20 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

20 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2020)

DRDO ने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ :

 • स्वदेशी बनावटीची ATAGS हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे.
 • तर दूरवरच्या 48 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची क्षमता आहे असे संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे DRDO च्या वैज्ञानिकाने सांगितले.
 • स्वदेशी बनावटीची ही तोफ भारतीय लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करु शकते. या क्षेत्रात आयातीची आवश्यकता नाही असे ATAGS हॉवित्झर तोफ प्रकल्पाचे संचालक आणि डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक शैलेंद्र व्ही गाडे फिल्ड चाचणी दरम्यान एएनआयशी बोलताना म्हणाले.
 • चीन सीमेजवळ सिक्कीम आणि पाकिस्तान सीमेजवळ पोखरण येथे चाचणी दरम्यान ATAGS हॉवित्झरमधून दोन हजार राऊंडस फायर करण्यात आल्या आहेत असे गाडे यांनी सांगितले.
 • भारतीय लष्करात वापरात असलेली बोफोर्स आणि इस्रायलने जी ATHOS तोफ देण्याची तयारी दाखवलीय, त्यापेक्षा स्वदेशी ATAGS हॉवित्झरमधील सिस्टिम अधिक चांगली आहे असे गाडे म्हणाले.
 • तसेच कारगिल युद्धात पाकिस्तानवरील विजयात बोफोर्स तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ATAGS हॉवित्झर डीआरडीओने विकसित केली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2020)

विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धात अमितला सुवर्ण, सतीशला रौप्य :

 • जागतिक रौप्यपदक विजेत्या अमित पंघाल याला अंतिम फेरीची लढत न खेळताच जर्मनीत सुरू असलेल्या कॉलोग्ने विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेचे सुवर्णपदक मिळाले.
 • तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील रौप्यपदक विजेत्या सतीश कुमारने दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • अमितला जर्मनीच्या अर्गिश्ती टेर्टेरियानविरुद्धच्या लढतीत पुढे चाल मिळाली. सतीशने फ्रान्सच्या डॅमिली डिनी मॉइन्झेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

भारतीय संघानं 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडला :

 • पहिल्या कसोटी सामन्यात 53 धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात कोसळली आहे.
 • दुसऱ्या दिवसाअखेरीस 1 बाद 9 वर डाव संपवलेल्या भारताकडे 62 धावांची आघाडी होती.
 • तसेच दुसऱ्या डावांत भारतीय संघाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावांपर्यंत मजल मारता आली.
 • भारताच्या या खराब फलंदाजीमुळे 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला आहे.
 • 1974 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं 42 धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती.

दिनविशेष:

 • 20 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका ‘यामिनी कृष्णमूर्ती‘ यांचा जन्म 20 डिसेंबर 1940 रोजी झाला.
 • सन 1945 मध्ये मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
 • सन 1999 मध्ये पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.