2 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

एअर इंडिया वन विमान आज भारतात होणार लँड:
एअर इंडिया वन विमान आज भारतात होणार लँड:

2 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2020)

चांदोबाचे चित्रकार के. सी. शिवशंकर निधन झाले:

  • मुलांसाठी असलेल्या ‘चांदोबा’ मासिकातील विक्रम आणि वेताळच्या चित्रांसाठी ओळखले जाणारे चित्रकार के. सी. शिवशंकर यांचे बुधवारी चेन्नईत निधन झाले. ते 97वर्षांचे होते.
  • मूळचे तेलुगु नियतकालिक असलेल्या ‘चंदामामा’ मासिकाची स्थापना चित्रपट निर्माते बी. नागी रेड्डी व चक्रपाणी यांनी 1947 साली केली होती.
  • मुलांमध्ये प्रचंड लोकप्रियता लाभल्याने हे मासिक नंतर 13 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागले. या प्रकाशनाच्या मूळ डिझायनर चमूतील शिवशंकर हे अखेरचे सदस्य होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2020)

एअर इंडिया वन विमान आज भारतात होणार लँड:

  • ‘एअर इंडिया वन’च्या दोन व्हीव्हीआयपी विमानांपैकी पहिले विमान आज भारतात दाखल होणार आहे.
  • हे विमान खास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासाठी असणार आहे.
  • देशातील VVIP साठी खास ‘द स्पेशल एक्स्ट्रा सेक्शन फ्लाइट’ आज दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होईल, असे सरकारमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले.
  • या VVIP एअर इंडिया वनची डिलिव्हरी स्वीकारण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी अमेरिकेला रवाना झाले होते.
  • विमान उड्डाणवस्थेत असताना ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून संपर्क साधण्याची सुविधा यामध्ये आहेत.
    B777 या विमानाची सलग 17 तास उड्डाण करण्याची क्षमता असेल

निर्भय मिसाइल लडाख सीमेवर तैनात:

  • पुढच्या महिन्यात सातवी चाचणी झाल्यानंतर ‘निर्भय’ सबसॉनिक क्रूझ मिसाइलचा औपचारिकरित्या भारतीय लष्कर आणि नौदलात समावेश होईल.
  • पण त्याआधीच पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळ भारताने ही मिसाइल्स तैनात केली आहेत.
  • निर्भय’ मिसाइलची रेंज 1 हजार किलोमीटर आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वैज्ञानिकांनी या मिसाइलची निर्मिती केली आहे.
  • काल जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या 400 किलोमीटर रेंज असलेल्या ‘ब्रह्मोस’ मिसाइलची चाचणी करण्यात आली.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने निर्भय मिसाइलच्या औपचारिक समावेशाचा मार्ग मोकळा केला होता.
  • लष्कराने नव्या मिसाइलच्या औपचारिक समावेशाची वाट न पाहता, एलएसीच्या सुरक्षेसाठी काही मिसाइल्स आधीच तैनात केली आहेत.
  • 0.7 माच असा या मिसाइलचा वेग आहे. निर्भय क्षेपणास्त्र जमिनीपासून 100 मीटर ते चार किलोमीटर अंतरावरुन उड्डाण करुन लक्ष्याचा वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र 300 किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते.

IPL मध्ये मुंबईच्या संघाने 191धावा केल्या.

  • पंजाबविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने 48 धावांनी सहज विजय मिळवला.
  • रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईच्या संघाने 191 धावा केल्या.
  • राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन या त्रिकूटाने प्रत्येकी 2-2 बळी घेत मुंबईला विजय मिळवून दिला.

दिनविशेष:

  • 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, स्वच्छता दिन तसेच बालसुरक्षा दिन आहे.
  • 2 ऑक्टोबर 1869 रोजी मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म झाला.
  • भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा 2 ऑक्टोबर 1904 रोजी मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म झाला.
  • रमाबाई रानडे यांनी सन 1909 मध्ये पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.
  • सन 1969 मध्ये महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या 2, 5, 10 व 100 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.