20 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

20 December 2018 Current Affairs In Marathi

20 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2018)

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू:

  • जम्मू-काश्मीरमध्ये 19 डिसेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अहवालानंतर केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केला. Ramnath Kovind
  • तर यापूर्वी 1990 ते ऑक्टोबर 1996 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांकडील सर्व आदेश संसदेकडे गेले आहेत. आता कायदा करण्याचे अधिकार संसदेकडे असतील. नियमानुसार राष्ट्रपती राजवटीत अर्थसंकल्पही संसदेतूनच संमत होते.
  • राज्यपाल राजवटीत कायदे करणे आणि अर्थसंकल्प मंजूर करण्याचे अधिकार राज्यपालांकडे असतात. राष्ट्रपती राजवटीत आता राज्यपालांना निर्णय घेण्याचे अधिकारी नसतील. यासाठी त्यांना आता केंद्राची मंजुरी घ्यावी लागेल.
  • भाजपाने पाठिंबा काढल्यानंतर जून महिन्यात मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले होते. राज्यपाल राजवटीची मुदत 19 डिसेंबरला संपली आहे. त्याचदरम्यान मागील महिन्यात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर पीडीपी आणि सज्जाद लोन यांनी यांनी भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आमदारांच्या घोडेबाजाराची शक्यता आणि स्थिर सरकार देता येणार नाही हे कारण पुढे करत राज्यपालांनी 21 नोव्हेंबर रोजी विधानसभा भंग केली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2018)

भारताला वीस वर्षांत 2300 विमानांची गरज भासणार:

  • भारतीय विमान कंपन्यांना येत्या वीस वर्षांत 320 अब्ज डॉलर्सच्या (22 लाख कोटी रूपये) 2300 विमानांची गरज आहे, असे बोईंग कंपनीने एका अंदाजात म्हटले आहे. यातील 85 टक्के विमाने कमी रूंदीची तर बाकीची जास्त रुंदीची असतील. 2018-2037 या काळात विमानांची ही वाढीव गरज निर्माण होणार आहे.
  • बोईंग इंडिया कंपनीने म्हटले आहे की, अरूंद असलेली 1940 विमाने आवश्यक असून रूंद असलेली 350 विमाने गरजेची आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे 220 अब्ज व 100 अब्ज डॉलर्स आहे. सध्याच्या चलन दरानुसार 320 अब्ज डॉलर्स म्हणजे 22 लाख कोटी रूपये खर्च विमानांसाठी येणार आहे.
  • 2018-2037 दरम्यान 1 अब्जपेक्षा कमी किमतीची 10 जेट विमाने लागणार आहेत. बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी सांगितले,की भारताची वेगाने वाढ होत आहे त्यामुळे आगामी काळात विमानांची गरज वाढणार आहे.
  • भारतातील हवाई वाहतूक बाजारपेठ आव्हानात्मक आहे कारण हवाई वाहतूक कंपन्या नफ्यात नाहीत. गेल्या ऑगस्टमध्ये बोईंगने असे म्हटले होते की, भारताला 290 अब्ज डॉलर्सच्या 2100 व्यावसायिक विमानांची गरज आहे.
  • इंधनक्षमता बघता 737 मॅक्स विमाने भारतासाठी उफयुक्त आहेत. भारतात देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ ही लागोपाठ पन्नासाव्या महिन्यात दोन अंकी वाढ नोंदवत आहे. बोईंग विमाने आता इंधन वाचवणारी विमाने तयार करीत असून देशातील लोकांच्या गरजांना अनुसरून निर्मिती करीत आहे.

आता सागरी हवामानाचा अंदाज मिळणार मोबाईलवर:

  • समुद्रात बसविलेल्यावेव्ह रायडर बोया‘ या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची पूर्वकल्पना मच्छीमारांना मोबाईल संदेशाद्वारे मिळणार आहे. त्याचा उपयोग मच्छीमारांना सुरक्षितता आणि साधनसामग्री वाचविण्यासाठी करता येईल, असे प्रतिपादन हैदराबाद येथील ‘इन्कॉईस’चे शास्त्रज्ञ यतीन ग्रोवर यांनी केले. Wave Rider Boya
  • जी.एस. वेदक विज्ञान महाविद्यालय, भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (विज्ञान मंत्रालय), भारत सरकार तसेच सम्यक विश्‍व संघ यांच्या वतीने ‘सागरी हवामान अंदाज आणि संभाव्य मासेमारी क्षेत्र’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. समुद्रात बसवलेल्या वेव्ह रायडर बोयाच्या जवळपास 50 मीटरच्या अंतरावर मासेमारी करू नये. जेणेकरून मासेमारी करताना जाळी अडकू शकते, म्हणून ही काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
  • तसेच या वेळी शास्त्रीय माहिती अंकाचे प्रकाशन करण्यात आले. अमेरिकेतील कॅपिलॉन विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. लिऑन रिचर्ड, तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर आशिष सिंग, जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष बाबामियॉं मुकादम आदी उपस्थित होते.

