2 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

2 December 2018 Current Affairs In Marathi

2 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2018)

आता ड्रोनकडून होणार अवयवांची वाहतूक :

  • अवयव प्रत्यारोपणामध्ये वाहतूक कोंडीची अडचण येऊ नये यासाठी आता ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी अधिकृत रुग्णालयांना ड्रोनपोर्ट्स तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • तसेच मोठय़ा आकाराच्या ड्रोनची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यानंतर महिन्याभराने परवाने देण्यास सुरुवात होणार आहे, सध्या 2.0 या ड्रोन धोरणावर काम सुरू आहे.
  • तर मोठय़ा रुग्णालयांमध्ये हवाई मार्गिका तयार करण्यावरही विचार सुरू आहे, असे सिन्हा म्हणाले.
  • अवयव प्रत्यारोपण सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये ड्रोनपोर्ट्स तयार केल्यानंतर अवयव वाहतुकीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणींचे प्रमाण कमी होणार आहे.
  • तसेच नव्या धोरणावर 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्लोबल एव्हिएशन परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2018)

सुपरसॉनिक ब्राह्मोस खरेदीसाठी 3 हजार कोटी रुपये मंजूर :

  • लष्करी साहित्य खरेदीच्या 3 हजार कोटी रुपयांच्या महत्वाच्या व्यवहाराला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली.
  • तर नौदलाच्या दोन स्टेल्थ फ्रिगेटसाठी सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि लष्कराच्या अर्जुन रणगाडयासाठी एआरव्ही गाडया विकत घेण्यात येणार आहेत.
  • संरक्षण साहित्य खरेदीसंबंधी निर्णय घेणारी मंत्रालयाची सर्वोच्च समिती संरक्षण खऱेदी परिषदेने मंजुरी दिल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
  • तसेच भारत एक अब्ज डॉलर मोजून रशियाकडून दोन स्टेल्थ फ्रिगेट विकत घेणार आहे. या दोन्ही फ्रिगेटस ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असतील.
  • तर ब्राह्मोस हे भारताचे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून भारत आणि रशियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन :

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
  • 1989 ते 1993 या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
  • तर बिल क्लिंटन यांच्याकडून बुश यांना पराभव स्वीकारावा लागला आणि अवघ्या चार वर्षात त्यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले.

भारत-चीन-रशिया यांच्यात बारा वर्षांनी चर्चा :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात जी-20 परिषदेत चर्चा झाली.
  • भारत,चीन आणि रशिया या देशात बारा वर्षांनंतर येथे त्रिपक्षीय चर्चा झाली असून त्यात बहुदेशीय संस्थांमध्ये सुधारणा कार्यक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • तसेच संयुक्त राष्ट्रे, जागतिक व्यापार संघटना या संस्थात सुधारणांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
  • खुली जागतिक अर्थव्यवस्था व बहुपक्षीय व्यापार प्रणालीचा फायदा आर्थिक वाढ व भरभराटीसाठी व्हायला हवा असेही या वेळी सांगण्यात आले.

दिनविशेष :

  • 2 डिसेंबर – जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन
  • 2 डिसेंबर 1402 मध्ये लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
  • 2 डिसेंबर 1942 मध्ये एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.