2 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

2 October 2019 Current Affairs In Marathi

2 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2019)

आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू
  करण्यात आली आहे.
 • तर यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
 • तसेच यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल असं म्हटलं होतं.
 • तर सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पर्यावरण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
 • तसेच सध्या एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकमध्ये कोणत्या वस्तू येतात याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्रालय लवकरच एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकची व्याख्या स्पष्ट करणार आहे. सध्या 24 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
 • तसंच राज्यांच्या काही सूचना असल्यास त्यादेखील देता येणार आहेत. सध्या प्लास्टिकच्या हँडलवाल्या आणि बिना हँडलवाल्या बॅग, प्लास्टिकची कटलरी, कप, चमचे, ताटं याव्यतिरिक्त थर्माकॉलची ताटं, खोटी फुलं, बॅनर, झेंडे,
  प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदिंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2019)

एसबीआयने ऑस्ट्रेलियात सुरू केली शाखा :

 • भारतीय स्टेट बँकेनं(एसबीआय) मेलबर्नमध्ये आपली शाखा उघडली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शाखा उघडणारी एसबीआय भारतातील पहिलीच बँक ठरली आहे.
 • एका भव्य कार्यक्रमात व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्नमध्ये शाखेचा उद्धघाटन सोहळा पार पडला. व्हिक्टोरियामध्ये याआधी सिप्ला, सायरेन्ट, एचसीएल, इन्फोसिस, रॅमको, टीसीएस, महिंद्रा आणि झोमॅटो या भारतीय कंपनी कार्यरत आहेत.
 • व्हिक्टोरिया आणि भारतामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध सुधारण्यास आमचं हे पाऊल भविष्यात मदत करेल, पुढील दहा वर्षांमध्ये याचा फायदा दिसून येईल, असे बँकेकडून सांगण्यात आले.

टर्की बनवणार रडारला न सापडणारी अत्याधुनिक युद्धनौका :

 • टर्कीने पाकिस्तानसाठी युद्धनौकेची बांधणी सुरु केली आहे. टर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांनी ही घोषणा केली.
 • तर पाकिस्तान टर्कीकडून ही युद्धनौका विकत घेणार आहे.
 • तसेच एर्दोगान यांच्या हस्ते टीसीजी किनलियादा या युद्धनौकेचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानसाठी युद्धनौकेची बांधणी करत असल्याची घोषणा केली.
 • युद्धनौकेची डिझाईन, बांधणी आणि देखभाल करणाऱ्या जगातील दहा देशांमध्ये टर्कीचा समावेश होतो असे एर्दोगान म्हणाले.
 • जुलै 2018 मध्ये पाकिस्तानी नौदलाने MILGEM श्रेणीच्या चार युद्धनौका खरेदी करण्यासाठी टर्की बरोबर करार केला.
 • या श्रेणीच्या युद्धनौकांचे वैशिष्टय म्हणजे त्या रडारला सापडत नाहीत असे आनाडोलुने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात लॅसित्सकेनची सोनेरी हॅट्ट्रिक :

 • रशियाच्या मारिआ लॅसित्सकेनने जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक मिळवून कारकीर्दीतील सलग तिसऱ्या जागतिक सुवर्णपदकावर नाव कोरले.
 • तर 26 वर्षीय लॅसित्सकेनने 2.4 मीटर इतक्या उंचीवर उडी मारून युक्रेनच्या यालोस्लाव्हा महुचिकला मागे टाकले.
 • तसेच अमेरिकेच्या व्हास्ती कनिंगहॅमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • लॅसित्सकेनने 2015 आणि 2017 मध्येसुद्धा उंच उडीमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

दिनविशेष:

 • 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, स्वच्छता दिन तसेच बालसुरक्षा दिन आहे.
 • 2 ऑक्टोबर 1869 रोजी मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म झाला.
 • भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा 2 ऑक्टोबर 1904 रोजी मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म झाला.
 • रमाबाई रानडे यांनी सन 1909 मध्ये पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.
 • सन 1969 मध्ये महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या 2, 5, 10 व 100 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.