20 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

अक्षय ऊर्जा दिन
अक्षय ऊर्जा दिन

20 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2022)

राज्यसेवा 2022 साठी 340 पदांची भर :

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा 2022 मध्ये 340 पदांची भर पडली आहे.
 • उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा पदांचा त्यात समावेश आहे.
 • एमपीएससीतर्फे 11 मे रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात 161 पदांचा समावेश होता.
 • मात्र शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा 2022च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
 • मात्र आता गट अ आणि गट ब संवर्गाची मिळून 340 पदे वाढल्याने एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.
 • वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाची 33, पोलीस उपअधीक्षक गट अ संवर्गाची 41, सहायक राज्यकर आयुक्त गट अ संवर्गाची 47, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ संवर्गाची 14, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ संवर्गाची दोन, शिक्षणाधिकारी, गट अ संवर्गाची 20, प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) गट अ संवर्गाची सहा, तहसीलदार, गट अ संवर्गाची 25, सहायक गट विकास अधिकारी,गट ब संवर्गाची 80, उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब संवर्गाची तीन, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब संवर्गाची दोन, उपशिक्षणाधिकारी, गट ब संवर्गाची 25, सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब संवर्गाची 42 पदांचा समावेश असल्याचे एमपीएससीने नमूद केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2022)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत ‘मुधोल हाऊंड’श्वानांचा सामावेश :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यात देशी श्वानांचा सामावेश करण्यात आला आहे.
 • कर्नाटकातील मुधोल हाऊंड (Mudhol hound) श्वान पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात दिसणार आहेत.
 • मुधोल हाऊंड हे आधीच भारतीय हवाई दल आणि इतर सरकारी विभागात सेवा देत आहेत.
 • मात्र, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या श्वान पथकात या शिकारी श्वानांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात येणार आहे.
 • एप्रिल महिन्यात कॅनाइन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर तिम्मापूर इथून दोन पुरुष प्रजातीचे श्वान आणण्यात आले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच या श्वानांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे.
 • चार महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर त्यांचा पंतप्रधानांच्या सुरक्षा दलातील श्वान पथकात सामावेश करण्यात येणार आहे.
 • विशेष कार्यशक्ती आणि शिकार करण्यात तरबेज अशी या श्वानाची ओळख आहे.
 • जर्मन शेफर्ड श्वानापेक्षा मुधोल हाऊंड श्वान जास्त वेगवान मानला जातो. देशी प्रजातीच्या श्वानांमध्ये मुधोळ हाउंड्स ही सर्वात शिकारी गुणवत्ता, निष्ठावान आणि निरोगी प्रजाती मानली जाते.
 • त्यामुळेच पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील श्वान पथकात मुधोल हाऊंड प्रजातीच्या श्वानांचा सामावेश करण्यात आला आहे.
 • भारतीय हवाई दलात आणि आता SPG पथकातही या श्वानांचा सामावेश करण्यात आला आहे.

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज :

 • भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
 • भुतियाने अर्ज केला असला तरी या पदासाठी सध्या आणखी एक माजी फुटबॉलपटू कल्याण चौबे यांचे पारडे जड मानले जात आहे.
 • भुतियाच्या नावाला त्याचा संघसहकारी दीपक मोंडलने प्रस्तावित केले आणि मधू कुमारीने अनुमोदन दिले.
 • भारतातील श्री गोकुळम केरळ एफसी आणि एटीके मोहन बागान या क्लबच्या संघांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदीनंतरही ‘एएफसी’ स्पर्धेत खेळू द्यावे, अशी विनंती क्रीडा मंत्रालयाने ‘फिफा’ आणि आशियाई फुटबॉल महासंघाला (एएफसी) केली आहे.

दिनविशेष:

 • 20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिन तसेच भारतीय अक्षय ऊर्जा दिन आहे.
 • राजाराममोहन रॉय, व्दारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी 20 ऑगस्ट सन 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
 • सर रोनाल्ड रॉस यांनी सन 1897 मध्ये भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
 • भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट 1944 मध्ये मुंबई येथे जन्म झाला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.