20 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

20 August 2018 Current Affairs In Marathi

20 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2018)

एटीएम डिपॉजिट मशीन आता वेळेनुसार असणार:

  • पुढील वर्षीपासून देशातील शहरी भागात कुठल्याही एटीएममध्ये रात्री 9 वाजेनंतर व ग्रामीण भागात सायंकाळी सहा वाजेनंतर पैशांचा भरणा बँकांना करता येणार नाही, शिवाय नोटा आणताना प्रवासात दोन रक्षक बरोबर असणे आवश्यक राहणार आहे, असे गृह मंत्रालयाने सांगितले. ATM
  • नक्षलग्रस्त भागात एटीएममध्ये पैसे भरण्याची मुदत सायंकाळी चार वाजेची असणार आहे. खासगी संस्थांनी बँकांकडून दिवसाच्या पूर्वार्धातच पैसे घेऊन चिलखती वाहनांतून त्यांची वाहतूक केली जाणे आवश्यक असते.
  • गृहमंत्रालयाने सांगितले, की नवीन प्रमाणित परिचालन प्रक्रिया 8 फेब्रुवारी 2019 रोजी लागू होणार असून अनेकदा एटीएममध्ये भरण्यासाठी पैसे नेणाऱ्या वाहनांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेसाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2018)

हज यात्रेसाठी जगभरातून लाखो मुस्लीम भाविक एकत्र:

  • जगातील 20 लाख मुस्लीम भाविक सौदी अरेबियात हज यात्रेसाठी दाखल झाले आहेत, मक्केत घनाकृती काबाभोवती जमून ते रोज नमाज पठण करीत आहेत. हज यात्रा पाच दिवसांची असून जगातील सर्वात जास्त लोक उपस्थित असलेला हा धार्मिक कार्यक्रम असतो.
  • मुस्लीम धर्मात सांगितल्याप्रमाणे मनुष्य जन्मात एकदा तरी हज यात्रा करणे पुण्याचे मानले जाते. मुस्लीम जगापुढे सध्या मध्यपूर्वेतील दहशतवाद, म्यानमारमधील रोहिंग्यांची वाईट अवस्था अशा अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागत आहे.
  • अल्लाच्या आशीर्वादानेच मी येथे आलो आहे. पश्चिम व पूर्वेकडील मुस्लीम देशांमध्ये शांतता नांदावी अशी प्रार्थना मी अल्लाकडे करीत आहे असे ईजिप्तमधून आलेल्या इस्सम एडीन अफीफी यांनी सांगितले. हजमध्ये महंमद पैगंबरांच्या पाऊलखुणा आहेत तसेच इब्राहिम व इस्माइल अब्राहम तसेच बायबलमधील इशमाइल हे तेथे होते.

नेताजी बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी:

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानमधून भारत सरकारने परत आणाव्यात, असे आवाहन त्यांच्या कन्या अनिता बोस-पाफ यांनी केले आहे.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तैवान येथे 18 ऑगस्ट 1945 रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या अस्थी टोकियोतील रेणकोजी मंदिरात सप्टेंबर 1945 पासून पडून आहेत. अनिता बोस म्हणाल्या, की नेताजींच्या 73व्या स्मृतिदिनी मी त्यांच्या अस्थी भारतात आणण्याचे आवाहन पुन्हा एकदा करीत आहे.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वतंत्र भारतात परत येण्याची इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे किमान त्यांच्या अस्थी तरी स्वतंत्र भारतात आणाव्यात. माझे वडील हे हिंदू होते, त्यामुळे परंपरेनुसार त्यांच्या अस्थींचे विसर्जन गंगेत करणे आवश्यक आहे. हिरोजी हिराबायाशी हे टोकियोतील जपान भारत असोसिएशनचे अध्यक्ष असून त्यांनी नेताजींच्या अस्थी भारतात नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. Netaji Subhashchandr Bos
  • हिराबायाशी हे जपानचे भारतातील माजी राजदूत असून त्यांनी सांगितले, की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी टोकियोतील रेणकोजी मंदिरात ठेवलेल्या असून त्याबाबत भारताकडून अधिकृत विनंतीची गरज आहे.
  • रेणकोजी मंदिरात नेताजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजी तैपेईतील विमान अपघातात मरण पावले व नंतर त्यांच्या अस्थी टोकियोत आणण्यात आल्या. त्याचे काही पुरावे आशिष राय यांच्या अलिकडील पुस्तकात आले आहेत.

मध्य प्रदेश शिक्षण अभ्यासक्रमात अटल बिहारी वाजपेयींचा धडा:

  • देशाचे माजी पंतप्रधान तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे नुकतेच निधन झाले. अटलजींची राजकीय तसेच साहित्यिक कारकिर्द दखल घेण्यासारखी आहे. त्यांच्या याच कार्याची ओळख येणाऱ्या पिढीला व्हावी यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • अटल बिहारी वाजपेयी यांचा धडा अभ्यासक्रमात असावा यादृष्टीने मध्यप्रदेश शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे. येथील शाळांच्या पाठ्यपुस्तकात वाजपेयी यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी याबाबतची माहिती दिली. Atal Bihari Vajpayee
  • अटलजींचे कार्य हे देशापुरतेच स्तिमित नव्हते तर त्यांची महती जगभरात होती. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या कथांचा पाठ्यपुस्तकात समावेश केला जातो. त्याअंतर्गत अटलजींच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात येणार असल्याचे देवनानी यांनी सांगितले.
  • आधुनिक भारतात अटलजी यांच्यासारखा दुसरा राजकीय नेता नाही. त्यांच्या जीवनचरित्रातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल त्यामुळे त्यांच्या जीवनचरित्रांचा पाठ्यपुस्तकात सहभाग करणे हीच खरी त्यांना शिक्षण विभागाची श्रद्धांजली ठरेल, असंही ते म्हणाले.

बजरंग पुनियाचे आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक:

  • भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी 65 किलो वजनी गटात त्याने जपानच्या दाईची ताकातानी याला 11-8 असे पराभूत केले. या बरोबरच बजरंगने भारताला यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
  • भारताला मिळालेले हे पहिले सुवर्ण पदक आणि हा विजय बजरंगने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले आहे. बजरंगने ट्विट करुन अटलजींना वंदन केले आहे आणि आपले पदक त्यांना समर्पित केले आहे. Bjrang
  • बजरंगने सुरुवातीला 6-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ताकातानी याने पुनरागमन करत 6-4 असा सामना रंगात आणला. पण सामन्याच्या अखेरीस 11-8 अशा फरकाने भारताच्या बजरंग पुनियाने सामना जिंकला आणि भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारताचे हे संपूर्ण दिवसातील एकमेव सुवर्णपदक ठरले.

दिनविशेष:

  • 20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिन तसेच भारतीय अक्षय ऊर्जा दिन आहे.
  • राजाराममोहन रॉय, व्दारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी 20 ऑगस्ट सन 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
  • सर रोनाल्ड रॉस यांनी सन 1897 मध्ये भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
  • भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट 1944 मध्ये मुंबई येथे जन्म झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.