इस्त्रोकडून ‘जीसॅट7 ए’ चे यशस्वी प्रक्षेपण:

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन 19 डिसेंबर रोजी ‘जीसॅट-7 ए’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी GSLV-F11 रॉकेट जीसॅट-7 ए उपग्रहाला घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावला. खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला हा दुसरा दळणवळण उपग्रह आहे.
  • भारतीय हवाई दलासाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचे आहे. कारण जीसॅट-7 ए या दळणवळण उपग्रहामुळे हवाई दलाला जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाई तळ आणि अॅवाक्स विमानांचे नेटवर्क परस्परांशी जोडणे शक्य होईल. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे.
  • हवाई दलाचे तळ जोडण्या इतकेच जीसॅट-7 ए चे कार्य मर्यादीत नाही तर हवाई दलाच्या ड्रोन मोहिमांमध्येही मोठा फायदा होणार आहे. सध्याचे हवाई दलाचे जमिनीवरील जे नियंत्रण कक्ष आहेत ते उपग्रह केंद्रीत नियंत्रण कक्षामध्ये बदलले जातील. जीसॅट-7 ए मुळे मानवरहित ड्रोन विमानांचा पल्ला, टिकण्याची क्षमता आणि लवचिकता मोठया प्रमाणात वाढणार आहे.

‘ई-कॉमर्स’वरील विक्रीत तीनपटीने वाढ:

  • स्वस्त इंटरनेट, घसघशीत सवलती आणि घरपोच सेवा यामुळे लोकप्रिय झालेल्या ई-कॉमर्स मंचाने अल्पावधीतच बाजारपेठेला काबीज केले आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील ई-कॉमर्समधून होणाऱ्या विक्रीत तीन पटीने वाढ झाली आहे. e-commerce
  • ई-कॉमर्सची जागतिक बाजारपेठेत वार्षिक 15 टक्‍क्‍यांनी वाढ होत असून, भारतातील वृद्धी दर थक्क करणारा असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे.
  • ऑनलाइन खरेदीसंदर्भातील ग्राहकांच्या आवडीनिवडीबाबत नुकताच ‘नील्सन’ या संस्थेकडून सर्व्हे करण्यात आला. इंटरनेट वापरणारे जवळपास 98 टक्के ग्राहक ऑनलाइन खरेदीला पसंती देत असल्याचे या पाहणीत आढळून आल्याचे म्हटले आहे.
  • तसेच ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या हळूहळू जम बसवू पाहत आहेत. दक्षिण कोरियामध्ये उदयास आलेल्या ई-कॉमर्स संकल्पनेने जगभर विस्तार केला आहे.
  • दक्षिण कोरियात ‘एफएमसीजी’तील एकूण विक्रीपैकी 20 टक्के हिस्सा ई-कॉमर्स आहे. खरेदीचा ट्रेंड काळानुरूप बदलतो आहे. माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार, ई-कॉमर्स कंपन्यांची विश्‍वासार्हता, सोयीनुसार खरेदी, तसेच वस्तू परत करण्याची सुटसुटीत पद्धत, यामुळे ग्राहक ई-कॉमर्सकडे वळाला आहे.

सेवानिवृत्तांनाही मिळणार सहावा वेतन आयोग:

  • राज्यात जानेवारी 2006 ते 26 फेब्रुवारी 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना, तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय, तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
  • मंत्रालयात अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, अर्थ विभागाचे सचिव नितीन गद्रे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
  • तसेच हा निर्णय घेण्यात आल्याने शासनावर थकबाकीपोटी 2204 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, की या निर्णयाची अंमलबजावणी करण्याने दरवर्षी 319 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे.
  • 2006 पासूनच्या थकबाकीपोटी लागणारी 2204 कोटी रुपयांची रक्कम सेवानिवृत्तिवेतनधारकांना/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना एकरकमी मिळणार आहे. याचा लाभ एक लाखाहून अधिक सेवानिवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना होईल.

दिनविशेष:

  • 20 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • पद्मश्री भरतनाट्यमकथ्थक नर्तिकायामिनी कृष्णमूर्ती‘ यांचा जन्म 20 डिसेंबर 1940 रोजी झाला.
  • सन 1945 मध्ये मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
  • सन 1999 मध्ये पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.