2 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

GST
GST

2 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 जानेवारी 2022)

शेतीमालास किफायतशीर किंमत मिळण्यासाठी विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती :

  • शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी आणि त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली.
  • तर त्याला भारत सरकारकडून स्वामित्व हक्क (पेटंट) प्राप्त झाले आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी ही माहिती दिली
    ॲन इंटिलीजेंट सिस्टीम अँड ए मेथड फॉर सिस्टिमेटिक डिस्ट्रिब्युशन ऑफ ॲग्रिकल्चर गुड्स ‘ असे या सॉफ्टवेअरचे नाव असून त्याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून स्वामित्व हक्क मिळाले आहे.
  • तसेच कोणत्या वेळी कोणते पीक घ्यावे, त्याचबरोबर विविध शेती मालाला कोणत्या कालावधीमध्ये भाव प्राप्त होतो तसेच कोणत्या विभागांमध्ये त्या पिकाला दर मिळतो हे विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर मार्गदर्शन करू शकते.
  • तसेच त्या माध्यमातून जिल्हानिहाय विक्री व वितरण व्यवस्था देखील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून योग्य पद्धतीने करता येणार आहे.
  • जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळून त्यांचा उत्पन्न वाढण्यासाठी या विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे.

6000 संस्थांच्या परदेशी देणग्या बंद :

  • जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, आयआयटी, दिल्ली, इंडियन मेडिकल असोसिएशन, नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय यांच्यासह देशातील 6000 संस्थांचा परदेशी देणगी परवाना शनिवारी रद्द झाला.
  • तर यापैकी काही संस्थांनी आपल्या परदेशी देणगी नियमन (एफसीआरए) परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज केले नसावेत किंवा केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांचे अर्ज फेटाळले तरी असावेत, अशी शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
  • एफसीआरए’ कायद्यानुसार नोंदणीकृत अशासकीय संस्था (एनजीओ) आणि त्यांच्या सहकारी संस्थांचे प्रकल्प आणि कार्यक्रमांचे नियमन केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने करण्यात येते.
  • परदेशी देणग्यांसाठी कोणत्याही अशासकीय संस्था-संघटनांना ‘एफसीआरए’नोंदणी करणे अनिवार्य आहे.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता जारी केला आहे.
  • पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्त्यात सरकारने दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.
  • पीएम किसान योजनेंतर्गत, सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

ऑनलाइन खाद्यपदार्थांच्या किमतीत ‘जीएसटी’ची भर :

  • केंद्र सरकारने नव्या वर्षाच्या आरंभालाच वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) वसुलीचे जाळे विस्तारले.
  • स्विगी आणि झोमॅटोसारख्या ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरवठादारांना शनिवार, 1 जानेवारीपासून संबंधित खाद्यपदार्थ विक्रेत्यांना
  • पाच टक्के दराने जीएसटी आकारून ती सरकारच्या तिजोरीत जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
  • तसेच याच धर्तीवर शनिवारपासून, उबर, ओलासारख्या टॅक्सी सेवा पुरवठादारांनाही त्यांनी केलेल्या दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या र्बुंकगवर पाच टक्के दराने जीएसटी आकारून ती सरकारजमा करण्यास सांगण्यात आले आहे.
  • 2022 मधील जीएसटी आकारणीसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्या जीएसटीअंतर्गत नोंदणी केलेली उपाहारगृहे या कराची आकारणी करून तो सरकारला देत आहेत.

दिनविशेष:

  • सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
  • 2 डिसेंबर 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
  • मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना 2 जानेवारी सन 1936 मध्ये झाली.
  • राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सन 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली होती.
  • सन 1985 मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.