीजबिलाबाबत तसेच मीटर रीडिंगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. छापील वीजबिल ग्राहकांना मिळण्यापूर्वीच मीटर रीडिंगची माहिती त्यांना मिळत असल्यामुळे आता 1 फेब्रुवारीपासून महावितरणने वीजबिलावरील मीटर रीडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रीडिंगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीजबिलावर मीटर रीडिंगचा फोटो प्रसिद्ध करण्याची पद्धत सुरू केली होती. या निर्णयाचा महातिवरणसह ग्राहकांनाही पारदर्शक वीज बिलासाठी उपयोग होत आहे.
 • याच्या पुढचे पाऊल म्हणून डिजिटल युगाशी जुळवून घेत आता महावितरणकडून ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबिल मिळण्यापूर्वीच मीटर रीडिंग घेतल्यानंतर त्याची माहिती तत्काळ उपलब्ध होते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रीडिंग पडताळणीसाठी उपलब्ध होते.
 • तसेच मीटर रीडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य होते. अशा प्रकारे छापील बिल मिळण्यापूर्वीच ग्राहकांना मीटर रीडिंग समजत असल्यामुळे आता यापुढे वीजबिलावरील मीटर रीडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
 • सध्या महावितरणकडे 2 कोटी 50 लाख वीजग्राहक आहेत. यापैकी सुमारे दोन कोटी सात लाखांहून अधिक ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. ज्यांनी मोबाइलची नोंदणी केलेली नाही त्यांनी या नव्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

सरदार सिंहची हॉकी इंडियाच्या निवड समितीवर नियुक्ती :

 • भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या निवृत्तीनंतर सरदारच्या नव्या इनिंगला सुरुवात झालेली आहे.
 • तर हॉकी इंडियाच्या 13 सदस्यीस निवड समितीत सरदार सिंहची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तसेच 2018 साली इंडोनेशियातील जकार्ता शहरात झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारतीय हॉकीला अंतिम फेरी गाठता आली नाही. भारतीय हॉकी संघाच्या खराब कामगिरीमुळे काही कालावधीतच निराश झालेल्या सरदार सिंहने निवृत्तीचा मार्ग स्विकारला.
 • तर 2020 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळण्याचा सरदारचा मानस होता. मात्र परदेशी प्रशिक्षकांसोबत झालेले वाद, व ढासळलेली कामगिरी यामुळे सरदारने निवृत्त होणं पसंत केलं.

स्पेन दौऱ्यासाठी राणी रामपालकडे भारतीय महिला हॉकी संघाचं नेतृत्व :

 • 26 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाच्या स्पेन दौऱ्यासाठी, हॉकी इंडियाने 18 सदस्यीस भारतीय संघाची घोषणा केली आहे.
 • तर अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं असून गोलकिपर सविता भारतीय संघाची उप-कर्णधार म्हणून काम पाहणार आहेत.
 • या दौऱ्यात भारतीय महिला संघ स्पेनविरुद्ध 4 तर विश्वचषक उप-विजेत्या आयर्लंडविरुद्ध दोन सामने खेळणार आहे.

जेईईमध्ये पुण्याचा राज अगरवाल देशात टॉपर :

 • आयआयटी, एनआयटी व इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशासाठी 8 ते 12 जानेवारीदरम्यान घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, पुण्याचा राज आर्यन अगरवाल देशात टॉपर ठरला आहे.
 • राज्यातील अंकितकुमार मिश्रा व कार्तिक चंद्रेश गुप्त यांनी 100 पर्सेन्टाइल मिळवून पहिल्या पंधरामध्ये स्थान मिळविले.
  राज हा पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा विद्यार्थी आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यात 100 व गणितामध्ये 99 गुण मिळाल्याचे तो म्हणाला.

दिनविशेष :

 • 20 जानेवारी 1841 मध्ये युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
 • महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्‍न 20 जानेवारी 1988 मध्ये झाला.
 • 20 जानेवारी 1956 मध्ये आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
 • चीन व नेपाळ या देशांत 20 जानेवारी 1963 मध्ये सरहद्दविषयक करार झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.