20 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

20 February 2019 Current Affairs In Marathi

20 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 फेब्रुवारी 2019)

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट:

  • लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एकाहून एक मोठी भेट देत आहे. मोदी सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला आहे.
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. महागाई भत्त्यात ही तीन टक्के वाढ असून सुमारे एक कोटी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना त्याचा लाभ मिळेल. ही वाढ 1 जानेवारी 2019 पासून लागू करण्यात येईल.
  • नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता 3 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. पूर्वी 9 टक्के महागाईभत्ता असणारा आता 12 टक्के झाला आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 1968 कोटी रूपयांचा आतिरिक्त भार पडणार आहे.

प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह यांचे निधन:

  • प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले आहे. ते 93 वर्षाचे होते. 19 फेब्रुवारी रोजी रात्री एम्स रुग्णालयात नामवार सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. namwar singh
  • दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते.
  • नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927 रोजी वाराणसीमधील एका छोट्या गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • 1959 मध्ये चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पार्टीकडून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. पण त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
  • छायावाद (1955), इतिहास आणि आलोचना (1957), कहानी : नयी कहानी (1964), कविताचे नविन प्रतिमान (1968), दूसरी परंपरा की खोज (1982), वाद विवाद आणि संवाद (1989) यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहल्या आहेत.

स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत मीना कुमारीला सुवर्णपदक:

  • कनिष्ठ गटातील माजी जागतिक विजेती बॉक्सर निखत झरीन आणि मीना कुमारी देवी यांनी बल्गेरिया येथील सोफियामध्ये सुरू असलेल्या स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
  • अनेकदा राष्ट्रीय पदकांवर नाव कोरणाऱ्या झरीनने 51 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात फिलिपिन्सच्या आयरीश मँगो हिच्यावर 5-0 अशी सहज सरशी साधली.
  • मीना कुमारी देवी हिने 54 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत फिलिपिन्सच्याच आयरा विलेगस हिच्यावर 3-2 असा निसटता विजय साकारला. दरम्यान, मंजू राणी (48 किलो) हिला अंतिम फेरीत फिलिपिन्सच्या जोसी गाबुको हिच्याकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • झरीन हिने आक्रमक खेळ करताना तितकाच भक्कम बचाव करत मँगो हिच्यावर वर्चस्व गाजवले. झरीनने मँगोला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. मीना कुमारीला गेल्या वेळी याच स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण या वेळी सर्व कसर भरून काढत तिने सुवर्णपदक प्राप्त केले. आक्रमक खेळाला बचावाची जोड देत मीना कुमारीने सुवर्णपदक पटकावले.
  • दरम्यान पिलाव बासुमतारी (64 किलो), नीरज (60 किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (69 किलो) यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

इस्त्रायलकडून भारताला खंबीर पाठींबा:

  • दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचं म्हणजे या मदतीमध्ये कुठलीही मर्यादा नसेल. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने मोक्याच्या क्षणी भारताला साथ देण्याचा शब्द दिला आहे. modi-benjamin
  • पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशात युद्धज्वराचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर इस्त्रायलसारखी कारवाई करावी असा जनसामान्यांमध्ये मतप्रवाह आहे. जेरुसलेम भारताला कितपत मदत करु शकतो या प्रश्नावर डॉ. रॉन मल्का यांनी हे उत्तर दिले.
  • मागच्या आठवडयात पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काश्मीरमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यामुळे देशात पाकिस्तानबद्दल प्रचंड रोष आहे.
  • भारताने सुद्धा इस्त्रायल सारखे धोरण अवलंबून कारवाई करावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे. इस्त्रायल दहशतवादाविरुद्ध कठोर आणि वेगवान कारवाईसाठी ओळखला जातो.
  • भारताला आपल्या संरक्षणासाठी जी काही गरज लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या जवळच्या मित्राला लागेल ती मदत करु. दहशतवाद ही फक्त भारत आणि इस्त्रायलची नव्हे तर संपूर्ण जगाची समस्या आहे असे मल्का यांनी सांगितले.

जोकोव्हिचला चौथ्यांदा लॉरेओ पुरस्कार प्रदान:

  • गतवर्षांत प्रतिष्ठित चार ग्रँडस्लॅमपैकी दोन स्पर्धाचे विजेतेपद मिळवणारा सर्बियाचा नामांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याने चौथ्यांदा लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारावर नाव कोरलेAadhar
  • वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याव्यतिरिक्त जिम्नॅस्टिक खेळाडू सिमोन बाइल्स, गोल्फपटू टायगर वूड्स व फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्स संघानेसुद्धा मानाचे पुरस्कार पटकावले.
  • 2018मध्ये जोकोव्हिचने विम्बल्डन व अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. त्याशिवाय या वर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतही त्याने विजयश्री खेचून आणली.
  • जोकोव्हिचला फ्रान्सचा फुटबॉलपटू किलियान एम्बाप्पे, एलिउड किपचोज आणि ली ब्रॉन जेम्स यांच्याकडून कडवी लढत मिळाली. मात्र अखेरीस जोकोव्हिचनेच बाजी मारली. जोकोव्हिचने विश्वातील वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या चार पुरस्कारांशी बरोबरी केली असून पाच पुरस्कारांसह अव्वल स्थानावर असलेल्या रॉजर फेडररपेक्षा तो फक्त एका पुरस्काराने मागे आहे.

‘आधार’ सुविधा केंद्र 1 मार्चपर्यंत बंद राहणार:

  • महाराष्ट्रातील आधार सुविधा केंद्र येत्या एक मार्चपर्यंत बंद ठेवण्याची सूचना युनिक आयडेंटीफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडियाकडून ‘आधारकेंद्र संचालकांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
  • ‘आधार’ सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात येणार असल्याने त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण होईपर्यंत राज्यातील ‘आधार’ सुविधा केंद्रांसह बॅंक, पोस्ट ऑफिस कार्यालयातील ‘आधार’चे कामकाजही बंद ठेवण्यात येणार आहे.
  • शासनाच्या विविध योजनांसाठी शेतकरी, कामगार, नोकरदार आदींना आधार लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
  • तसेच, विद्यार्थ्यांनाही 28 फेब्रुवारी ही शिष्यवृत्ती फार्म भरण्याची अंतिम तारीख असल्याने आधार केंद्र लवकरात लवकर सुरू न झाल्यास अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

दिनविशेष:

  • 20 फेब्रुवारी हा दिवसजागतिक सामाजिक न्याय दिन आहे.
  • शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना सन 1978 या वर्षी देण्यात आला.
  • सन 1987 यावर्षी मिझोराम भारताचे 23 वे राज्य बनले.
  • सन 2014 मध्ये तेलंगण हे भारताचे 29 वे राज्य बनले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.