2 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

2 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 जानेवारी 2023)

जीएसटी संकलनात डिसेंबरमध्ये 15 टक्के वाढ:

  • वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) डिसेंबर 2022 मधील महसूल संकलन 15 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख कोटींवर पोहोचले.
  • सुधारित उत्पादनाचे सुधारित प्रमाण आणि विनियोग मागणीतील वाढीचे हे निदर्शक आहे.
  • तसेच हे या करविषयक नियमांचे चांगल्या अनुपालनाचेही निदर्शक आहे.
  • या करसंकलनापोटी महसूल 1.40 लाख कोटींवर राहण्याचा डिसेंबर हा सलग दहावा महिना आहे.
  • नोव्हेंबरमधील कर संकलन सुमारे 1.46 लाख कोटी होते.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आजपासून:

  • महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहुउद्देशीय महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाना आजपासून सुरुवात होणार आहे.
  • ही स्पर्धा 12 जानेवारीपर्यंत राज्यातील विविध आठ केंद्रांवर पार पडेल.
  • महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना गेली 23 वर्षे या स्पर्धेसाठी प्रयत्नशील होती.
  • अखेर या स्पर्धेला मुहूर्त सापडला असून, राज्यातील 10 हजार 456 खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
  • एकूण 39 क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश असून, राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी हे व्यासपीठ उभे करण्यात आल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

बॅडिमटन निवड चाचणीतून सायना नेहवालची माघार:

  • राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदक विजेती बॅडिमटनपटू सायना नेहवालने आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणाऱ्या राष्ट्रीय निवड चाचणीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आशियाई स्पर्धा 14 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत दुबईत पार पडणार आहे.
  • या स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी सायनासह आकर्षी काश्यप आणि मालविका बनसोड यांची निवड करण्यात आली होती.
  • आशियाई स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची आधीच निवड झाली असून दुसऱ्या महिला खेळाडूच्या स्थानासाठी या तिघींची निवड चाचणी रंगणार होती.
  • मात्र, या तिघींपैकी सायना आणि मालविका यांनी निवड चाचणीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
  • सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांच्यासह पुरुष दुहेरी जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांना जागतिक मानांकनामुळे भारतीय संघात थेट प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

दिनविशेष:

  • सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
  • 2 डिसेंबर 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
  • मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना 2 जानेवारी सन 1936 मध्ये झाली.
  • राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सन 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली होती.
  • सन 1985 मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.