20 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
20 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (20 डिसेंबर 2021)
‘अग्नि-प्राईम’ची यशस्वी चाचणी :
- ‘डीआरडीओ’ने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) शनिवारी आण्विक क्षमता असलेल्या अत्याधुनिक अग्नि-प्राईम या क्षेपणास्त्राची ओडिशा किनाऱ्यानजीकच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी केली.
- तर या वर्षी जूननंतर दुसऱ्यांदा ही क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे.
- तसेच या क्षेपणास्त्राने अपेक्षित सर्व निकषांची पूर्तता करीत आपले लक्ष्य अत्यंत अचूकपणे साध्य केले.
- तर हे क्षेपणास्त्र दोन टप्पे असलेले आणि दुहेरी मार्ग आणि मार्गदर्शक प्रणालीने सज्ज आहे.
- हे क्षेपणास्त्र अग्नी वर्गातील क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे. एक हजार ते दोन हजार किलोमीटर इतका पल्ला गाठण्याची त्याची क्षमता आहे.
- अग्नी 5 हे भारताचे सर्वाधिक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ते पाच हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.
Must Read (नक्की वाचा):
शेतकरी आंदोलनातील नेत्याचा नवा राजकीय पक्ष स्थापन :
- दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनातील नेते आणि भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते गुरनाम सिंग चदुनी यांनी मोठी घोषणा केली आहे.
- आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चदुनी यांनी संयुक्त संघर्ष पार्टी (Sanyukt Sangharsh Party) या पक्षाची स्थापना केली आहे.
- तर त्यांचा हा नवा राजकीय पक्ष आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 117 जागा लढणार आहे.
- असं असलं तरी ते स्वतः पंजाब विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
दिनविशेष:
- 20 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
- पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका ‘यामिनी कृष्णमूर्ती‘ यांचा जन्म 20 डिसेंबर 1940 रोजी झाला.
- सन 1945 मध्ये मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
- सन 1999 मध्ये पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.