20 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

20 December 2019 Current Affairs
20 December 2019 Current Affairs

20 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2019)

राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धात राहीला सुवर्णपदक :

  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतने 63व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात बुधवारी सुवर्णपदक पटकावले. कनिष्ठ गटातील सुवर्णपदक विजेत्या मनू भाकरला वरिष्ठ गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • महिलांच्या वरिष्ठ गटात राहीने 589 गुण मिळवले, तर अंतिम फेरीत 41 गुण मिळवले. मनूला प्राथमिक फेरीत 582 आणि अंतिम फेरीत 32 गुण मिळाले.
  • राहीने अंतिम फेरीत नऊ गुणांच्या फरकाने सुवर्णपदकावर वर्चस्व गाजवले. या गटातील कांस्यपदक महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलला मिळाले.
  • प्राथमिक फेरीत तिला 575 आणि अंतिम फेरीत 27 गुण मिळाले. महाराष्ट्राला 1738 गुणांसह सांघिक सुवर्णपदक मिळाले, तर हरियाणाला दुसरे स्थान मिळाले.
  • म्युनिच (जर्मनी) येथे मे महिन्यात झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना राहीने टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातील एक स्थान निश्चित केले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2019)

पुण्याच्या विद्यासागरने ग्रहाचे केले बारसे :

  • विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील विद्यासागर दौड या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. त्याने सुचवलेल्या नावावर स्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने पसंतीची मोहोर उमटवली असून आता हे नाव एका ग्रहाला देण्यात येणार आहे.
  • 13 वर्षांच्या विद्यासागरने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • विद्यासागर हा पुण्यातील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलचा विद्यार्थी आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय खगोल महासंघाच्या (आयएयू) शताब्दी वर्षांनिमित्त ग्रह-ताऱ्यांना नाव देण्याची स्पर्धा जागतिक पातळीवर घेण्यात आली.
    तर त्याच स्पर्धेतला एक भाग म्हणून ग्रह-ताऱ्यांना भारतीय भाषांतील नाव सुचवण्यासाठी ‘नेम एक्झोवर्ल्ड्स इंडिया’ स्पर्धा जुलैमध्ये जाहीर करण्यात आली होती.
  • विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र, विज्ञानाची गोडी लागावी हा या स्पर्धेचा हेतू होता. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 1 हजार 717 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ समितीकडून परीक्षण करून अंतिम फेरीसाठी 10 नावे निवडण्यात आली.
  • तसेच अंतिम फेरीत विजेता निवडण्यासाठी खुले मतदान घेण्यात आले. जवळपास 5 हजार 587 नागरिकांनी केलेल्या मतदानानंतर दोन नावे निश्चित करण्यात आली.त्यात विद्यासागरने सुचवलेले ‘संतमस’ आणि अनन्यो भट्टाचार्यने ‘बिभा’ ही दोन नावे निवडण्यात आली आहेत.
  • यापैकी एचडी 86081 या ताऱ्याला ‘बिभा’ आणि एचडी 86081 या ग्रहाला ‘संतमस’ ही नावे देण्यात आली आहेत.

बलाढ्य स्वीडनने पटकावले विजेतेपद :

  • महिलांच्या 17 वर्षाखालील तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्वीडनने भारताला 4-0 असे पराभूत केले. यासह स्वीडनने अपेक्षेप्रमाणे खेळ करत विजेतेपद पटकावले.
  • सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला स्वीडनच्या रुसुल काफजीने गोल करत भारतावर दबाव आणला. त्यानंतर कर्णधार इल्मा नेहवालने 16 व्या मिनिटाला गोल केला.
  • रुसुलने दिलेल्या कॉर्नर किकवर हेडरद्वारे गोल करत इल्माने स्वीडनला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
  • त्यानंतर लगेचच 18 व्या मिनिटाला इवेलिना दुलजान हिने गोल करत स्वीडनला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हीच आघाडी कायम होती.

दिनविशेष:

  • 20 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका ‘यामिनी कृष्णमूर्ती‘ यांचा जन्म 20 डिसेंबर 1940 रोजी झाला.
  • सन 1945 मध्ये मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
  • सन 1999 मध्ये पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.