19 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल

19 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 मे 2022)

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा :

  • दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपला राजीनामा सादर केला.
  • तर त्यांनी पाच वर्षे पाच महिने या पदावर काम केले.
  • 1969च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले बैजल यांना डिसेंबर 2016 मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आले होते.
  • त्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहसचिव म्हणून काम पाहिले होते.
  • प्रसार भारती व इंडियन एअरलाइन्स यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मे 2022)

योगी सरकारचा नवा निर्णय :

  • काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता.
  • यानंतर आता राज्यातील मदरशांबाबत योगी सरकारने अजून एक निर्णय घेतला आहे.
  • योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार इथून पुढे उत्तर प्रदेशमध्ये स्थापन होणाऱ्या नव्या मदरशांना कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदान मिळणार नाही.
  • यासंदर्भात सादर करण्यात आलेला प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारने 17 मे रोजी स्वीकारला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिले आहेत.
  • उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धात निखत अंतिम फेरीत :

  • भारताच्या निखत झरीनने वर्चस्वपूर्ण विजयासह बुधवारी इस्तंबूल येथे चालू असलेल्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
  • परंतु उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे मनीषा मौन आणि परवीन हुडा यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला 5-0 असे सहज नामोहरम केले.
  • कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.
  • आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत.

डी कॉक आणि केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास :

  • आयपीएल 2022 सह स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी शानदार खेळ दाखवला आहे.
  • तर या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी अप्रतिम खेळी करत विक्रम केला.
  • मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2022 च्या 66 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने
  • प्रथम खेळून 20 षटकात एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या.
  • खनऊकडून क्विंटन डी कॉक 140 आणि कर्णधार केएल राहुल 68 धावांवर नाबाद माघारी परतले.
  • आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.

दिनविशेष :

  • 19 मे 1743 मध्ये जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
  • हॅले धुमकेतुचे शेपूट 19 मे 1910 मध्ये पृथ्वीला चाटुन गेले.
  • पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा 19 मे 1911 मध्ये सुरु झाली.
  • 19 मे 1910 मध्ये नथुराम गोडसे यांचा जन्म.
  • संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी 19 मे 1297 मध्ये एदलाबाद येथे समाधी घेतली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 मे 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.