19 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

बजरंग पुनिया
बजरंग पुनिया

19 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 सप्टेंबर 2022)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी नवा जागतिक विक्रम प्रस्थापित:

  • शनिवारी 17 स्प्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 72 वा वाढदिवस होता.
  • मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाने ‘रक्तदान अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे.
  • 17 स्प्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवा विक्रम प्रस्थापित झाला.
  • एका दिवसात एक लाखाहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
  • याआधीही आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करून 87 हजार लोकांनी ऐच्छिक रक्तदान करून नवा विक्रम केल्याची माहिती दिली होती.

जागतिक कुस्ती स्पर्धेतील विक्रमी चौथे पदक :

  • भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रविवारी कांस्यपदकाची कमाई केली.
  • बजरंगने कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिव्हेरावर सरशी साधली.
  • बजरंगचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील चौथे पदक ठरले आणि ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कुस्तीपटू आहे.
  • बजरंगने यापूर्वी 2013मध्ये बुडापेस्ट आणि 2019मध्ये नूर-सुलतान येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य, तर 2018मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च:

  • पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
  • BCCI ने रविवार या मेगा इव्हेंटसाठी भारताची नवीन जर्सी लाँच केली आहे.
  • T20 विश्वचषक 2022 साठी निवड समितीने सोमवारीच 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केलेली आहे.
  • भारतीय संघ सध्या परिधान करत असलेली जर्सीचा रंग ‘नेव्ही ब्लू’ आहे. मात्र आता भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळा आहे.
  • गेल्या विश्वचषकाच्या जर्सीला बिलियन चीअर्स जर्सी असे नाव देण्यात आले होते आणि त्याचा पॅटर्न टीम इंडियाच्या चाहत्यांपासून प्रेरित होता.

दिनविशेष :

  • भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा 19 सप्टेंबर 1965 रोजी क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म झाला.
  • सन 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
  • गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना सन 2001 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.
  • सन 2007 मध्ये टी-20 क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.