2 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs
2 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2021)
सिंधूची सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई :
- टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचा रविवारचा नववा दिवस बॅडमिंटनमधील पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकाने भारतासाठी यशस्वी ठरला.
- बॅडमिंटनपटू सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओला नमवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई करून इतिहास घडवला,
- तसेच टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत दमदार वाटचाल करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी अखेर कोटय़वधी भारतीय चाहत्यांना कांस्यपदकाचा नजराणा दिला.
- जगज्जेत्या सिंधूने कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या ही बिंग जियाओला नेस्तनाबूत करून ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरण्याचा मान मिळवला.
- तर तिने चीनच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या बिंग जियाओचा 21-13, 21-15 असा सरळ दोन सेटमध्ये फडशा पाडला.
- तसेच सिंधूचा हा बिंग जियाओविरुद्धचा 16 सामन्यांतील सहावा विजय ठरला.
49 वर्षांनंतर पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक :
- भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी ब्रिटनवर 3-1 असा शानदार विजय मिळवत 49 वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
- भारताच्या यशात दिलप्रीत सिंग (7व्या मिनिटाला), गरुजत सिंग (16व्या मिनिटाला) आणि हार्दिक सिंग (57व्या मिनिटाला) यांनी मैदानी गोलची नोंद केली.
- तर ब्रिटनकडून सॅम वॉर्डने एकमेव गोलची नोंद केली.
- तसेच येत्या मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची विश्वविजेत्या बेल्जियमशी गाठ पडणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व सामन्यात स्पेनला 3-1 असे हरवून उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
- तर मेजर ध्यानचंद, बलबिर सिंग यांसारख्या मातब्बर हॉकीपटूंमुळे आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने अखेरचे सोनेरी यश मॉस्कोमध्ये 1980मध्ये मिळवले होते.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद भारताकडे :
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचा ऑगस्टमधील अध्यक्ष म्हणून दहशतवादाचा मुकाबला, शांतता रक्षण व सागरी सुरक्षा या बाबींना प्राधान्य देण्यात येईल, असे भारताने रविवारी म्हटले आहे.
- तर भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत टी.एस तिरुमूर्ती यांनी दृश्यफीत संदेशात शनिवारी सांगितले, की सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद भारताला ऑगस्ट महिन्यासाठी मिळाले आहे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.
- तसेच भारत 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना हा बहुमान मिळाला आहे. भारताने रविवारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा अध्यक्ष म्हणून भारत या महिन्यात अनेक बैठकांचे आयोजन करून त्यात वेगवेगळे विषय हाताळणार आहे.
- तर सीरिया, इराक, सोमालिया, येमेन, पश्चिम आशिया यांसारखे अनेक मुद्दे विषयसूचीवर असू शकतात.
- सुरक्षा मंडळ सोमालिया, माली, संयुक्त राष्ट्रांचे लेबनॉनमधील अंतरिम सुरक्षा दल याबाबत ठरावांना मंजुरी देण्याची शक्यता आहे, असे तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू इमा मॅकीअनचा विश्वविक्रम :
- ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू इमा मॅकीअनने रविवारी विश्वविक्रमाची नोंद केली.
- तर 27 वर्षीय मॅकीअनने एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी पहिली महिला जलतरणपटू ठरण्याचा पराक्रम केला.
- तसेच यामध्ये चार सुवर्ण आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.
- यापूर्वी 2008च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या नताली कॉगलिनने चार सुवर्णासह सहा पदके जिंकली होती.
- त्याशिवाय अमेरिकेची जलतरणपटू कॅटी लेडेकीने अखेरच्या दिवशी दोन सुवर्णाची कमाई करताना एकूण चार पदके मिळवली.
जुलैमध्ये सहा लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार :
- भारताने डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे.
- तर कंपन्या, दुकानदार आणि नागरिक डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल व्यवहारांना गती मिळताना दिसत आहे.
- जुलै महिन्यात 6 लाख 6 हजार 281 कोटी रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार झाला आहे.
- तसेच 324 कोटी व्यवहारांच्या माध्यमातून 6 लाख 6 हजार 281 कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे.
- भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे.
दिनविशेष :
- सन 1870 मध्ये जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवेची लंडन मध्ये सुरवात झाली.
- आध्यात्मिक गुरू ‘जे.पी. वासवानी’ यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 मध्ये झाला.
- 2 ऑगस्ट 1954 मध्ये दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
- सन 2001 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.
अरे व्हा… किती महिन्या नंतर चालू घडामोडी परत सुरू केल्या धन्यवाद