20 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

ऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले
ऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले

20 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 एप्रिल 2020)

ऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले :

  • करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर टप्याटप्यानं व्यवहार सुरू करणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा सांगितलं होतं.
  • तसेच त्यानंतर 15 एप्रिल रोजी केंद्रीय गृह मंत्रालयानं यासंदर्भातील नियमावली जारी करताना त्यात फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसह ई-कॉमर्स कंपन्या सर्व ईलेक्ट्रिल वस्तुंसह इतर साहित्याची विक्री करण्यास परवानगी दिली होती. मात्र, चार दिवसांत केंद्रानं यू टर्न घेतला असून, केवळ जीवनाश्यक वस्तु आणि औषधांचीच विक्री करता येईल, असं म्हटलं आहे.
  • तर लॉकडाउनच्या काळात 20 एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या आस्थापनाबाबत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी नव्यानं आदेश जारी केले आहेत. त्यात ई-कॉमर्स कंपन्यांच्या यादीतून अत्यावश्यक नसलेल्या वस्तू वगळण्यात आल्या आहेत.
  • दरम्यान, 15 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या आदेशात 20 एप्रिलापासून ई-कॉमर्स कंपन्यांना सर्व वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती.
  • तसेच यात मोबाईल फोन, टिव्ही, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप, कम्प्युटर, रेडिमेड गारमेट, शाळेतील मुलांना लागणारी स्टेशनरी आदींची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 एप्रिल 2020)

न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती :

  • मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायामूर्ती म्हणून न्या. दीपंकर दत्ता यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शनिवारी केली.
  • न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ते बढतीवर मुंबईत मुख्य न्यायाधीश म्हणून येतील.
  • तसेच ‘कॉलेजियम’ची ही शिफारस आता केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे जाईल व त्यानंतर न्या. दत्ता यांच्या नव्या नेमणुकीचे आदेश निघतील.
  • तर सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण धर्माधिकारी येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.

केंद्राच्या ‘कृषी रथ अ‍ॅप’ने शेतकऱ्यांची सोय :

  • प्रवासासाठी टॅक्सी बुक करण्याच्या उबर किंवा ओला अ‍ॅपच्या धर्तीवर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी ट्रक बुक करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘कृषी रथ’ नावाचे नवे मोबाईल अ‍ॅप सुरु केले आहे.
  • तर या अ‍ॅपचा उपयोग करून शेतकरी त्याच्या मोबाईल फोनवरून घरबसल्या ट्रक बुक करू शकेल व हा ट्रक त्याच्या दारात येऊन त्याचा शेतमाल बाजारात घेऊन जाईल.
  • केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काही दिवसांपूर्वी या ‘कृषी रथ अ‍ॅप’चा औपचारिक शुभारंभ केला. खास करून सध्याच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात रब्बी हंगामात तयार झालेला शेतमाल घाऊक व्यापारी किंवा बाजार समित्यांपर्यंत घेऊन जाण्यास यामुळे शेतकऱ्यांयांची खूप सोय होईल. हे अ‍ॅप गुगल अ‍ॅप स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल.
  • तसेच या अ‍ॅपच्या सेवेसाठी सध्या 5.2 लाख ट्रक व 20 हजार ट्रॅक्टरची नोदणी झालेली आहे.
  • अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर शेतकऱ्यांला त्यात आपल्याला किती वजनाचा माल कुठून कुठे पाठवायचा आहे याची माहिती भरावी लागेल. त्यानंतर त्याला त्या भागात उपलब्ध असलेला ट्रक व त्याचे अपेक्षित भाडे याची माहिती कळविली जाईल.

अहमदाबादमध्ये रक्तद्रव उपचार चाचण्या सुरू :

  • गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्य़ात करोनाच्या चाचण्या जास्त प्रमाणात होत असल्याने तेथे करोना रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहेत.
  • तर शहरातील काही रुग्णालयांतून रक्तद्रव उपचार चाचण्या रविवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.
  • अहमदाबादमध्ये रुग्णांची संख्या 1002 झाली असून त्यात शहरातील 978 रुग्ण आहेत. बाकीचे जिल्ह्य़ाच्या परिसरातील आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विजय नेहरा यांनी दिली.
  • तसेच त्यांच्या संकुल भागात जाऊन चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होत आहे.

दिनविशेष:

  • प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी 1770 यासाली ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
  • नाझी हुकूमशहा तसेच दुसर्‍या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म 20 एप्रिल 1889 रोजी झाला.
  • सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा.ह.भ.प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा 20 एप्रिल 1896 रोजी माहीम, ठाणे येथे जन्म झाला होता.
  • सन 1946 मध्ये राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
  • आंध्रप्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म 20 एप्रिल 1950 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.